आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

द इथिकल डाॅक्टर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाजच्या वैद्यकीय व्यवसायाचे वास्तव चित्रण ‘द इथिकल डाॅक्टर’ या पुस्तकातून मिळते. सरकारी अाणि वैद्यकीय व्यवसायात असणारा भ्रष्टाचार, विविध चाचण्यांसाठी हाेणारी कमिशनखाेरी, डाॅक्टर अाणि अाैषध कंपन्यांचे साटेलाेटे, सरकारी वैद्यकीय रुग्णालयांची असलेली दुरवस्था याचे वास्तव चित्रण या पुस्तकात डाॅ. कमलकिशाेर महावार यांनी केले अाहे. पाॅवर (राजकीय सत्ता) अाणि नाॅलेज (ज्ञान) यांच्यातील संंबंध अाणि त्याचा अाैषधनिर्मिती कंपन्यांवर हाेणारा परिणाम, याचा उलगडा या पुस्तकात केला अाहे. डाॅक्टरांची कट प्रॅक्टिस, त्यांच्याकडून करण्यात येणाऱ्या अनावश्यक चाचण्या अाणि लिहून देण्यात येणारी अाैषधी, काॅर्पाेरेट अाैषधनिर्मिती कंपन्या अाणि वैद्यकीय साहित्य निर्माण करणाऱ्या कंपन्यांचे डाॅक्टर अाणि दलालांशी असलेले संबंध यांच्यावर परखड लिखाण या पुस्तकात अाहे. पुस्तकात केवळ समस्या व प्रश्नच मांडलेले नाही तर त्यावर उपायही सुचवलेले अाहेत. वैद्यकीय शिक्षणापासून प्रशासकीय यंत्रणेपर्यंत काय बदल हवे? यावर अभ्यासपूर्ण मत लेखकाने मांडले अाहे. मग त्यात रुग्णांसाठी तक्रार निवारण केंद्र उभारणे, मेडिकल काैन्सिलची पुनर्रचना करणे, व्यवसायात पारदर्शकात येण्यासाठी जबाबदारी निश्चित करणे, वैद्यकीय तपासणीचे शुल्क निश्चित करणे, केंद्रीय ड्रग कंट्राेल बाेर्डाची पुनर्रचना करणे, यावर स्वतंत्र प्रकरण दिले अाहे.
द इथिकल डाॅक्टर
प्रकाशक : हारपेर काेलिन्स पब्लिकेशन
लेखक : कमलकुमार महावार
किंमत : ~ ३५०/-
बातम्या आणखी आहेत...