आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pro.Satish Waghmare About Congress History, Rasik, Divya Marathi

कॉंग्रेसी इतिहासाला कलाटणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'जनलोकपाल बिल आंदोलनातून भाजपच्या यशाची मुहूर्तमेढ रोवली गेली. संघाने पद्धतशीर आखणी करून केजरीवाल बाबूंना रिंगणात आणून भाजपला पोषक वातावरण तयार केले. संघ-भाजप यांची विचारधारा उघड आहे, तरीदेखील जनाधार लाभून भाजप का सत्तेत आला आहे, याचा विचार इतरांनी करायला हवा...'

‘दगडापेक्षा वीट मऊ’ला सणसणीत उत्तर म्हणजे, ‘कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू परवडला’... 16 व्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली संघाने संसदेवर निर्विवाद वर्चस्व मिळवले आणि भाजप हा बहुमत लाभलेला बलवान पक्ष झाला. जनतेने भारतीय लोकशाहीचा आदर्श जगासमोर ठेवला. सर्वप्रथम मोदी आणि भाजपचे अभिनंदन करायलाच हवे!
संविधानाने आखून दिलेल्या चौकटीत मिळवलेले यश भविष्यकाळात जनतेच्या विश्वासास पात्र ठरण्याची दिलेली हमी व त्यावर भारतीय जनतेने ठेवलेला हा विश्वास. म्हणजे, मोदींचे यश निश्चितच अभिनंदनीय! मोदी सध्या चिक्कार आभार मानत आहेत, पण त्यात ते आपवाले केजरीवाल बाबू, किसन बाबुराव हजारे आणि आयएएस लॉबीला विसरलेत. जनलोकपाल बिल आंदोलनातून या निवडणुकीच्या यशाची मुहूर्तमेढ रोवली गेली. संघाने पद्धतशीर आखणी करून केजरीवालबाबंूना रिंगणात आणून भाजपला पोषक वातावरण तयार केले. संघ-भाजप यांची विचारधारा आधीपासूनच उघड आहे, तरीदेखील जनाधार लाभून, आज भाजप सत्तेत आहे, याचा विचार काँग्रेस आणि इतर घटक पक्षांनी करायला हवा. आजवर सत्तेत असताना काँग्रेसने भाजप हा घटना बदलेल, आरक्षण मिटवेल, राम मंदिर उभारील, असा बागुलबुवा दाखवून राजकारण केलं. सत्ता ताब्यात ठेवली.आजूबाजूला काही वाईट घडतेय हे कळले, तरी कुठे काय वाईट आहे? असा फुकाचा आविर्भाव राखला. पंतप्रधान कायम मुकेच राहिले. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची अशीच अवस्था. आचारसंहितेच्या नावाखाली नुकसानग्रस्त शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष, राज्यात वाढत चाललेल्या दलित अत्याचारांच्या घटना, आणि सरकारचा अक्षम्य ढिम्मपणा, मराठा आरक्षण, इंदु मिलचा मुद्दा यावरून काँग्रेस व राष्ट्रवादीतील बेबनाव, त्यातच नेत्यांची बेताल वक्तव्ये व त्यावर पक्षप्रमुखांचे मौन! इथल्या संख्येने जास्त असलेल्या सत्ताधारी मराठा नेतृत्वाने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील दलित -आदिवासी, प्रामुख्याने सत्ता मिळवून देण्यात महत्त्वाचा घटक ठरणारा ओबीसी समाज यांच्या अपेक्षा केलेले दुर्लक्ष, हेच पराभवाचे अतिशय महत्त्वाचे कारण ठरले.

