आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कवितांजली: वैभव बोलींचे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रादेशिक रूपे, आदिवासी आणि भटक्या विमुक्तांच्या बोली यांनी मराठी भाषेला समृद्ध बनवले आहे. मराठी समाजाचे संपन्न लोकधन या बोलींमध्ये आहे. मात्र या बोलींच्या अभ्यासाकडे अजूनही म्हणावे तसे लक्ष गेलेले नाही.
मराठी भाषेच्या समृद्धीमध्ये तिच्या सामाजिक उपरूपांसोबत, आदिवासी आणि भटक्या-विमुक्तांच्या बोलींचेही महत्त्वाचे योगदान आहे. महाराष्ट्रात अनेक जनसमूह असे आहेत, ज्यांची मातृभाषा मराठी नाही. विशिष्ट जातबोलींमध्ये त्यांचे दैनंदिन संभाषण व्यवहार चाललेले असतात. व्यावसायिक, प्रशासनिक अथवा शैक्षणिक कामकाजासाठीच या समूहांचा मराठीशी संबंध येतो. परंतु प्रादेशिक रूपे, आदिवासी आणि भटक्या विमुक्तांच्या बोली यांनी मराठी भाषेला समृद्ध बनवले आहे. मराठी समाजाचे संपन्न लोकधन या बोलींमध्ये आहे. मात्र या बोलींच्या अभ्यासाकडे अजूनही म्हणावे तसे लक्ष गेलेले नाही. अगदी अलीकडच्या काळात डॉ. गणेश देवी यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण जाखडे यांनी संपादित केलेला ‘भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण-महाराष्ट्र’ हा प्रकल्प वगळला, तर बृहत आकाश कवेत घेईल, असे काम फारसे झालेले नाही. तथापि एकेका भाषा व बोलीच्या संदर्भात संशोधकांनी केलेल्या प्रयत्नांचेही स्वतःचे मोल आहेच.
प्रा. स्वाती काटे यांच्या समवेत मी २०१२ ते २०१५ या कालावधीत ‘शाळेतील कविता’ हा प्रकल्प हाती घेतला. अभ्यासाला असणाऱ्या आणि आवडणाऱ्या कवितांचे अनुवाद वेगवेगळ्या बोलींमध्ये आम्ही विद्यार्थ्यांकडून करवून घेतले. प्रादेशिक आणि जातबोली बोलणाऱ्या समूहांमध्ये आपापल्या बोलींविषयी आस्था निर्माण करणे, विविध बोलींमध्ये भाषिक नमुने गोळा करणे, मुलांच्या अंगी बहुभाषिकता रुजवणे, विद्यार्थ्यांमध्ये भाषेची आणि भाषांतराविषयी गोडी निर्माण करणे, स्वभाषेचा व अन्य भाषांचा सन्मान करायला शिकवणे, असे काही उद्देश समोर ठेवून आम्ही हा प्रकल्प राबवला. त्यासाठी शंभरपेक्षा जास्त शाळांच्या संपर्कात आलो. साडेतीनशे विद्यार्थ्यांकडून महाराष्ट्रातील विविध २७ बोलींमध्ये, आम्ही पाठ्यपुस्तकातील कवितांचे अनुवाद करवून घेतले. लोकसर्वेक्षणात नोंदल्या न गेलेल्या मुलतानी, मेळघाटी गवळी, गुजर, लोहारी, काठेवाडी या बोलींमध्येही आम्हाला विद्यार्थ्यांनी कविता अनुवादित करून दिल्या. इयत्ता चौथी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या प्रकल्पात सहभाग घेतला. या प्रकल्पातून हाती आलेल्या काही कवितांचे हे अनुवाद…
जफर और अपुन (बम्बैया बोली)

