Home | Magazine | Rasik | rajeev-tambe-balsahitya

इटलीतील बालसाहित्य जत्रा

राजीव तांबे, बालसाहित्यकार | Update - Jun 02, 2011, 01:40 PM IST

बोलोन्या येथे बालसाहित्याचे जणू छोटेसे जगच अवतरले होते. २३ देश, तिथले १८ प्रकाशक, लेखक, त्यांचे एजंट प्रकाशक असा सगळा जामानिमा तिथे हजर होता. यातल्या प्रत्येकामध्ये होती शिस्त, कुतूहल आणि ओसंडून वाहणारा अपार उत्साह...

  • rajeev-tambe-balsahitya

    आपल्या येथील पुस्तक प्रदर्शन किंवा जत्रा म्हणजे प्रचंड कोलाहल, धूळ, पुस्तकांच्या स्टॉल्समध्ये चिक्कार गर्दी, प्रकाशकांचे स्टॉल्स म्हणजे पुस्तकांचे रचलेले गठ्ठे व त्यांची मोठमोठी पोस्टर्स, वाचकांविषयी विशेष अनादर असणारे (काही अपवाद वगळून) पुस्तक विक्रेते, कुठलीच नेमकी किंवा ठोस माहिती न देऊ शकणारं माहिती केंद्र, वाचकांशी संवाद साधण्यास वेळ नसणारे किंवा उत्सुक नसणारे महान प्रकाशक व लेखक, 'आजची पिढी वाचतच नाही' म्हणणारे कुरकुरे प्रकाशक, माझ्या कवितेची दखलच घेतली जात नाही, असं सांगणारे चिरचिरे कवी, कुठल्याही ठिकाणी आणि कुठलाही विधिनिषेध न बाळगता मोठ्याने मोबाइलवर बोलणारी माणसं, कुठेही थुंकणारी, कचरा टाकणारी, चूळ मारणारी व हात पुसणारी 'सभ्य सुसंस्कृत' माणसं, आणि वेगवेगûया उच्च आवाजात दिल्या जाणाऱ्या घोषणा, सूचना, गाणी, चित्रविचित्र आवाज यांच्या एकत्रित परिणामाने तयार होणारा गच्च गलका....
    इतके सविस्तर सांगण्याचे कारण, इटलीतल्या बोलोन्या बुक फेअरला यातले काहीच नव्हते. (मुलांची पुस्तके असूनही मुले मात्र नव्हती; कारण ही बालसाहित्याच्या खरेदी-विक्रीची जागतिक बाजारपेठ होती. इथे लेखक, त्यांचे एजंट, प्रकाशक, प्रतिनिधी, चित्रकार आदींची जत्रा भरली होती) हजारो लोक असूनही अपार शांतता होती. स्टँडची मांडणी अत्यंत कलात्मक तर होतीच, पण त्या देशाचा ध्वज किंवा त्यांचा रंग, त्यांची वेशभूषा, हे ठळकपणे दिसेल असे होते. उदाहरणार्थ, तैवानचा स्टँड हा लाल रंगाचा व तैवानी वेशभूषेत त्याची स्वागतिका बसलेली. प्रत्येक स्टँडला स्वागत कक्ष पाहुण्यांसाठी काही काही गिफ्ट मुबलक प्रमाणात ठेवलेली. उदाहरणार्थ, आकर्षक काचपात्रात वेगवेगûया प्रकारची चॉकलेट्स, टॉफीज्, मिंटच्या गोळया किंवा सुक्या मेव्याची मिठाई.... काही ठिकाणी तर प्रकाशकांनी त्यांच्या पुस्तकातील नायक/ नायिकांचे ब्रँडिंग करणाऱ्या व खास मुलांसाठी तयार केलेल्या वस्तू ठेवलेल्या. उदाहरणार्थ, हेअरबँड, रिस्टबँड, की-चेन, पेपरक्लिप्स इत्यादी. ऑस्ट्रेलियन चित्रकारांच्या स्टँडने तर सगळयांना संध्याकाळच्या बिअर पार्टीचे छापील निमंत्रणच दिलेले. या एक विशेष गोष्ट मला जाणवली की, जर स्टँडमध्ये गर्दी असेल तर लोकं आत न जाता बाहेर शांतपणे उभे राहात. आतून पाच माणसं बाहेर आली की चार माणसं आत जात. यासाठी तिथे कुणी रखवालदार नव्हता, हा स्वयंशिस्तीचा भाग होता. प्रकाशकांच्या स्वागत कक्षातील व्यक्ती येणा:या प्रत्येक माणसाशी अत्यंत आदराने व विनयाने बोलायची, शक्य असेल तेवढी मदत करायची अणि विनम्रपणे नकार देताना हातात दोन चॉकलेट ठेवायची.
    बालसाहित्याचे छोटे जग प्रत्येक प्रकाशकाच्या स्टँडवर किमान पाच ते सहाजणांची एक टीम असे. यात संपादक, सहायक संपादक, लिटररी एजंट, हक्क वितरणाबाबत सल्लागार, स्टँडचा मांडणीप्रमुख आणि व्यवस्थापक. स्वागत कक्षात तुमचा प्रश्न जाणून घेऊन मगच संबंधित माणसाची वेळ ठरवून दिली जात असे. मी भारतीय आहे म्हणून मला कुठेही दुय्यम दर्जाची वागणूक मिळाली नाही किंवा माझे इंग्रजी बोलणे सफाईदार नाही म्हणून माझ्याकडे कुणा प्रकाशकाने दुर्लक्ष केले नाही. ठरलेल्या वेळेत आपले बोलणे ऐकून घ्यायला समोरचा माणूस अतीव उत्सुक असतो, याचा मला वारंवार प्रत्यय आला. 'मुले वाचत नाहीत' असे न म्हणता, 'मुलांनी आवडीने आणखी वाचावं यासाठी आम्ही हे-हे प्रयोग केले आहेत. तुम्ही आणखी नवीन काय सुचवाल?' आम्ही आणखी काय करावं? तुमच्याकडे काय करतात? असाच सकारात्मक सूर सगळयांच्या बोलण्याचा असायचा. यामुळे सगळी भेटणारी, दिसणारी माणसं आनंदी हसतमुख असायची. कुरकुरी-चिरचिरी माणसं मला तरी तिथे दिसली नाहीत. चीन, दक्षिण आफ्रिका, इराण, नैरौबी, सुदान, अशा काही प्रकाशकांच्या स्टँडवर फारशी गर्दी नव्हती. पण याबद्दल त्यांची प्रकार तक्रारही. काही प्रकाशक पहिल्यांदा प्रयोग म्हणून आले होते. ते पुढच्या वर्षी येणार का? अशी मला उत्सुकता होती. गप्पा मारताना तेसुद्धा म्हणाले, ''येणार तर. आम्हाला मार्केटचा अंदाज नव्हता. पुढच्या वेळी चांगली तयारी करून येऊ. बालसाहित्यजत्रेत अधिक रंग भरू!

Trending