आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानसोपचारतज्ज्ञ शोध मनाचा!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मन मन म्हणजे नक्की काय आहे? ते काल्पनिक आहे का वास्तव आहे? याचे उत्तर तर नक्कीच ते वास्तव आहे. ‘मननात मनुष्य:’, म्हणजे मन ही एक अशी देणगी आहे जी फक्त मनुष्यालाच मिळालेली आहे. इतर प्राण्यांपासून त्याचे वेगळेपण निर्माण करणारी अशी ती निसर्गदत्त देणगी आहे. या मनाविषयी मग एवढ्या कल्पना का? मनुष्याला मिळालेल्या या देणगीचे खरे स्वरूप अजून मनुष्यालाच कळले नाही का? मनाचे हे कोडे माणसाच्या मनास अजून उमगलेलेच नाही? परंतु तरीही मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न अनेक कवी, संत, तत्त्वज्ञ यांनी केला आहे. किंबहुना प्राचीन काळापासून ते अजूनपर्यंत तो शोध सुरूच आहे.
या मनाचा शोध पाश्चात्त्य देशांतदेखील चालू होता. तो अभ्यास करता करताच ‘मानसशास्त्र’ ही मनाच्या रचनेचा, कार्याचा अभ्यास करणारी शाखा निर्माण झाली. डॉ. सिग्मंड फ्रॉइड हा डॉक्टरच या शाखेचा आद्यप्रणेता मानला जाऊ शकतो. त्याची कन्या अ‍ॅना फ्रॉइडनंतर पुढे अन्य कितीतरी जणांनी हा अभ्यास केला. अगदी आत्ता आत्ता अल्बर्ट एलिसपर्यंत हा प्रवास चालूच आहे.
डॉ. सिग्मंड फ्रॉइड याला मानसोपचाराचा ‘पितामह’ असे म्हणता येईल. ‘मनोविश्लेषणात्मक’ उपचार पद्धती हा मानसोपचाराचा आद्य प्रकार त्यानेच सुरू केला. त्याने माणसाला पडणाºया स्वप्नांचाही अभ्यास सुरू केला. तो करतानाच त्याने मनाचे ‘त्रिस्तरीय मॉडेल’ सर्वांपुढे मांडले. सन 1900 मध्ये ‘The Interpretation of Dreams’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले तेव्हाच त्यात ‘मनाचा हा शोध’ ही प्रसिद्ध झाला.
त्याच्या म्हणण्याप्रमाणे मनाचे तीन कप्पे असतात. आतील अजागृत/सुप्तावस्थेतील अंतर्मन, बाहेरील जागृत बाह्यमन, या दोन्हींच्या मध्ये अर्धजागृत मन असे म्हणता येईल. जागृत मनाच्या भागात जे काही असते ते त्या व्यक्तीला भाषेतून किंवा आपल्या वागण्या-बोलण्यातून पूर्णपणे व्यक्त करता येते. मधल्या भागात अर्थजागृत कप्पा असतो. त्या भागात दडलेल्या गोष्टी या थोडे जास्त एकाग्र होऊन व पूर्ण लक्ष एकवटल्यास व्यक्त करू शकतो.
उदा. आता मला एकदम कोणी विचारले की तू चौथ्या इयत्तेत असताना कोणते शिक्षक/शिक्षिका तुला शिकवायला होते? तर त्याचे उत्तर थोडे लक्ष एकवटल्यावर, एकाग्रता वाढवल्यावर नक्कीच देता येऊ शकते. आपल्या सुप्त इच्छा, आकांक्षा, आकर्षणे, दु:ख, राग या भावना किंवा अन्य तत्सम स्मृती मनाच्या या सुप्त अंतर्मनात असतात, ज्या दैनंदिन जीवनात आपल्याला जागृतावस्थेत जाणवत नाहीत. परंतु काही वेळा स्वप्नांद्वारे किंवा काही अन्य मानसिक लक्षणांद्वारे त्या बाहेर येऊ शकतात. मनाचा हा अभ्यास आणखी पुढे नेल्यावर मग सिग्मंड फ्रॉइडने तीन कप्प्यांच्या मॉडेलऐवजी तीन स्तरांवर काम करणारे मनाचे भाग सांगितले. त्याला त्याने बालक मन , पालक मन , व चालक मन ,अशी नावे दिली.
बालक मन हे हट्टी बालकाप्रमाणे असते. इच्छा आता लगेच पूर्ण व्हायला पाहिजेत असे ते हट्टी असते. तर पालक मन हे नैतिक पोलिसाप्रमाणे, ‘असे करू नये, हे करू नको.’ असे सांगणाºया पालकाप्रमाणे काम करत असते. या परस्परविरोधी भूमिकांमध्ये बºयाचदा मग मनात द्वंद्व उभे राहते. त्यातून मार्ग काढण्याचे काम हे मॅनेजरचे म्हणजे चालकाचे इगोचे असते. त्यासाठी त्याने अनेक संरक्षणात्मक हत्यारेही इगोकडे देत मनाला त्रास होणार नाही अशी काळजी पण घेतली आहे. हे चालक मन ही हत्यारे कशी प्रभावीपणे, कौशल्याने वापरते यावर मनाचा त्रास कमी होणार की वाढणार हे अवलंबून असते.
या सगळ्या मनाच्या शोधात पुढे एरिक एरिक्सन, मेलिनी क्लीन, एरिक बर्न यासारख्या मानसशास्त्रज्ञांनी आपल्या कल्पना मांडून त्याच विस्तारल्या. मास्लोची सेल्फ अ‍ॅक्च्युअलायझेशन थिअरी वगैरेद्वारे हा प्रवास पुढे येत आता अ‍ॅरन बेकची ‘The Interpretation of Dreams’, त्याहीपुढे जाऊन अल्बर्ट एलिसची फएइळ- रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थिअरी म्हणजे सदसद्विवेकवर्तन पद्धतीपर्यंत हा प्रवास आला आहे. मनाच्या मशागतीसाठी, सशक्तीकरणासाठी आत्तापर्यंतची ही सर्वोत्तम पद्धत आहे, असे मात्र नक्की म्हणता येईल!