मैने जफर के घर को रमजान का शरबत पिया
निकाह को उसके मैने शाही बिरयानी भी खाया
उसकी माँ भी अपुनकी माँ जैसीच
घर के लिये करते करते अपनी माँ की हो गई ना -
उसकी भी सुरत वैसीच
उसकी मकान की दिवार जैसे मेरे घर की दिवार
पोपडीया निकली हुई यार
उसका अब्बा भी अपुनके बापू जैसा
जुदाई के दिन के बारे मे बोलते हुए
उसका भी दिल जलता वैसा.
यार नमक भी उसका, लगता मेरे घर का
और पानी सब्जी का, वो भी एक ही जमीन का
मेरे तुलसीपर पडी हुई धूप
उसके मज्जीद के पासवाले नीम के पत्तीयों मे हो जाती है गुम
वो भी जाके आयेला तिरुपती, देहू को
अपुन भी गया पत्नी के साथ पीर की दर्गा पर
खजूर और चादर चढाने एक दो बार
मुझे और उसे एक जैसे लगनेवाले गालिब और तुकाराम
कित्ते दिन मेरे दिल मे अल्सर जैसी
चुबती रही उसकी माँ की कॅन्सर की खबर
मै और मेरा दोस्त, अफवाह नही थे कोई
और ना ही कोई समाज, धरम या मजहब का लेबल
थे हम, दो टाईम के दालचावल के वास्ते
की जानेवाली हलचल
साला एक वखत के नींद के वास्ते यार
दिनभर की जाने वाली मारामार
क्या मालूम कौन पर दिनो से तीन चार
गलीमुहल्ले मे फैला रहा है यार
खबर ऐसी, जो गिरा दे जफर और अपुन के बीच में दरार
वर्जेश सोलंकी
अनुवाद : नेहा मु. सावंत, नाशिक
-------------------------------
मोन्या जिवांचा दुख (मालवणी बोली)

कोरडा जा शेत हा, वला होक व्हया
मोन्या जिवांचा दुख, बोलन्यात येवक व्हया
छपरा उनाची घराक, जीते जीव धगावतत
फोफाट्याचे जोडे, पायात घालतत
जळजळ तेंच्या दुखण्याचे, झेलीत जावंक व्हया
आभाळ मनातला, सोसताना फाटला
टिपा दोन डोळ्यांतली, गाळताना दाटला
हौरांका बांद ह्ये, घालीत जावंक व्हया
नांगरलेल्या सेतासारक्या, काळिज दुख सोसता
तरी सुगीचा डोलणाऱ्या, सपान हिरवा बघता
अर्थ तेंच्या सपनात, पेरीत जावंक व्हया
विठ्ठल वाघ
अनुवाद : कु. राधिका मंदार काणे, वाडा
-------------------------------
ढग (काठेवाडी बोली)

गाडरी गरख्खा धोळो ढग
निळा आकाशमतू दिख्खस
वायऱ्या कधे हुबोरस
तदे तू जागापर हुबोरस
न वायरे कधे वाहस
तधे तू हळूचकण सल्यो जायंस
त्यार तू छा जायंस?
क्रिस्तीना रोसेत्ती
अनुवाद : रमेश विजय पवार, उंचगाव, कोल्हापूर
-------------------------------
जर देव झाड आणि फूल आहे (प्रमाण मराठी)

जर देव झाड आणि फूल आहे
आणि डोंगर आणि चंद्र आणि सूर्य आहे
मग मी त्याला देव का म्हणतो?
मी त्याला फूल आणि झाड आणि डोंगर आणि चंद्र म्हणेन
कारण म्हणूनच तर मी त्याला पाहू शकतो
तो स्वतःला सूर्य आणि चंद्र आणि फूल आणि डोंगरात बदलू शकतो
जर तो मला डोंगर आणि झाडासारखा दिसतो
फुलासारखा आणि चंद्रासारखा आणि सूर्यासारखा दिसतो
तर त्याची इच्छा असेल की मी त्याला ओळखावे
झाडाप्रमाणे, फुलाप्रमाणे, चंद्र आणि सूर्याप्रमाणे.
फेर्नोंदो पेस्सोआ
अनुवाद : दिग्विजय भगीरथ तौर, औरंगाबाद
-------------------------------
गावांचा घर कवलाचा (आगरी बोली)

