आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Preparedness Of Competative Examination: Why Should Competative Exam?

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तयारी स्पर्धा परीक्षांची: स्पर्धा परीक्षा का व कशासाठी?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सद्य:स्थितीत स्पर्धा परीक्षा ही एक करिअर करण्यासाठी महत्त्वपूर्ण संधी मानली जाते. भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रामध्ये स्पर्धापरीक्षा मार्फत विविध पदांवरील अधिकारी व कर्मचारी यांची निवड केली जाते. आजमितीला सार्वजनिक क्षेत्रात स्पर्धा परीक्षेमार्फत भारतीय प्रशासनातील विविध सनदी अधिकारी, कर्मचारी यांची निवड केली जाते. याचबरोबर सार्वजनिक वित्तीय व बँकिंग क्षेत्रामध्ये लागणारे मनुष्यबळ स्पर्धा परीक्षेचे आयोजन करून निवडले जाते.


भारतातील राष्‍ट्रीय स्तरावरील प्रशासकीय अधिकारी याचबरोबर राज्य स्तरावरील प्रशासकीय अधिकारी भरतीचे कार्य स्वतंत्रपणे व नि:पक्षपाती यंत्रणेकडून व्हावे यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये राष्‍ट्रीय स्तरावर केंद्रिय लोकसेवा आयोग व राज्य स्तरावर राज्य लोकसेवा आयोग यासाठीच्या तरतूदी करण्यात आलेल्या आहेत. या आयोग्याच्या मार्फत प्रशासनामध्ये निवडण्यात आलेले अधिकारी फक्त कार्यकुशल व कार्यक्षम असणं अपेक्षित नाही तर भारतातील विविध प्रांतातील लोकाच्या स्थानिक समस्या तसेच विविध अशा आकांक्षा समजून घेऊन देशाची सर्वांगीण प्रगती घडवून आणण्यासाठी राष्टÑभावनेसह प्रेरित व कृतिशील असणे अशी अपेक्षा या अधिका-यांकडून केली जाते. कारण देशाचे अखंडत्व व एकता टिकवून ठेवण्यासाठी या अधिका-यांना महत्त्वपूर्ण भूमिका प्राप्त झालेली असते.


स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत केंद्रीय स्थरावरील विभाग निहाय लागणारा कर्मचारी वर्ग यांची निवड केली जाते. या स्पर्धा परीक्षेच्या पात्रतेसाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी दहावी पर्यंत (वर्ग क आणि ड साठी) असावे लागते तसेच पदवी प्राप्त उमेदवारांसाठी उदा. इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स / सेंट्रल एक्ससाइज, सी.बी.आय इन्स्पेक्टर , तसेच विविध पॅरामिलिटरी फोर्सेस मधील सबइन्स्पेक्टर या पदासाठी स्पर्धा परीक्षा मार्फत निवड केली जाते. या निवडीमागील प्रमुख उद्देश हा कनिष्ठ स्तरावरील प्रशासनाचा गाडा सुरळीत चालावा हा असतो. तसेच यामध्ये पुष्कळ प्रमाणात कर्मचारी वर्ग लागतो म्हणून जास्तीत जास्त पद संख्या यात उपलब्ध असतात.


देशाचे अखंडत्व व बाह्य सरंक्षणाची जबाबदारी लष्करामार्फत पार पाडली जाते. लष्करी सेवा मध्ये उमेदवार भरती करण्यासाठी स्पर्धा परीक्षेचे आयोजन केले जाते. कम्बाइंड डिफेन्स सर्व्हिस(CDS) आणि नॅशनल डिफेन्स सर्व्हिस (NDA) या सारख्या स्पर्धा परीक्षा संघ लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जातात. यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्याला लष्कर सेवेतील सर्वोच्च पदावर काम करण्याचे संधी प्राप्त होते.