आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सल्लूची बॉडी!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काय रं गड्या, आसं तोंड पाडून का रं बसलायंस? आज तालमीला गेला न्हाय का? काय सांगू मित्रा, आरं कालच्याला बाजूच्या गावात गेल्तो कांदापोह्याच्या कार्यक्रमाला, न्हाय म्हनलं, यंदा कर्तव्य हाय आपलं. आरं व्वा! मंग ह्ये काय त्वांड पाडून सांगायची गोष्ट हाय का? आरं पर फुडं तर ऐक. तिकडच्या मंडळींनी इच्यारलं, काय कमावत्यात हुनारे जावईबापू? म्हनलं तालिम करून शरीर कमावतो. तसं उखडला ना थेरडा. हे काय कमाई म्हनायची म्हणाला. मला वाटलं जरा विंग्लिशमध्ये सांगावं म्हंजी म्हाता-यावर वजन पडंल. म्हटलं म्या ‘बॉडीबिल्डर’ हाय. चुलीत घाल ती बिल्डींग आस्सं म्हणत म्हाता-यानं पार हाकलून दिलं ना. आता मला सांग मित्रा, त्यो आपला सलमान खान निस्त्या बॉडीवर नवनवीन पोरी फिरवतोय. आधी कटरिना, मग कटरिनाचीच बहीण नी आता कोण ती अँजेला जॉन्सन. शिनेमात नव्या येणा-या पोरी ह्येच्याच जाळ्यात गावतात. ह्योच समद्यांचं करिअर मार्गी लागवतो. आत त्येच्याइतका हॅँडसम दिसत नसलो तरी माझी बॉडी काय सलमानपरिस कमी न्हाय. मला कटरिना नको की अँजेलापन नको, पर काळीसावळी मुलगी बी कोन देईना आसं झालयं. असो, सल्लूमिया इतरांसाठी पन कायतरी ठेवा.