आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घर का भेदी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टापटीप, स्वच्छता आणि सौंदर्यप्रसाधने या तर महिलावर्गाच्या प्रिय गोष्टी; परंतु त्याखातर वापरल्या जाणा-या घातक रसायनांचा संसर्ग होऊ शकतो. योग्य तो परिणाम साधण्यासाठी बहुतेक सौंदर्यप्रसाधनांत कृत्रिम रसायनांचाच वापर केला जातो. ब-याच सौंदर्यप्रसाधनांत घातक अशा शिशाच्या संयुगांचा समावेश असतो. नखांवर एकजिनसी थर तयार होण्यासाठी नायट्रोसेल्युलोज हे स्फोटकांमध्ये वापरले जाणारे रसायन नेलपॉलिशमध्ये मिसळले जाते. केसांच्या रंगकामासाठी वापरल्या जाणा-या प्रसाधनांत हायड्रोजन पेरॉक्साइड, अमोनिया अशी घातक द्रव्ये असतात. घामावर उपाय म्हणून डिओडरंट वापरले जातात. त्यात अ‍ॅल्युमिनिअमची घातक संयुगे असतात. कांती गौरवर्णी दिसण्यासाठी वापरल्या जाणा-या क्रीममध्ये हायड्रोक्विनॉन हे कर्करोगाला कारणीभूत ठरणारे रसायन असते.
मानवी आरोग्यास घातक असणा-या काही प्रदूषितांची यादी सोबत देत आहे. सूक्ष्म धूलिकण, कार्बन मोनॉक्साइड, ऑक्सिडंट्स, नत्र आणि गंधक भस्मे, फ्लुराइड्स, हायड्रोकार्बन्स, शिसे, बेरेलियम, पॉलिसायक्लिक ऑरगॅनिक्स (पीसीओ), हायड्रोजन सल्फाइड, क्लोरीन, हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड, अर्सेनिक, कॅडमियम, निकेल, मँगेनीज, झिंक, तांबे, बेरियम, पारा, बोरॉन, सिझियम, क्रोमियम, कीटकनाशके, जीवाणू, विषाणू, किरणोत्सारी पदार्थ. बांधकाम, प्रसाधने आदींमधून यातील काही प्रदूषितांचा प्रसार होत असतो. तसेच खाद्यपदार्थांतूनही काही प्रदूषितांच्या संपर्कात माणूस येऊ शकतो. सौंदर्यप्रसाधनांप्रमाणेच ‘खाद्या’ची बदलती जीवनशैली प्रदूषितांना आमंत्रणच देत असते. खाद्यपदार्थांतूनच प्रदूषणाचा संसर्ग झाला तर? टिंड फूड आणि शीतपेयांत प्रिझर्व्हेटिव्ह वा चवीसाठी मिसळलेले पदार्थ आरोग्यघातकही असू शकतात. जंक फूड याचाच भाग. ऑस्ट्रेलियातील शालेय विद्यार्थ्यांना प्रोजेक्टसाठी ‘जंक फूडला पर्याय कोणता?’ हा विषय देण्यात आला होता. आपली न्यायसंस्थादेखील या बाबतीत अश्वासक पावले उचलत आहे, जागृती आहे.
प्रदूषणाच्या संपर्कामुळे उद्भवणारे विकार सर्वसाधारणपणे असे -
  त्वरित उद्भवणारे विकार : सर्दी, पडसे, खोकला, न्यूमोनिया, हगवण, पटकी (कॉलरा), डोळ्यांची आग, जळजळ, खरूज, नायटा, अ‍ॅलर्जी इ.
  प्रदूषणाच्या ब-याच काळ संपर्कामुळे उद्भवणारे विकार : हृदयरोग, कॅन्सर, बहिरेपणा इ.
  तत्काळ उद्भवणारे विकार मुख्यत: : शरीराच्या पाच संस्थांशी निगडित आहेत
  पचनसंस्था : पचनसंस्थेशी संबंधित विकार हे मुख्यत: अन्न व पाण्यातील प्रदूषणांशी निगडित आहेत. उर्वरित चार संस्थांच्या विकारांना हवेतील प्रदूषण कारणीभूत आहे.
  श्वसनसंस्थेच्या विकारांना कारणीभूत प्रदूषिते : हायड्रोजन सल्फाइड, कार्बन मोनॉक्साइड, ओझोन, फ्लुराइड्स, बेरियम, बोरॉन ऑक्साइड, हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड, क्लोरीन, क्रोमियम, सिलिका, सेलेनियम, अर्सेनिक, निकेल, कॅडमियम, शिसे, पारा, नत्र व गंधक भस्मे, (रड७ & ठड७), तंतू (फायबर्स)
  घसा हे श्वसनसंस्थेचे प्रवेशद्वार असल्याने घशाच्या विकारांना कारणीभूत प्रदूषिते वरीलप्रमाणेच.
 डोळ्यांच्या विकारांना कारणीभूत प्रदूषिते सर्वसाधारणपणे वरीलप्रमाणेच अधिक अमोनिया.
  त्वचा : सर्वसाधारणपणे श्वसनसंस्थेच्या विकारांना कारणीभूत प्रदूषितेच.
बुरशी, जीवाणू, विषाणू यासारखे जैविक धूलिकण; तसेच पाळीव प्राण्यांच्या विष्ठा, केस यांमधूनही प्रदूषणाचा प्रसार होऊ शकतो. बंदिस्त जागेत वावरणारा माणूस अगर प्राणी प्रदूषणाचा स्रोत बनू शकतो. काही सेकंद बोलण्यामुळे अडीचशे-तीनशे जीवाणू तोंडाबाहेर पडून ते हवेत मिसळतात. खोकल्याच्या उबळीतून तीन-चार हजार जीवाणूंचा प्रसार होऊ शकतो आणि शिंकेद्वारे चार हजार ते दहा हजार. त्यामुळेच गर्दी हा घातक घटक ठरतो. एका अभ्यासानुसार कार्यालयातील 1 घनमीटर हवेत 300 ते 3000 जीवाणू आढळून आले. शाळेच्या वर्गांतून दीड ते तीन हजार तर वर्कशॉपमध्ये चार हजारांवर. (सर्वात जास्त आढळले, दंत चिकित्सालयात). बंदिस्त जागेतील प्रदूषणाच्या दृष्टीने काम करण्याच्या जागांचाही विचार करावा लागतो.