आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोनोग्राफीत गडबड वाटतेय ?घाबरू नका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बालकांमधील क्लिष्ट आजारावरचे Anomaly Scan मुळे गर्भावस्थेत निदान करणे आता शक्य झाले आहे. बाळंतपण ही कुटुंबीयांच्या व आईच्या आयुष्यातील सर्वात आनंददायी गोष्ट असते, परंतु सोनोग्राफीत बाळाला गडबड आहे असं सांगितल्यावर त्या आनंदावर विरजण पडते. परंतु मातांनो अन् पर्यायाने होणा-या बाळाच्या कुटुंबीयांनो ! घाबरून जाऊ नका. वैद्यकीय क्षेत्रात झपाट्याने आमूलाग्र बदल होत आहेत आणि दुर्धर आजाराचे निदान करणे व उपचार करणे आता अगदी सोप झालं आहे.
बालकाच्या किडनीला येणारी सूज : या आजारात बाळाच्या किडनीचा मार्गक्रमण रोधित होतो. त्याला Pelvicreteric junction obstruction, obstructed megauretev, vesicouretenic reflex आणि posterior urethrel valve ही वेगवेगळी कारणे आहेत. किडनीला सूज आल्याचे समजताच panic होऊ नका. या सर्व आजारांशी आपण बाळ जन्माला आल्यानंतर योग्य पद्धतीने लढू शकतो व बाळाच्या किडनीचे कार्य पूर्ववत करू शकतो.
बाळाच्या मेंदूमध्ये पाणी जमणे : याला Hydrocephalus संबोधतात. या आजारात बाळाच्या डोक्याचा आकार वाढतो. बाळाच्या जन्मानंतर शस्त्रक्रियेने cerebrospinal fluid डोक्यातून पोटामध्ये मार्गक्रमित करता येते व नंतर बाळाची मानसिक वाढ पूर्ववत होते.
छाती व पोटामधील पडदा तयार न होणे : याला Congenital diophragmatic hernia म्हणतात. या आजारात पोटातील अवयव छातीमध्ये जाऊन फुफ्फुस व हृदयावर दाब देतात. या आजारातही Pregnancy Continue करायला हवी. बाळाच्या जन्मानंतर त्वरित शस्त्रक्रिया व नंतर कृत्रिम श्वासोच्छ्वासाच्या साहाय्याने या गंभीर आजारात उपचार करणे व यश मिळवणे शक्य झाले आहे.
 छातीमधील गाठी व फुप्फुसांचे विकार : याला lung cyst, Cystadenomatoas malformation Congenital Lobar Emphysema संबोधले जाते. या आजारात बाळ जन्मल्यानंतर त्वरित शस्त्रक्रियेद्वारे फुप्फुसांचा निकामी भाग काढला जातो व कृत्रिम श्वासोच्छ्वासाच्या मदतीने बाळाची तब्येत पूर्ववत होते.
श्वासनलिका व अन्ननलिकेचा जोड : याला tracheoesophageal fistula म्हणतात. या आजारातही वेळीच शस्त्रक्रिया झाली तरaspiration pneumonia मुळे होणारा धोका टाळता येऊ शकतो. या आजारात आईला polyhydramnios असते. शस्त्रक्रियेनंतर कृत्रिम श्वासाच्या मशीनने बाळाला पूर्ववत करता येणे शक्य असते.
पोटातील गाठी : बाळाच्या पोटात mesentric cyst, duplication cyst व ovarian cyst सारख्या गाठी होऊ शकतात. या गाठी आकाराने प्रत्येक trimestev मध्ये वाढू शकतात. परंतु घाबरून न जाता बाळाच्या जन्मानंतर या गाठी काढता येतात व या गाठींचा धोका टाळता येऊ शकतो.
पाठीच्या गाठी : याला meningocele ½f Meningomyelocele म्हणतात. यात पाठीच्या मणक्यांमध्ये गॅप होऊन पाठीच्या मेंदूचे आवरण बाहेर येते व त्यातून cerebrospinal fluid स्रवते. त्यामुळे मेंदूज्वर होण्याची संभावना असते. फुटण्याआधी जर अशा गाठींवर जन्मानंतर त्वरित शस्त्रक्रिया झाल्यास होणारे धोके टाळता येऊ शकतात.
मान व डोक्याच्या गाठी :cystic hygroma, branchial cyst, thyroglossal syst या गाठी पोटात सोनोग्राफीमध्ये कळतात. या गाठी बाळाच्या जन्मानंतर इंजेक्शनद्वारे वा शस्त्रक्रियेद्वारे काढता येतात व पुन्हा होऊ नये म्हणून खबरदारी घेता येते.
हृदयातील छिद्र
ASD, VSD, Tetrology of fallot, TAPVC हे दुर्धर आजार सोनोग्राफीमध्ये कळतात. या प्रकारच्या आजारांवर मात करण्यासाठी paediatric surgeon, paediatric sonologist, obstetrician व caedliologist ही पूर्ण टीम काउन्सेलिंगसाठी आवश्यक आहे. वैद्यकीय क्षेत्रात झपाट्याने प्रगती होत आहे. त्यामुळे जुन्या काळी जसे सोनोग्राफीमध्ये काही गडबड निघाल्यास शस्त्रक्रियेची घाई केली जायची, तशी सध्या परिस्थिती नाही. परंतु जन्मानंतर बाळाची घेण्याची काळजी, शस्त्रक्रियेमुळे येणारे कुटुंबीयांवरील मानसिक दडपण, शस्त्रक्रिया व कृत्रिम श्वासाच्या मशीनमुळे होणारे कॉम्प्लिकेशन व सुटीनंतरही बाळाच्या तब्येतीचा पाठपुरावा या सर्व गोष्टींचा तुलनात्मक विचार करणे व त्यावर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. मातांनो... सोनोग्राफीत गडबड वाटतीय...? घाबरून जाऊ नका. बालरोग शल्यचिकित्सकाचा सल्ला घ्या.
sandeep17580@gmail.com