आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छंदी 'आमचे घर'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'महाराष्ट्र राज्य समाजकल्याण सल्लागार बोर्डाने पाळणाघर चालवणार्‍या संस्थांकरिता काही मार्गदर्शक तत्त्वे सांगितली आहेत. पाळणाघरात मुलांच्या शारीरिक व भावनात्मक दोन्हीही गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत, हा त्यातील महत्त्वाचा मुद्दा आहे.'

घर की नोकरी? मूल की करिअर? नोकरी करायची तर मुलांना मायेनं, आपुलकीनं सांभाळायला कोणी विश्वासू मिळेल? पाळणाघरात ठेवायचं तर घरच्यासारखं मुलाची काळजी घेणारं खात्रीशीर पाळणाघर मिळेल? विवाहित, लेकुरवाळ्या किंवा आई होऊ घातलेल्या मैत्रिणींना पडणारे हे जुनेच प्रश्न. आता विभक्त कुटुंब पद्धतीमुळे नवरा-बायको दोघेही नोकरी करणारे असले की हे प्रश्न अधिक प्रकर्षाने जाणवतात. पण अशा अडचणीच्या वेळी या मैत्रिणींना आधाराचा हात देतात वेगवेगळ्या सामाजिक संस्थांद्वारे चालवली जाणारी वा अगदी घरगुती स्वरूपात चालवली जाणारी पाळणाघरे. अशीच पाळणाघरे मुंबईतील स्त्री मुक्ती संघटना या स्त्रियांच्या प्रश्नावर काम करणार्‍या संस्थेमार्फत चालवली जातात.
1985पासून पाळणाघरांची मागणी संघटनेने लावून धरली. 1987मध्ये 40 हजार सह्यांचा अर्ज शासनाला सादर केला. त्यानंतर 1989मध्ये महाराष्ट्र शासनाने बोरिवली येथे जागा उपलब्ध करून दिली व आमचे घर・हा उपक्रम संघटनेने सुरू केला. सध्या मुंबई व नवी मुंबई परिसरात सात पाळणाघरे सुरू आहेत व एक पाळणाघर लवकरच सुरू होणार आहे. महाराष्ट्र शासन, सिडको, आयडीबीआय बँक, रिझर्व्ह बँक, ओबीसी बँक यांनी पाळणाघरांसाठी जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच रंजना पटवर्धन यांनी स्वत:ची जागा दिली आहे. अंधेरी येथील सिप्झमध्ये मोठ्या संख्येने महिला कर्मचारी आहेत. तेथे पाळणाघराची सोय नव्हती. सिप्झने स्त्री मुक्ती संघटनेला पाळणाघर सुरू करण्यासाठी आमंत्रित केले व तेथील महिलांना दिलासा मिळाला. पाळणाघरांची, सांभाळ केंद्रांची पद्धतशीरपणे उभारणी व्हावी या उद्देशाने संस्थात्मकच नव्हे तर घरगुती पद्धतीने चालवल्या जाणार्‍या पाळणाघर चालकांनाही प्रशिक्षण देणे, वेळोवेळी माहिती पुरविणे ही कामे स्त्री मुक्ती संघटनेमार्फत केली जातात.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा सविस्तर लेख...

(mayekarpr@gmail.com)