आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विदेशात भारतीय संस्कृतीचा झेंडा...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. प्रियंका सोनी 12 वर्षांपासून लेखन करीत आहेत. आजवर त्यांनी तीन हजार कविता, गाणी, गझल, 25 ते 30 कथा लिहिल्या आहेत. सध्या त्यांचे 4 उपन्यासांचे लेखन सुरू आहे. त्यांचे 2 काव्यसंग्रह प्रकाशित झाले असून आजवर सुमारे 80 पुरस्कार मिळाले आहेत.

रशियाकडून स्वतंत्र झालेल्या उझबेकिस्तानमधील ताश्कंद शहरात पाचवे आंतरराष्ट्रीय हिंदी संमेलन झाले. संमेलन सृजन सन्नाम छत्तीसगढ, प्रेमाह वर्मा स्मृती सन्मान नागपूर, ओएनजीसी भारत सरकार, तिराला शिक्षण समिती नागपूर यांच्यातर्फे आयोजित करण्यात आले होते. यात भारतभरातून 135 जण सहभागी झाले होते. यात जळगाव येथील हिंदी साहित्य गंगा संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. प्रियंका सोनी सहभागी झाल्या होत्या.
डॉ. प्रियंका सोनी 12 वर्षांपासून लेखन करीत आहेत. आजवर त्यांनी तीन हजार कविता, गाणी, गझल, 25 ते 30 कथा लिहिल्या आहेत. सध्या त्यांचे 4 उपन्यासांचे लेखन सुरू आहे. त्यांचे 2 काव्यसंग्रह प्रकाशित झाले असून आजवर सुमारे 80 पुरस्कार मिळाले आहेत. याशिवाय त्या न्यूयॉर्क, मॉरिशस येथील साहित्य संमेलनात सहभागी झाल्या होत्या. जळगावात त्यांची स्वत:ची हिंदी साहित्य संस्था असून या माध्यमातून त्या वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करीत असतात. एवढेच नव्हे तर आगामी काळात त्यांचा शहरात ‘हिंदी भवन’ बनवण्याचा मानस आहे.
‘भाषेची संस्कृती व संस्कृतीची भाषा’ या विषयावर सातासमुद्रापार ताश्कंद शहरात पाचवे आंतरराष्ट्रीय हिंदी संमेलन आयोजित करण्यात आले होते. डॉ. प्रियंका सोनी या संमेलनात सहभागी झाल्या होत्या. भारतीय संस्कृतीची व भाषेची महती परदेशात पोहोचावी या उदात्त हेतूने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. ताश्कंद येथे लालबहादूर शास्त्री यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे तेथे लालबहादूर शास्त्रींच्या नावाने शाळा, गार्डन व त्यांचे स्मारक आहे. एवढेच नव्हे तर ज्या हॉटेलमध्ये त्यांचा मृत्यू झाला होता तेदेखील आज जसेच्या तसे आहे. ताश्कंद येथील लोक खूप देशप्रेमी आहेत.
तेथील प्रत्येक नागरिक आदराने वागतो. मोठ्यांपासून ते लहानग्यापर्यंत प्रत्येक जण एकमेकांना भेटल्यानंतर नमस्कार करून हात मिळवतो. तेथील बोलीभाषा उझ्बेकी असली तरी जास्तकरून तेथे इंग्रजी बोलली जाते. हिंदी फार अल्प प्रमाणात बोलली जाते. याशिवाय घरातील प्रत्येक जण कामधंदा करतो. ताश्कंदमध्ये स्त्री भू्रणहत्येची समस्या कुठेही दिसत नाही. उलट तेथे पुरुषांपेक्षा महिलांची संख्या खूप असून तीन महिलांमागे एक पुरुष असे प्रमाण आहे. ताश्कंदमधील प्रत्येक नागरिकाला भारताविषयीही खूप प्रेम आहे. त्यामुळेच तर संमेलनात तेथील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
हिंदी संमेलनात भारतातील विभिन्न प्रदेशातून 135 साहित्यिक सहभागी झाले होते. प्रत्येक साहित्यिकाने सादर केलेले साहित्य कसदार तर होतेच; पण त्यातून वेगळी माहितीदेखील दिली जात होती. सहा सत्रांत झालेल्या या संमेलनात हिंदी साहित्याला एक नवे रूप दिले गेले. डॉ. प्रियंका सोनी यांनी स्वलिखित हिंदी कथा वाचून दाखवली.
या कथेचा विषय ‘हायरी तंबाखू’ हा होता. कथेतून सोनी यांनी व्यक्ती व्यसनाच्या आहारी गेल्यानंतर एखाद्या वेळी जर का त्याला व्यसन करण्यासाठी ती वस्तू मिळाली नाही तर त्याला कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते, त्यानंतर त्यांची अवस्था काय होते याबाबतची भयावह परिस्थिती मांडली होती. ती कथा अनेकांना भावली. त्यामुळेच तर डॉ. सोनी यांना संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय सृजनश्री’ पुरस्काराने सन्मानित
करण्यात आले.