आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साक्षी महाराजांचा अवकाळी \'भूकंप\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेपाळमधील भूकंप, राहुल गांधी यांची रेल्वे यात्रा व साक्षी महाराज यांचे राहुल यांच्या संबंधातले कथित वादग्रस्त विधान यामुळे सोशल मीडिया ढवळून निघाला होता. त्यात ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याने त्यांनी केलेल्या इंग्रजीतील भाषणावरही मराठी सारस्वत व वाचकांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटल्या.
नेपाळमधील भूकंप, या भूकंपाने उद्ध्वस्त झालेले काठमांडू शहर, सगळीकडे आणीबाणी, बचावकार्य याचा आँखो देखा हाल जेवढा टेलिव्हिजन कव्हर करत होता तसा सोशल मीडियाही अग्रेसर होता. व्हॉट्स अप आणि ट्विटरचे महत्त्व अशा प्रसंगात दिसून आले. एव्हरेस्टच्या बेसकँम्पवर दरड कोसळल्याचे पहिले वृत्त व नंतर व्हिडिओ ट्विटरमुळे जगापुढे आला. संपूर्ण सोशल मीडिया नेपाळच्या दु:खात सहभागी झाला असताना भाजपचे वादग्रस्त वक्तव्य करणारे साक्षी महाराज जे काही बरळले त्याने सोशल मीडियाचा ट्रेंड एकाएकी त्यांच्यावर केंद्रीत झाला व साक्षी महाराजांची दे दणादण धुलाई सुरू झाली.

साक्षी महाराज काय म्हणाले?
‘राहुल गांधी गोमांस (बीफ) खातात. त्यांच्या केदारनाथ दौऱ्यामुळे नेपाळमध्ये भूकंप झाला…’
साक्षी महाराजांच्या या वक्तव्याने लोकांच्या हातात आयते कोलीत मिळाले व सोशल मीडिया त्यांच्यावर बरसला...
काय बोलता साक्षी महाराजसाहेब? आपल्याकडे पहिल्यापासून जवाहरलाल नेहरू स्टेडियम, इंदिरा गांधी एअरपोर्ट, राजीव गांधी
सी लिंक आहे. आता ‘राहुल गांधी अर्थक्वेक’ असं तुम्हाला म्हणायचंय का?
निसर्ग कधीकधी असे रंग दाखवतो की, तो आपत्ती घडवून आणतो. आपण निसर्गाच्या शक्तीपुढे हतबल आहोत, पण जगण्यासाठी संघर्ष आवश्यक आहे... आपण हे सत्य स्वीकारायचे व पुढे चालत राहायचे… मित्रांनो, हे विधान भूकंपाबद्दलचे नाही तर साक्षी महाराजांबद्दलचे आहे…
साक्षी महाराज यांनी भाजपला अशी विनंती केली आहे की, राहुल गांधी यांना पक्षात एक अस्त्र म्हणून सामावून घ्यावे; जेणेकरून भविष्यात शत्रूच्या भूमीत त्यांना पाठवून भूकंप घडवता येईल.
मित्रांनो, यापुढे साक्षी महाराजांना मूर्खपणाचे विनोद व्हॉट्सअपवर पाठवण्याचे बंद करा... ते आपले विनोद त्यांची प्रतिक्रिया
म्हणून वापरतात…
साक्षी महाराज, तुम्ही दाखवलेल्या संवेदनांबद्दल आभारी आहे. गायींना पण हायसे वाटले. त्याही रडू लागल्या आहेत…
साक्षी महाराजांनी उद्या खरोखरीच शहाणपणाची प्रतिक्रिया दिली तर त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागेल…
साक्षी साहेब… येत्या रविवारी माझ्या घरी मच्छी व चिकनहंडीचा बेत आहे. त्यामुळे माझ्यावर कोणती नैसर्गिक आपत्ती येऊ शकते...? सांगाल का?
०००००००
साक्षी महाराजांनी नेपाळ भूकंपाच्या निमित्ताने सोशल मीडिया हादरवून टाकला खरा; पण राहुल गांधी यांनी पंजाबमध्ये रेल्वेच्या जनरल बोगीतून प्रवास करताना लोकांशी संपर्क साधला. मीडियानेही नेपाळची बातमी अर्धवट सोडून राहुलच्या मागे धावण्याचा प्रयत्न केला. या प्रवासात राहुल गांधी काही मुलांना स्वाक्षरी देत असल्याचा फोटो रिलीज झाला आणि हा फोटो व्हायरल होऊन त्याच्यावर भरमसाठ प्रतिक्रिया पडल्या...
— आयला… आता लोक राहुलचा ऑटोग्राफही घ्यायला लागले...!
— राहुलला कृपया विचारा की, त्याने तिकिट काढलेय का? मला वाटते, तो विदाऊट तिकिट प्रवास करतोय…
— राहुलच्या आजीने १९७७मध्ये जे काही केले त्याचे तो अनुकरण करतोय...
— राहुलने सुटीत ‘पोगो’ पाहायचे सोडून दिलेय कदाचित... तो झुकझुक गाडीत बसलाय…
— मोदी जर मेट्रोतून प्रवास करत असतील तर राहुलने किमान ट्रेनने तरी प्रवास करायला हवा ना…
— राहुल जे काही करतोय ते सीरियसली करतोय.. तो मोदींसारखा फोटोशॉप प्रचार तरी करत नाही…