आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Rajarshi Shahu Maharaj Scholarship For The Shodule Caste Students

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्पर्धा परीक्षा: अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण आयुक्तालयांतर्गत असणा-या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देशांतर्गत शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी देण्यात येणा-या राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थी-उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
शिष्यवृत्तीची संख्या व तपशील : या योजनेअंतर्गत उपलब्ध असणा-या शिष्यवृत्तींची संख्या 100 असून, त्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

अभ्यासक्रम विभागीय शिक्षण मंडळानिहाय शिष्यवृत्ती एकूण संख्या
* पदवी अभ्यासक्रम 10 80
* पदप्युत्तर पदविका/पदवी 2 16
* राज्य स्तरावरील पदविका/

राज्यस्तरावर 12वीच्या परीक्षेत पदवी अभ्यासक्रम. गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी
एकूण शिष्यवृत्तीची संख्या 100

* आवश्यक पात्रता : अर्जदार विद्यार्थी खालीलप्रमाणे पात्रताधारक असावेत.
* विद्यार्थ्यांनी 10 वी व 12 वीची परीक्षा महाराष्ट्र राज्य विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातून उत्तीर्ण केलेली असावी.
* पदवी अभ्यासक्रमाच्या शिष्यवृत्तीसाठी 12वीच्या परीक्षेतील व सीईटीमधील गुणांची टक्केवारी विचारात घेतली जाईल व त्या गुणानुक्रमे विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. अर्जदार विद्यार्थ्यांनी 12 वी व सीईटी परीक्षेत किमान 55% गुण मिळविणे आवश्यक राहील.
* पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीच्या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची पदवी अभ्यासक्रमातील गुणांची टक्केवारी विचारात घेतली जाईल. अर्जदार विद्यार्थ्यांनी पदवी परीक्षेत किमान 55% गुण मिळविणे आवश्यक आहे.
* अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी व नवबुद्धासह अनुसूचित जातीचा असावा.
* अर्जदारांच्या पालकाच्या उत्पन्नाची वार्षिक मर्यादा जास्तीत जास्त 4.50 लाख रुपये असावी.
* अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : शिष्यवृत्ती योजनेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी विभागीय समाजकल्याण अधिकारी, संबंधित जिल्ह्याचे विशेष जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा अथवा महाराष्ट्र शासनाच्या (www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळाला भेट द्यावी.
ल्ल अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज आयुक्त-समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, 3, चर्च रोड, पुणे 411001या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2013.
राज्यातील अनुसूचित जातीच्या पात्रताधारक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसह शिक्षण घेण्यासाठी या विशेष शिष्यवृत्ती योजनेचा जरूर फायदा घ्यावा.
कर्मचारी निवड आयोगातर्फे 12 वी उत्तीर्णांसाठी संधी
कर्मचारी निवड आयोगातर्फे बारावी उत्तीर्ण उमेदवारांची निवड करण्यासाठी घेण्यात येणा-या कंबाइंड हायर सेकंडरी लेव्हल (10+2) निवड परीक्षा - 2013 साठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत-
* आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदारांनी 10+2 शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
* वयोमर्यादा : अर्जदारांचे वय 27 वर्षांहून अधिक नसावे. वयोमर्यादेची अट अनुसूचित जाती-जमातींच्या उमेदवारांसाठी 5 वर्षांनी तर इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 3 वर्षांनी शिथिलक्षम आहे.
* निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर 10 नोव्हेंबर व 17 नोव्हेंबर 2013 रोजी घेण्यात येईल व त्यामध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, नागपूर, पुणे, नाशिक व अमरावती या परीक्षा केंद्रांचा समावेश असेल.
निवड प्रक्रियेत लेखी निवड परीक्षा, डाटा एंट्री कौशल्य परीक्षा व टंकलेखन परीक्षेचा समावेश असेल. निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणा-या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
* निवड आणि नेमणूक : निवड झालेल्या उमेदवारांना केंद्र सरकारच्या विविध आस्थापना आणि कार्यालयांमध्ये डाटा एंट्री ऑपरेशन अथवा कनिष्ठ श्रेणी कारकून म्हणून निर्धारित वेतनश्रेणीत इतर भत्ते व फायद्यांसह नेमण्यात येईल.
* अर्जासह भरावयाचे शुल्क : अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून 100 रु.ची निर्धारित टपालघरांमध्ये उपलब्ध असणारी केंद्र सरकारची रिक्रुटमेंट तिकिटे लावणे आवश्यक आहे.
* अधिक माहिती व तपशील : स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात अधिक माहिती, तपशील व अर्जाच्या नमुन्यासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 20 ते 26 जुलै 2013च्या अंकात प्रकाशित झालेली कर्मचारी निवड आयोगाची जाहिरात पाहावी.
