आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीचा हिशेब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निवडणूक केव्हा आहे ते काही सांगू नकोस
सारं ठाव आहे मला
ती टीव्हीवाली बया
तेच तर दिवसभर बोंबलत असते.

अन् हो, कुणा पक्षाची
उगाच टिमकी वाजवत बसवू नकोस
सारेच एका माळेचे मणी
त्यांचं ऐकून ऐकून तर कान किटून गेलेत माझे

काय म्हणून त्यांच्यावर भरवसा ठेवू?
उद्याची वाट कशाला पाहू?
ते जे देत असतील ते आताच घेऊ!
निवडून आल्यावर ते काही देतील
या भ्रमात आपण कशाला राहू?

सत्ता मिळाल्यावर ते कशाला आमच्याकडे
पाहतील, आपल्याच धुंदीत राहतील
दिवसाढवळ्या या देशाला लुटतील
अन् आमच्यासारखे फाटकेतुटके लोक
हे सारं मुकाट्याने पाहत राहतील

त्यापरीस आताच हिशेब करून टाकू
माझ्या घरात मोजून बारा मते आहेत
त्या हिशेबाने पैसे द्या नि मोकळे व्हा

या वर्षी घरचे सारेच डबे खाली असल्यामुळे
दिवाळी केव्हा आली नि केव्हा गेली
हे कळलंच नाही

तुमचे पैसे आले म्हणजे
दोन-तीन महिने उशिरा का होईना
निदान दिवाळी तरी साजरी करू!
दोन गोड घास तरी मुलांच्या तोंडात भरू!अरे, द्राक्ष आंबट आहे!


बोल निवडणुकीचे!
मतामतांचा गलबला
एकच मत द्यावं कुणाला,
नेते लुटतात देशाला
आपण लुबाडू एकेकाला!

निवडणूकपूर्व युती
जणू सावित्री सती,
निवडणुकीनंतरची युती
जणू मोहतराचा पती!

महिला आरक्षण क्रांती आहे
ही केवळ भ्रांती आहे,
मस्तावलेल्या राजकारण्यांना
खुर्चीची धास्ती आहे!

मनी आहे खुर्चीची हाव
म्हणे मतदारा मला पाव,
अशाने मतदार पावायचा नाही रे
मतदार बाजारचा भाजीपाला नाही रे!

स्त्रिया अबला की सबला
हा प्रश्न गौण आहे,
आरक्षणाच्या प्रश्नावर
सारेच कसे मौन आहेत!

माया काय, ममता अन् जयललिता काय
सोनिया-सुषमा अन् नजमा काय,
साºया एकाच माळेचे मणी आहेत
महिला असूनही ‘विधेयकावर’ गप्प आहेत!

चार दिवस सासूचे, चार सुनेचे
म्हणताना स्वातंत्र्याची पन्नाशी उलटली,
नेत्यांनी दररोज दिवाळी साजरी केली
पण सासवा-सुनांना आरक्षण नाही दिले!
चित्रताºयांना वाटते
राजकारण सोपे आहे,
कुणी सांगावे कोल्ह्यांना
अरे, द्राक्ष आंबट आहे!

कुणी राष्ट्रवादी कुणी समाजवादी
कुणी धर्मनिरपेक्ष तर कुणी मनुवादी
महिला आरक्षणासाठी मात्र
नुसतीच वादावादी!
नागेश शेवाळकर । औरंगाबाद