आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priyanka Dahale Articcle About Palanaghar, Child Care Takeer

'मतिमंद मुलाला घडवण्याचं बळ पाळणाघरानं दिलं'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘चारचौघींसारखंच मीसुद्धा संसाराचं स्वप्न रंगवलं होतं. स्वप्नांना सोनेरी किनार असली तरी त्यांचा गाभा वेदनांनी भरलेला असतो हे मात्र मला ठाऊक नव्हतं. माझा मोठा मुलगा मतिमंद जन्माला आला आणि या वेदनांनी मला जगण्याचा नवा संघर्ष अनुभवायला दिला. पण त्यातही निर्मळ, निष्पाप सुख शोधण्याचं व मुलाला घडवण्याचं बळ मला पाळणाघरानं
दिलं...・ साठी जवळ आलेल्या सुलभाताई सांगत होत्या.

नाशिकमध्ये फार पूर्वी फारच निवांत जीवनशैली होती. अंगणातली, घरातली सावरासावर करून अंगावर तान्हुल्याला दूध पाजणारी माजघरातली आई हे नाशिकमधलं तसं रोजचं, परिचयाचं चित्र होतं. हळूहळू या शहराला मुंबई-पुण्याचे वेध लागले आणि हे शहरसुद्धा घरातल्या दोघांच्या धावण्यावर चालायला लागलं. घरातले आजीआजोबा व मुले अशी विभक्त विभागणी व्हायला लागली आणि तान्ह्याला जोजवत गोष्ट सांगणारे मिशाळ आजोबा वा थोपटणारी आजीही बघायला मिळेनाशी झाली.
यावर तोडगा माणूस काढणार नाही, असे कधी होईल का? संसाराची दोन्ही चाकं धावायला लागली तशी घरातल्या निरागस चिमुकल्यांना कुशीत घेऊन त्यांना सुरक्षित वातावरणात जपणारी पाळणाघरं नाशिकमध्येही स्थिरावायला लागली.
पुढील स्लाइड्‍सवर वाचा, सविस्तर लेख...
(priyanka.dahale@dainikbhaskargroup.com)