आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ratnamala Thakur, Dr. Pravin Ugile, Shraddha Mujumdar Columns About Chailhood Memory

खेळायचे राहूनच गेेले...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संक्रांतीचा पतंगोत्सव
माझी कन्या अर्चना हिच्या सासरी येवल्याला दरवर्षी संक्रांतीला मोठा पतंगोत्सव असतो. मी व दोघे नातू येवल्याला गेलो होतो. तेथे बरीच पाहुणे मंडळी, नातेवाईक गावोगावाहून आली होती. मुलीने अर्ध्या पोत्याला चुरमुऱ्याचा चिवडा, बेसन लाडू, तिळाच्या वड्या, फरसाण अशी मोठी तयारी करून ठेवली होती.
मस्त जेवण झाल्यावर मुले पतंग उडवायला गच्चीवर गेली. जावयांनी १०० पतंग, चकऱ्या, मांजा आणून ठेवला होता. पण संक्रांतीला वारा नसल्याने सगळे लवकर खाली आले. संध्याकाळी ओल्या भेळचा बेत होता. त्यामुळे मुले खूश झाली. रात्री मसालेभात होता. किंक्रांतीच्या दिवशी खूप वारा सुटला होता. सकाळी ओले बिरडे व गोड दूध, तिखट धिरडे, मसाला खोबरे व बटाटे भाजी केली होती. दुपारी सर्व जण पतंग उडवायला वर गेले. तेथे उंच इमारती नाहीत. त्यामुळे चहूकडे पतंगोत्सव गच्चीवर चालू होता. संध्याकाळी दोन्ही बाळांचे बोरन्हाण झाले. संध्याकाळी फटाकडे, भुईनळे, बाण उडत होते. आकाश कंदिलासारख्या बलूनमध्ये दिवा लावून ते वर उडवत होते. वारा असल्याने ते उंच जात होते. आकाशात असे दिवेच दिवे, रंगीत पतंग, फटाक्यांच्या चांदण्या अशी मोठी मौज दिसत होती. एकीकडे गाणे लावले होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व जण त्या गाण्याच्या तालावर फेर धरून नाचत होतेे. रात्री गच्चीवरच पावभाजीचा बेत झाला. असा मोठा आनंद घेऊन आम्ही नगरला आलो.
रत्नमाला ठाकूर, अहमदनगर
उर्वरीत..., पुढील स्लाइड्सवर...