Home | Magazine | Divya Education | rahul kapoor success mantra for life

सक्सेस Mantra : मर्यादा तोडून अधिक मजबुतीने पुढे व्हा

राहुल कपूर | Update - Oct 26, 2015, 03:00 AM IST

अपयशाची भीती आम्हाला नवे प्रयत्न करण्यापासून रोखते. रिजेक्शन वा नामंजुरीची भीती दुसर्‍यांचे समर्थन मिळवण्यापासून रोखते. बदलाला भीती प्रतिकूल बनवून टाकते.

 • rahul kapoor success mantra for life
  अपयशाची भीती आम्हाला नवे प्रयत्न करण्यापासून रोखते. रिजेक्शन वा नामंजुरीची भीती दुसर्‍यांचे समर्थन मिळवण्यापासून रोखते. बदलाला भीती प्रतिकूल बनवून टाकते. आकलनाच्या भीतीपासून आम्ही निष्क्रिय होऊन जातो आणि जखमी होऊ ही भीती आम्हाला आपल्याच प्रतिभेच्या वापरापासून रोखते. याप्रकारे विविध भीती आम्हाला प्रतिदिन मारत असते. लक्षात ठेवा भीती ही दु:खाला जन्म देते आणि शक्ती आशा जागवते. त्या साधारण रहस्यांना जाणणे जी शक्ती उत्पन्न करते प्रत्येक व्यक्तीचा नैतिक अधिकार असतो. काही मूलभूत मुद्दे जे यशस्वितेच्या प्रवासात आपल्याला दीपस्तंभ ठरू शकतात...

  यात राहा सावधान
  यशस्वितेच्या मार्गात अशीही वेळ येऊ शकते जेव्हा लोक आपली खिल्ली उडवतील वा आपल्या योग्यतेवर संशय घेतील. त्या लोकांपासून सावध राहत तुम्हाला मजबूत बनायचेय जे सांगतात हे शक्य नाही, तुमचे डोके फिरलेय का, तुम्ही इथे काहीही करू शकणार नाही. असे लोक मनात शंका उत्पन्न करतात. समोरच्याला वा आपल्याला कमजोर बनवतात आणि आपली स्वप्ने नष्ट करतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा वा त्यांना नजरअंदाज करा. शक्य असेल तर अशांपासून स्वत:ला दूर ठेवा आणि वाचवा.

  यांना घ्या आपल्या बरोबर
  यांच्याऐवजी अशा लोकांची संगत निवडा जे आपल्यातील आत्मविश्वासाला मजबुती देतील. जे हे सांगून आपल्याला धीर तसेच प्रोत्साहन देतील की, मला विश्वास आहे, तुम्ही ते काम करू शकता. जीवनात अशा लोकांमुळेच आपली ऊर्जा दुप्पट होत असते. ते आपल्याला आणखी जास्त विश्वासाने आपल्या लक्ष्याकडे वेगाने सरकवतात. असे लोक आपले प्रभाव वर्तुळ म्हणवले जातात.

  तक्रार करू नका
  महानतेच्या शोधात अनेकदा धक्के सहन करावे लागतातच आणि अपयशाचाही सामना करावा लागतो. याला खेळाचाच एक भाग समजा. यासाठी कुठलेही बहाणे शोधू नका, हा खेळाचा एक भागच माना. यासाठी तक्रारी करू नका आणि परिस्थितीचा स्वीकार करा. यापासून काही शिका. प्रत्येक अनुभवापासून शिका आणि त्याला चांगल्या नजरेने पाहा जे आपण
  यादरम्यान मिळवले.

  राहुल कपूर
  लेखक आणि प्रेरक वक्ते

Trending