आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी असहाय साक्षीदार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मला पक्कं माहीत नव्हतं की बापाला पण लेबर रूमममध्ये जाऊ देतात, पण जाऊ देत नसतील असं मनाच आलं नाही. प्रत्यक्ष जन्माच्या वेळी तिथे मला माझ्या बायकोसोबत उपस्थित राहायचंच होतं कारण बाळ आमच्या दोघांचं असलं तरी वेदना तिला एकटीलाच सहन करायच्या होत्या. मी किमान तिच्या साेबत तरी राहू शकत होतो.
डाॅक्टर आमच्या नात्यातल्याच होत्या, त्यामुळे परवानगीचा प्रश्न नव्हता पण त्यांनी मला रक्त वगैरे बघून भीती वाटत नाही याची खात्री करून घेतली होती! तो अनुभव पूर्णपणे अचंबित करणारा आणि लीन करणारा होता. माझी कितीही इच्छा असली तरी मला बायको जे सहन करत होती, ते पूर्णपणे कळणं अशक्य होतं. मग मी तिला जसं जमेल तसं शांतवण्याचा प्रयत्न करत होतो. पण एक असहाय साक्षीदार म्हणून त्या वेदना आणि धडपड माझ्या कळण्यापलीकडची होती. आता अडचण अशी होती की डाॅक्टर नात्यातल्या असल्याने तिथे खाजगीपणाच नव्हती काही.
माझी सासू जवळपासच होती. पण तरीही बाळ बाहेर येतानाच्या तीव्र वेदनांच्या वेळी माझ्या मनगटात घुसलेली नखं अजून विसरू शकलेलो नाही मी. वेदना व्यक्त करताना बायको जे काही अपशब्द, अस्सल मराठी व इंग्रजी, वापरत होती त्यामुळे लेबर रूममधलं वातावरण जरा हलकंफुलकंही होतं, कारण सासू आत आली की ती गप्प राहायची नि बाहेर गेली की पुन्हा सुरू. सगळ्यात भारी क्षण होता बाळ बाहेर आलं तेव्हा. मी मुलगी व्हावी म्हणून प्रार्थना करत होती आणि बायकोला हवा होता मुलगा. आणि तिच्याआधी मीच बाळाला पाहिलं. माझ्या फुललेल्या चेहऱ्याकडे पाहूनच तिला कळलं की मुलगी झालीय. हा एक अनुभव असा होता, जो आमचा दोघांचा विशेष होता.
मी नीटसं सांगू नाही शकणार की या अनुभवामुळे माझा एकूणच इतर महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला की नाही. पण बाळंतपणाची प्रक्रिया आणि वेदना यांची मला नीटच जाणीव झालेली आहे. आणि आता मुलगी मोठी होताना पाहत असताना इतरही गोष्टींकडे मी अधिक सहृदयपणे पाहू शकतोय. शेवटचं सांगतो, आई आणि बाळाला जोडणारं जे काही नातं आहे, ते एक बापसुद्धा जोडू शकत नाही.
पुण्यातल्या एका डाॅक्टरांनी त्यांच्या पंजाबी मित्राची गोष्ट सांगितली. हा पंजाबी पुरुष, देखणा, धिप्पाड वगैरे. जन्माची प्रक्रिया पाहून त्याची पहिली प्रतिक्रया होती, अबे, अब मैं सेक्स ही नहीं कर पाऊँगा. इतकं अपराधी वाटतंय, माझ्यामुळे तिला हे सहन करावं लागतंय. डोक्टरांना वाटतं की पुरुषांनी जन्म पाहिला पाहिजे, आणि त्यासाठी पूर्वतयारी केली पाहिजे. नाहीतर तुम्ही नुसतेच बाळाचे फोटो काढाल आणि पुढच्या कामाला लागाल.