ल्ल अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : महाराष्ट्रातील उमेदवारांनी संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील, कागदपत्र आणि परीक्षा शुल्कासह असणारे अर्ज रिजनल डायरेक्टर (वेस्टर्न रिजन), स्टाफ सिलेक्शन कमिशन, पहिला मजला, साऊथ विंग, प्रतीका भवन, महर्षी कर्वे मार्ग, मुंबई 400020 या पत्त्यावर 16 ऑगस्ट 2013 पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.
बारावी उत्तीर्ण उमेदवारांना केंद्र सरकारच्या सेवेत आपले करिअर सुरू करायचे असल्यास त्यांनी या स्पर्धा परीक्षेचा फायदा घ्यावा.
पंडित भीमसेन जोशी
युवा शिष्यवृत्ती योजना
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाद्वारे देण्यात येणा-या भारतरत्न पं. भीमसेन जोशी युवा शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत देण्यात येणा-या विशेष शिष्यवृत्ती योजनेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक युवा उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
* शिष्यवृत्तींची संख्या व तपशील : या योजनेअंतर्गत देण्यात येणा-या शिष्यवृत्तींची संख्या 12 असून, त्यामध्ये शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेणारे 6 व शास्त्रीय वादनाचे शिक्षण घेणारे 6 याप्रमाणे असणा-या शिष्यवृत्तींचा समावेश आहे.
* आवश्यक पात्रता : अर्जदार खालीलप्रमाणे पात्रताधारक असायला हवेत.
* मान्यताप्राप्त विद्यापीठाची संबंधित विषयातील पदवी अथवा गुरूंकडून शिक्षण घेतले असल्यास अशा शिक्षणाच्या कालावधीसह गुरूंचे शिफारसपत्र.
* उच्च शिक्षणाची माहिती व कालावधी व तपशील.
* कुटुंबाच्या आर्थिक उत्पन्नाचा तपशील व प्रमाणपत्र.
* आपल्या कलागुणांचा समावेश असणारी सीडी.
* निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना तज्ज्ञ समितीतर्फे, निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता व आर्थिक परिस्थितीच्या आधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
* शिष्यवृत्तीची रक्कम व कालावधी : निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या अभ्यासक्रमाच्या 2 वर्षे कालावधीसाठी दरमहा 5000 रु.ची शिष्यवृत्ती देण्यात येईल.
* अधिक माहिती व तपशील : योजनेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्र प्रकाशित झालेली महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाची जाहिरात पाहावी.
* अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील, कागदपत्र आणि सीडीसह असणारे अर्ज महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य संचालनालय, जुने सचिवालय, विस्तार भवन, पहिला मजला, म. गांधी मार्ग, मुंबई 400032 या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2013.
संगीत - वाद्यवादन क्षेत्रात विशेष शिष्यवृत्तीसह पदव्युत्तर अभ्यासक्रम करू इच्छिणा-या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती योजना फायदेशीर ठरू शकते.
सैन्यदलाच्या तांत्रिक विभागात महिलांसाठी संधी
सैन्यदलाच्या अभियांत्रिकी व तांत्रिक विभागात महिलांसाठी खालीलप्रमाणे संधी उपलब्ध आहेत.
* जागांची संख्या : एकूण उपलब्ध जागा 19.
* आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदार विद्यार्थिंनींनी सिव्हिल इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, मेकॅनिकल, प्रॉडक्शन, ऑटोमोबाइल इंजिनिअरिंग, एरोनॉटिकल, इंजिनिअरिंग, मेटॅलरर्जीकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन, टेलिकम्युनिकेशन, बायोटेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी, इन्फरमेशन टेक्नॉलॉजी यासारख्या विषयातील पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व त्या शारीरिकदृष्ट्या सक्षम असायला हव्यात.
* वयोमर्यादा : 27 वर्षे.
* निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना सैन्यदल निवड मंडळातर्फे अलाहाबाद, भोपाळ वा बंगळुरू येथे निवड प्रक्रिया, शारीरिक क्षमता चाचणी व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
* वेतनश्रेणी व फायदे : निवड झालेल्या उमेदवारांना सैन्यदलाच्या तांत्रिक विभागात लेफ्टनंट म्हणून दहमहा 15600-39100+5400 या वेतनश्रेणीत नेमण्यात येईल.
याशिवाय त्यांना सैन्यदलाच्या नियमांनुसार इतर भत्ते, फायदे व भविष्यकालीन बढतीच्या संधी उपलब्ध होतील.
* अधिक माहिती व तपशील : यासंदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 13 ते 19 जुलै 2013च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्यदलाची जाहिरात पाहावी अथवा सैन्यदलाच्या (www.joinindianarmy.nic.in) या संकेतस्थळाला भेट द्यावी.
* अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर 16 ऑगस्ट 2013 पर्यंत अर्ज करावेत.
ज्या महिला पदवीधर इंजिनिअर्सना सैन्यदलात प्रवेश घेऊन वेगळे करिअर करायचे असेल अशांनी या संधीचा लाभ घ्यावा.