आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानवतेचा 'सुषमा'विष्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुषमा स्वराज यांची उतू चाललेली मानवता आणि मॅगी नूडल्सला श्रद्धांजली आणि फिल्म इन्स्टिट्यूटवर ‘युधिष्ठीर’ गजेंद्र चौहानांची नियुक्ती या तीन घटनांनी सोशल मीडियावर गेला आठवडा दणाणून गेला…

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आयपीएलचे प्रणेते ललित मोदी यांना व्हिसाप्रकरणी माणुसकीच्या भावनेतून मदत केल्याच्या आरोपामुळे सोशल मीडियातला गेला आठवडा गाजला. मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रातल्या भाजपच्या सरकारला हा पहिलाच जबर धक्का होता. कारण ज्या नैतिकतेच्या बळावर भाजपने काँग्रेसवर सातत्याने टीका केली होती, त्यात पक्षाचा एक बडा नेता अडकल्याने केवळ सुषमा स्वराज यांची नव्हे तर भाजप व संघपरिवाराचीही कोंडी होताना दिसली. हे प्रकरण मीडियात झळकल्यानंतर ट्विटरवर सुषमा स्वराज यांनी आपल्या माणुसकी दाखवल्याच्या निर्णयाचे समर्थन केल्यामुळे ट्विटकऱ्यांना आयतेच कोलीत हाती मिळाले. पण सुषमा स्वराज यांना पाठिंबा देणारा #StandWithSushmaSwaraj या ट्विटर ट्रेंडने विरोधकांना उत्तरे देण्याचेही प्रयत्न केले. अर्थातच या निमित्ताने सुषमा स्वराज यांची खिल्ली उडवणारे शेकडो ट्विट पोस्ट केले गेले.
मेरे को अमेरिका जाना है, मानवीय आधार पे सुषमाजी मुझे भी विसा दिलवा दो…
यू ओन्ली इन्स्पायर ऑल टेररिस्ट अँड मिलिटंट टु बी इन क्यू टु गेट सच बेनेफिट ऑन ह्युमॅनिटेरिअन ग्राऊण्ड. किप इट-अप सुषमा!
इफ दाऊद वॉण्टस टु विजिट मुंबई टु मीट हिज एलिंग सिब्लिंग, विल यू फेसिलिटेट दॅट ऑन ह्युमन ग्राऊण्ड?
मैडम ऐसा लग रहा है जैसे Blue Corner नोटिस पहाड़गंज से issue हुआ था… भारत सरकार की तरफ से नहीं…
यू आर सुश-मा… यू हॅव डन द जॉब ऑफ ए मदर. विच इज अबाऊ ऑल पॉलिटिक्स… सो रिलॅक्स… लेट मीडिया इट इट्स ओन डर्ट…

मॅगीला श्रद्धांजली
मॅगीवरील बंदीमुळे सोशल मीडिया दु:खात होते. प्रसिद्ध लेखक चेतन भगत याची पोस्ट बरेच काही सांगून जाणारी होती… व त्याला दिलेले उत्तरही समर्पक होते…
मॅगी नूडल्स इज नाऊ फेसिंग दी बिगेस्ट अँड फास्टेस्ट पीआर डिझास्टर इन दी सोशल मीडिया एजय कुक्ड इन लेस दॅन २ मिनिट्स धीस टाइम… या पोस्टला मिळालेले उत्तर आणखीनच मजेशीर होते, सर ये भी सच्चाई है कि अगर मैगी का पैकेट आपकी किताब के ऊपर रख दें तो 2 मिनट से भी पहले पक जाता है।
बातम्या आणखी आहेत...