आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कवितांजली: आदिकविता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय आदिवासी कवितेला शौर्याच्या आदिम परंपरांचा अभिमान, आणि सभ्य चेहऱ्याच्या वर्तमान राजकारणाची तिडीक आहे. मातीशी, झाडांशी, नदी आणि डोंगराशी इतकेच काय सूर्य, चंद्र आणि आभाळाशी हितगुज करणारी ही कविता अस्सल देशी आणि लोकपरंपरेतून उगवून आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याने भारतीय समाज, साहित्य आणि संस्कृतीला प्रज्ञेचे वळण लाभले. यातूनच निरनिराळ्या भाषेत माणूसकेंद्री, मूल्यात्मक मांडणी व्यक्त होऊ लागली. विविध साहित्यप्रवाहांच्या उदयामागे हाच विचार कार्यप्रवण असल्याचे जाणवेल. आदिवासी साहित्य प्रवाहाला सौष्ठव देण्याचे बहुमोल कार्यही याच विचारांनी केले आहे.

भारतीय आदिवासी कविता जल, जमीन आणि जंगलाबद्दल बोलते. ती आदिवासींच्या विस्थापनाबद्दल आणि गौरवशाली परंपरांबद्दल बोलते. ती जशी प्रमाणभाषेत बोलते, त्याहून अधिक स्वतःच्या मायबोलीत बोलते. भारतीय आदिवासी कवितेला शौर्याच्या आदिम परंपरांचा अभिमान, आणि सभ्य चेहऱ्याच्या वर्तमान राजकारणाची तिडीक आहे. मातीशी, झाडांशी, नदी आणि डोंगराशी इतकेच काय सूर्य, चंद्र आणि आभाळाशी हितगुज करणारी ही कविता अस्सल देशी आणि लोकपरंपरेतून उगवून आली आहे. या कवितेची मुळे आदिम मिथकांमध्ये लोकसंस्कृतीमध्ये खोलवर रुजलेली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याने भारतीय समाज, साहित्य आणि संस्कृतीला प्रज्ञेचे वळण लाभले. अस्मितेचा शोध आणि ‘स्व’ची माणूस म्हणून पुन:स्थापना हे बिंदू स्वातंत्र्योत्तर भारतीय साहित्याला डॉ. आंबेडकरांमुळे मिळाले. यातूनच निरनिराळ्या भाषेत माणूसकेंद्री, मूल्यात्मक मांडणी व्यक्त होऊ लागली. विविध साहित्यप्रवाहांच्या उदयामागे हाच विचार कार्यप्रवण असल्याचे जाणवेल. आदिवासी साहित्य प्रवाहाला सौष्ठव देण्याचे बहुमोल कार्यही याच विचारांनी केले आहे.

त्यामुळे समकालीन भारतीय आदिवासी कविता वाचत असताना परंपरा आणि नवता यांचा सुमेळ आपणास अनुभवता येतो. वाहरु सोनवणे, भुजंग मेश्राम, विनायक तुमराम, विनोद कुमरे, संजय लोहकरे यांसह अनेक मान्यवरांनी मराठी आदिवासी कविता समृद्ध केली आहे. निर्मला पुतुल, रामदयाल मुंडा, हरिराम मीणा, मिनीमॉन लालू हे अन्य भाषीय आदिवासी कवी आज देशभर चर्चेत आहेत. वेदना, विद्रोह, आक्रोश आणि जंगलच्या जिण्याची संपन्नता आपणास या अनुवादांमधून आस्वादता येईल.
ती ‘जारवा’ बाई
ती आली नव्हती
येऊच शकत नव्हती ती,
प्रवासात थांबली होती
प्रसववेदनेनं
तिची टोळी निघून गेली पुढे
शिकारीचा माग काढत
किंवा बाहेरच्या दबावापुढं झुकत

तेव्हाच पाहिलं
त्यांच्यापैकी नव्हे
आमच्यातल्या कुणीतरी…
नंतर ती पोर्ट ब्लेयरच्या इस्पितळात होती
बाळांतपणात झाला नाही कोणताच त्रास
ती जाऊ लागली, तेव्हा थांबवली गेली
ठेवली गेली रखवालदाराच्या घरी
पण परतायचच होतं, तिला
म्हणून कुणी अडवूही शकलं नाही
आणि ती निघून गेली
जिथून आली होती तिथे

ती जोपर्यंत राहिली, एक प्रेक्षणीय स्थळ बनून राहीली
पोर्ट ब्लेयरमध्ये
स्वीकारलं नाही तिला तिच्या लोकांनी
ती पुन्हा गर्भवती होती
पण मारझोड नाही केली कुणी
दिली नाही कुठलीही सजा
ती रडली खूप
म्हणाली, ‘माझा तर कोणताच नाहीय दोष
मी कुठलंच केलं नाही पाप
जे काही केलं रखवालदारानं केलं’
त्यांनी नाही समजावून घेतलं
आणि टोळी निघून गेली, जंगलात
तिला सोडून.

नंतर ती स्वतः आली
पोहचली पुन्हा पोर्ट ब्लेयरला
ठाऊक नव्हतं, जायचं कुठे?

आता निकोबारला असते ती
एका ख्रिश्चन मिशनरीत
तिचं नाव तर आठवत नाही मला
असेल ‘मेरी’ किंवा ‘ॲनी’
‘अनोळखी’ अशी सुरुवात असणारी ती
आता पुन्हा एका नव्या बाळाची आई आहे
शिकतात दोन्ही मुलं
शिकते ती सुद्धा
आता बोलते ती लोकांची बोली
कपडेही घालते
तरी खूप एकटी आहे ती
मुलांत रमत नाही तिचं मन
तिला स्वप्न पडतात
तिला स्वप्न पडतात –
या पाच वर्षांच्या अगोदरच्या काळाची
कित्येकदा ती झटके येऊन बेशुद्ध पडते
तिला जंगल दिसतं
धावणारी रानडुकरं दिसतात
तिला वाटतं
ती आत्ता लगेच चढून जाईल
नारळाच्या झाडांवर
समुद्रावरुन वेचून घेऊन येईल
शिंपले, गोगलगायी आणि मासे
डुकराची कवटी अडकवेल
गळ्यात हार समजून
क्युबोची दोरी बनवील
सागरी कवचांपासून बनवेल भूजदंड
लाल मातीनं माखील स्वतःचा चेहरा
टोकदार शिंपल्यांनी विंचरेल केस

जेव्हा शुद्धीवर येते
तेव्हा गुपचूप बसते
जेव्हा बेशुद्ध होते,
तेव्हा निबीड जंगलाकडं धावत सुटते ती
- हरिराम मीणा
drprithvirajtaur@gmail.com
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून वाचा इतर कविता..