आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Racipies Of Summer Items By Bhagyashree Kulkarni

वाळवणातील खान्देशी प्रकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उन्हाळा अाला की महिलांची लगबग सुरू हाेते, वाळवणाचे पदार्थ करण्याची. पाहुया काही खान्देशी प्रकार...
उन्हाळा अाता चांगलाच तापायला लागला अाहे. उन्हाळा अाला की महिलांची लगबग सुरू हाेते, वर्षभर पाऊस अाणि थंडीने काेठीत बंद असलेलं सामान वाळवण्याची तयारी सुरू हाेते. त्याचबराेबर वर्षभर लागणारे काेरडे खाद्यपदार्थ बनविण्याचा हा काळ असल्याने महिला याची तयारी करीत असतात. काॅलनी, गल्ली किंवा नातेवाईक मिळून एकमेकांचे पापड, कुरडई, शेवया अाणि असे बरेच पदार्थ बनवत असतात.

ग्रामीण भागात प्रत्येक घरात हे पदार्थ या दिवसात तयार केले जातात. खान्देशात या गाेष्टींना जरा जास्त मागणी अाहे. अनेकांना जमते तर काहींना जमतही नाही. बाजारातून िवकत घेण्यावरही महिलांचा कल असताे.
साबुदाणा चकली
साहित्य- १ किलो साबुदाणा, ३ किलाे बटाटा, जिरे, मीठ, तिखट.
कृती- रात्री साबुदाणा भिजत घालावा. सकाळी बटाटा उकडून किसून त्याचा लगदा करावा. बटाट्याचा लगदा व भिजलेला साबुदाणा पुरणाच्या यंत्रातून एकत्र काढून घ्यावा. नंतर या मिश्रणात जिरे, चवीनुसार मीठ अाणि तिखट घालावे. हे एकत्र करून चकलीच्या साेऱ्याने प्लॅस्टिकच्या कागदावर टाकावे. वाळल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवावे.
पुढील स्लाइड्वर वाचा, इतर पदार्थांबाबत..