आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणाच्या आईचा घो...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी प्रसारमाध्यमात आपली बाजू मांडताना म्हटले की, मी ज्ञानेश्वर विद्यापीठातून इंजिनिअरिंगची पदवी घेतली असली तरी व या पदवीला मान्यता नसल्याचे मला माहीत असूनही मी त्याचा कधीच गैरवापर केला नाही.

अर्थात, तावडे यांच्या युक्तिवादामुळे अनेकांचे समाधान झाले नाही. अशा असमाधानी लोकांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहता तावडेंना भविष्यात त्यांच्या डिग्रीवरून बरेच काही झेलावे लागणार, हे उघड आहे. सध्या त्यांच्यावर जो शाब्दिक मारा होतो आहे, त्याची झलक पुढीलप्रमाणे आहे…
- खोटं बोल, पण रेटून बोल, ढक्कलपास…
- तावडे भाजपचे असल्यामुळे ते चूक करूच शकत नाहीत. ते ग्रॅज्युएट झाले (असे मानूया) तेव्हा कोणाचं राज्य होतं? काँग्रेसचं! तर भक्तांनो, काँग्रेसला जबाबदार ठरवा. भाजपवर आरोप करणारे सर्व पत्रकार उथळ आहेत. किंबहुना भाजपवर आरोप करणारे हीच उथळपणाची व्याख्या आहे.
- तावडेंना दुसर्‍या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नव्हता का?
अर्थातच तावडेंच्या डिग्रीवर टीका करताना काहींनी एका ओळीच्या कोट्याही करण्यात कसूर ठेवलेली नव्हती…
- ज्ञानेश्वरे (विद्यापीठ) रचिला पाया, बीई (विनोद) झालासे कळस.
- एक वडा दोन पाव, विनोद तावडे म्यागीखाव…
- केवळ तीस दिवसांत बीई, आम्ही उगाच चार वर्षे वाया घातली…
- बीई करायला पाच वर्षे.. एटीकेटीही नाही घेतली बिच्चार्‍याने…
तावडेंनी ज्ञानेश्वर विद्यापीठामधून डिग्री घेतल्याचे पडसाद एवढे उमटत गेले की, एका पोस्टमध्ये, ज्ञानेश्वर विद्यापीठ आणि येल युनिव्हर्सिटी यांच्यात सामंजस्य करार झाला असून या दोन विद्यापीठांनी परस्परांच्या पदव्यांना समकक्षता दर्जा मिळेल, अशी घोषणा देऊन धमाल उडवली…

- अब तो उठिए ‘प्रभु’...
गेल्या वर्षी संयुक्त राष्ट्रांनी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून जाहीर केला होता. गेल्या आठवड्यात रविवारी हा दिवस दिल्लीतील राजपथ येथे हजारोंच्या उपस्थितीत साजरा केला गेला. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगासनांची काही प्रात्यक्षिके करून दाखवल्याने टीव्हीमुळे घरघर मोदीसन पोहोचले. सोशल मीडियात या दिनाच्या निमित्ताने संमिश्र प्रतिक्रिया होत्या. लोकांनी सेल्फीच्या माध्यमातून योगासनाचे फोटो टाकले. अनेक ट्विटर व फेसबुक युजरनी मोदींच्या स्तुतीपासून त्यांची हेटाळणी करण्यापर्यंत कसर सोडली नाही. मोदींनी आपल्या केंद्रीय मंत्रिमंडळातील सहकार्‍यांना भारतात ठिकठिकाणी योग प्रचारासाठी पाठवले होते. या मंत्र्यांच्या फोटोवर कमालीच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत होत्या. भाजपमधील बहुतांश मंत्री ढेरपोटे असल्याने त्यांनी केलेल्या विविध योगासनांनी सोशल मीडियाची करमणूक झाली. खुद्द मोदी चुकीचे योग प्रकार करत असल्याचे अनेक फोटो व्हायरल झाले. यावर कडी झाली ती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केलेल्या शवासनाची. सुरेश प्रभू शवासन करताना झोपून गेले व त्यांना जागे करण्यासाठी एक जण प्रयत्न करत असल्याचा फोटो सोशल मीडियात आला व त्यावर हजारो प्रतिक्रियांचा पाऊस पडला…
-अब तो उठिए ‘प्रभु’...
- रेल्वे को सुलाने के बाद ये खुद सो गये…
- प्रभु, आप घोर निद्रासन में गये हैं….
बातम्या आणखी आहेत...