आज अचानुक येकायेकी
मना वाटल तया फिराचा
गावांचा घर कवलाचा
पुरव दिसला नदी वाहते
त्यान बारकेपनीचा आठवते
उबंऱ्याशी येवुन मिलते
तरुनपन झला उगाच बावराचा
मायेरची पिरमल माती
ते मातींश्या पिकते पीरती
कणसाव माणिकमोती
तया खलखलाट स्मृती पाखरांचा
आयुष्याच्या पावुलवाटा
कवऱ्या तुरवल्या येता-जाता
तवा आसची आठवन येता
मनी तुफान सुरु होते येवाचा...
अनिल भारती
अनुवाद : अनुराग गणेश तरे, ठाणे
-------------------------------
जात (वडारी बोली)
मच्छीखाया पुल
पुलाबाजुक वडक्या
वडक्या देगारा निद इलु?
नु धिनाम शापाल बियाम तिन्टन्याला
नाक आडगताड मास्तर शाळाला
नु शापाल एंटिक यताव आबा?
बिडा
मनाद फानी सकांग नडाद
टायर दो शप्पु एवार बी
तिसकुनाक वसोनार
एकाड सुस्या आकाड लखानी-बाटा
मनाद निसता वाटोळा
आबा?
मनाक बाटा आएदेंग जमायाद येम?
बिडा
जिलंगी लेका मनाक चिटकाशींदी ईदी जात
दानीक मनाक एला कोशेदेंग वची?
आबा, अरोड उंडाव रा नु
ईदी कडवाल एम फानीक?
आनंद गायकवाड
अनुवाद : काजल राजाभाऊ जाधव, पारवा, परभणी
-------------------------------
मल्हार को ताल (लोहारी बोली)

पत्ती के उपर बूंद बज रयो
मट्टी के अंदर से कोम निकल रा
नाजुक येत्तो येत्तो चोच को और
मल्हार को ताल उठो
लाल पोपटी कवलो पत्ती
हलरयों इते उते
हरो पिलो रंग वोको अंदर
सेंदरी गिरगा किते किते
टपटप यो बद्दल
आखी को अंदर बूंद निलो
झाड वेल को माथो पर
वि मोतीको गोल टिपको
थोडो देर देखरयो चमकरयो
झाड उजालो इते उते देखनू
यो बच्चो होन पंखा को निचे
जा माय को छुप छुप
क्षितीज को पास इंद्रधनुष को
तीर अच्छो झुग्गा
गिलो वोने पोच रयो आखी
जमीन हस हस रयो
संगिता बर्वे
अनुवाद : अश्विनी हरिराम कास्देकर, हरिसाल, अमरावती
-------------------------------
मायबोली (गुजर बोली)

सारु थई मने भाग्य लाभी बोलुज गुजर
धन्य थई गयो हू सामळूज गुजर
धर्म पंथ जात एक जाणूज गुजर
आख्या जग मे माय मानुज गुजर
आम्हारा मनमनमें दंगज गुजर
आम्हारा नसनसमें नाचत गुजर
आम्हारा आम्हारा आम्हे बोलज गुजर
आम्हारा रंगरंगमें रंगज गुजर
आम्हारा पिलापिलामें जन्मज गुजर
आम्हारा लांडल्यामें रांगज गुजर
आम्हारा कळीकळीमें लाजत गुजर
आम्हारा घरघरमें बोलज गुजर
आम्हारा कुलकुलमें नांदज गुजर
याहाना फुलफुलमें हासज गुजर
याहाना दिशादिशामें रहज गुजर
याहाना जंगलमें फिरज गुजर
सुरेश भट
अनुवाद : कुणाल वेडू पाटील, नंदुरबार
(मूळ कवितेत गुजर ऐवजी मराठी असा शब्द आहे)
-------------------------------
ई देश मारो (गोरमाटी)

ई देश मारो, येर जाणीव थोडेतो रेय दो रे
ई लांबो हिमालय मारो, ई विशाल सागर मारो
ई गंगा यमुना खेत जमीन बागबगीचा मारो
ई इच्छा थेर पकडो, मत नजर तेडी रकाडो
येरे सारु जीव देयरो, आपळेर स्फूर्ती हातेम रेय दो रे
उ हाथ थकोथकाय, भाटारे बरसातेम
थांबाडो उ, लगाऑ कामेन ये देशेर प्रगती सारु
तम बंद करो ई नाश, थांबाडो आपंळेर घात
शक्ती न जाळो फुकटमे, काई कामेन तो आय दो रे
हानुतो भक्कम आपळेर धर्म, हानुतो भक्कम आपळेरं जात
पळन एक जुटेती, सदैव रकाडो मणक्यारो नात
दो खूप दूर आवाज, वजाओ एक वासळी
निरोप, रीस जे हेवा मनेमाईर वेरान जाय दो रे
सेनापती बापट
अनुवाद : अंकुश देवीदास जाधव, किनवट, नांदेड
-----
पृथ्वीराज तौर
drprithvirajtaur@gmail.com