काँग्रेस व राष्ट्रवादी आमदनीत सरकारदरबारी पुरेपूर नाडला गेलेला वर्ग, अत्यंत नाखूष होता. या सर्व प्रकारांची झळ येत्या विधानसभेत महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसला निश्चित बसणार, त्याकरिता योग्य आणि प्रभावी उपाययोजना केली, तरच महाराष्ट्रात सत्ता शाबूत राहिल, अन्यथा केंद्राप्रमाणे महाराष्ट्रातही विरोधी पक्षाच्या बाकावर बसण्याची तयारी आर.आर. आबा, अजितदादा आणि बाबांना करावी लागेल. शिवसेना आणि भाजपने ज्या पद्धतीने इथे खेळ्या करत राष्ट्रवादी आणि काँग्रेसची पार अब्रू धुळीला मिळवली ते पाहून भयानक आत्मचिंतन आणि आत्मक्लेश करण्याची गरज आताच्या सत्ताधारी मंडळीना आहे. एखादा कसबी नाटककार ज्याप्रमाणे नाटकात, भावात्मक कलाटणी द्यायला काहीतरी हळवा प्रसंग गुंफतो आणि टाळ्या- शाबासकी मिळवतो, तीच थिअरी भाषणात कायम वापरणारे राज ठाकरे यांना महाराष्ट्रातील सुज्ञ मतदारांनी, 挿वडा आणि सूपच्या वगाने, टिंगलटवाळीने मते मिळत नाहीत, हे दाखवून दिले, ते एका अर्थी बरेच झाले. नाहीतरी जनतेची स्मरणशक्ती चांगली असतेच. फार पूर्वी पक्ष स्थापन केला, तेव्हा ठाकरेंनी छान नक्कल करत म्हटले होते, 挿मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा筑, मला महाराष्ट्रापुरते राजकारण करायचेय. दिल्लीची गरज नाही, राज ठाकरे विसरले, पण जनता हे विसरली नाही, त्यांचा एकही माणूस दिल्लीत जाऊ दिला नाही. आता यातून राजसाहेबांनी योग्य तो बोध घ्यायला हवा. टिंगलटवाळी आणि नकला यापेक्षा शांत व गंभीर उद्धव ठाकरेंना जनतेने पसंती दिलेली आहे. आता येणार्‍या काळात भाजपचा अजेंडा काय असेल, ते कळेल, पण तूर्तास ज्या मुद्यामुळे त्यांना इथल्या संविधान मानणार्‍या, आणि काँग्रेसला कंटाळलेल्या मतदारांनी मत देऊन संधी दिली आहे, त्याचा त्यांना विसर पडू नये. भाजपचे एकूणच मवाळ हिंदुत्व, अनाकलनीय परंतु दाखवायला का असेना घेतलेली सर्वसमावेशक भूमिका, राम मंदिराच्या मुद्याला दुय्यम स्थान, आणि विकासाची दाखवलेली भरमसाट स्वप्ने, दिलेली वचने आता त्यांची आव्हाने आहेत. ती पूर्ण झाली नाहीत, तर काँग्रेसचा एवढा भयानक सफाया होऊ शकतो, तर भाजपचाही होईल, याचे भान ठेवायला हवे.

एक गोष्ट खरीच आहे .काँग्रेसने देशातील कमकुवत व दडपल्या गेलेल्या लोकसमुहांना सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने भारतीय संविधानाची तंतोतंत अमलबाजावणी सत्ता काळात केलेली नाही. ती भाजप करेल काय ? हा प्रश्न आणि आशावादी उत्तराने भाजप आज सत्तेवर आलेला पक्ष आहे. काँग्रेसने देशातील भ्रष्टाचार समाप्त व्हावा, भांडवलदारांनी, व्यापार्‍यांनी, बड्या जमीनदारांनी सामान्यांचे चालविलेले आर्थिक शोषण समाप्त व्हावे, यासाठी कोणतीही परिणामकारक उपाययोजना सत्ताकाळात केलेली नाही. देशामधील बहुसंख्यकांचा धार्मिक दहशतवाद समाप्त व्हावा, धर्माच्या नावाने वाढविलेली अंधश्रध्दा नष्ट व्हावी, यासाठी काहीही उपाययोजना केली नाही. भाजप ती करेल की नाही, याबाबत साशंकता आहेच. देशातील साधन संपत्तीचे काही मुठभर लोकांच्या हातामध्ये केंद्रीकरण होऊ नये, कामगारांची, शेतकर्‍यांची, मजुरांची आर्थिक पिळवणूक होऊ नये, भूकबळी जावू नयेत,बेरोजगारी वाढू नये, यासाठी कठोर उपाययोजना केल्याचा दाखला काँग्रेसकडे नाही. येत्या पाच वर्षात भाजपकडे सकारात्मक दाखला असायला हवा. तो असेल काय? हे येणारा काळ ठरवील.

जातीच्या कारणावरुन होणारे अत्याचार, बलात्कार, खून, जाळपोळ, सामाजिक बहिष्कार करणार्‍या लोकांना कठोर शासन व्हावे, यासाठी प्रभावी उपाययोजना काँग्रेसने कधीच केल्या नाहीत. काँग्रेसचे आर्थिक धोरण सामाजिक धोरण कल्याणकारी राज्याच्या प्रस्थापनेच्या दृष्टीने अनुकूल नव्हते, तरीही केवळ भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवाराच्या भीतीने दलित, आदिवासी, मुस्लिम, ख्रिश्चन तसेच धर्मांधतेचा विरोध करणार्‍या लोकांनी काँग्रेसला टिकवून ठेवले होते. याचा गंभीर विचार काँग्रेस आणि भाजपा या दोन पक्षांनी करणे गरजेचे आहे . भाजपच्या सत्ता काळात होणारे अनुकूल-प्रतीकूल परिवर्तन इथल्या लोकसमूहाला आपल्या विरोधात एकवटण्याची वा समर्थनार्थ उभे राहण्याची संधी देऊ शकते, याचे भान मोदी सरकारने ठेवणे गरजेचे आहे. आज निश्चितपणे भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात बहुमताने स्थापन झाले, ही बाब काँग्रेसी इतिहासाला कलाटणी देणारी ठरली आहे, हे नक्की.
(sbwaghmare03@gmail.com)