आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : वाचा, पडद्यामागच्या \'शोले\'ची संपूर्ण कथा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१५ ऑगस्ट १९७५... १५ ऑगस्ट २०१५... ४० वर्षे... चार दशके... आणि आठ पिढ्या... (एक पिढी पाच वर्षांनी बदलते, हा हिशेब जमेस धरून) असं सारं उलटून गेलं, तरीही ‘शोले’ नावाचा सिनेमास्कोप चमत्कार आजही प्रेक्षकांवर प्रभाव राखून आहे. हा प्रभाव व्यक्तिरेखांचा आहे, खटकेबाज-ठसकेबाज संवादांचा आहे, दिलखेचक लकबींचा आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या दृश्यांचा आहे.

‘शोले’ हा हिंदी चित्रपटसृष्टीच्या व्यावसायिक यशाला नव्या उंचीवर घेऊन जाणारा मसालापट आहेच, परंतु या सिनेमाने समाजाच्या मानसिकतेचा अचूक वेध घेतला आहे आणि कालानुरूप उत्क्रांत होत गेलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रचंड ताकदीचे दर्शनही घडवले आहे. जनप्रिय सिनेमांच्या प्रवाहातला क्लासिक म्हणून गौरवल्या गेलेल्या ‘शोले’ने चित्रपटसृष्टीबाहेरच्या असंख्य लाेकांची आयुष्य बदलून आणि उजळवून टाकली आहेत. यातले कुणी सर्वाधिक वेळा ‘शोले’ बघितला म्हणून प्रकाशझोतात आले आहे, तर कुणी ‘शोले’ सुरू असलेल्या थिएटरबाहेर तिकिटं ‘ब्लॅक’मध्ये विकून श्रीमंत झाल्याच्याही दंतकथा आहेत. हे सगळंच एखाद्या परिकथेत शोभणारं आहे आणि गंमत म्हणजे, ही परिकथा एेकायला-सांगायला आवडणारे आजही आपल्या आसपास वावरत आहेत... चाहत्यांच्या नव्या-जुन्या पिढ्यांना जोडणाऱ्या या चार दशकांपूर्वी घडून आलेल्या ‘शोले’ नामक चमत्काराची उकल करण्याचा हा सर्वस्पर्शी प्रयत्न...