आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Readers Response To Madhurima Divya Marathi, Madhurima,

वाचकांचा प्रतिसाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मधुरिमाच्या पाककृती विशेषांकामधील सर्व रेसिपी उत्तम होत्या. मावा जिलेबीची रेसिपी विशेष आवडली.
— गिरीश रावळ¿नाशिक

मधुरिमामधील विषय भावले.
— नीलम भिंगार

मधुरिमा वाचून काहीतरी नवीन वाटले. नाहीतर आजकालच्या वर्तमानपत्रात कुठल्याही विषयांवर छापून येते.
— चेतन भावसार शहादा

‘मला आनंद येथे मिळतो’ हा लेख फार आवडला. कारण स्पर्धेमुळे खरं जीवन जगणं विसरून चाललो आहोत आपण, असं वाटतं.
— अश्विनी शिंदे तुळजापूर

मधुरिमामधील ‘आद्य कॉप्युटर प्रोग्रॅमर’, ‘आजीचं परफेक्ट मॅनेजमेंट’ हे लेख खूप आवडले.
— शैलेश कंकाळ बुलडाणा

वंदना धनेश्वर यांची ३० आॅक्टोबरच्या अंकातील ‘चौकटीबाहेरची स्त्री पाहायला शिकलो’ ही कव्हर स्टोरी आवडली. पहिली लाइव्ह निवडणूक, तसेच इतरही लेख आवडले.
— निळकंठ शिंदे सांगोला

मधुरिमामधील सर्वच लेख अतिशय सुरेख आणि मनाला पटणारे असतात. समाजातील सर्वच विषयांचा पुरवणीमध्ये समावेश करण्याचा संपादकीय टीमचा प्रयत्न स्तुत्य आहे. मधुरिमाच्या रूपाने आम्हा वाचकांना अशा अभ्यासपू्र्ण लेखांची मेजवानी दिल्याबद्दल दिव्य मराठीचे आभार.
— यशपाल पवार अंमळनेर

मधुरिमाचे सर्व लेख छान वाटले. सर्वांसाठी छान उपक्रम राबवल्याबद्दल दिव्य मराठीचे हार्दिक अभिनंदन.
— शीतल थावरे औरंगाबाद

वंदना धनेश्वर यांचा ‘चौकटीबाहेरची स्त्री पाहायला शिकलो’ हा लेख खूप आवडला. स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला यामुळे नक्कीच मदत होईल, यात शंकाच नाही.
— अनिल वामोरक अमरावती

२३ आॅक्टोबरच्या मधुरिमामधील दारूमुक्तीवरील सर्वच लेख आवडले. ‘सफर अमृतसरची’ हा लेखही फार आवडला.
— योगेश शेटे बीड

मधुरिमाच्या रांगोळी विशेषांकामधील झटपट रांगोळी ट्रिक्स खूप आवडल्या. मी ट्रायसुद्धा करून पाहिल्या. धन्यवाद मधुरिमा.
— स्वाती सोनवणे सोलापूर

मधुरिमामधील दारूबंदीवरील सर्वच लेख सामाजिक वास्तवावर प्रकाश टाकणारे होते. यामधील विजय सिद्धेश्वर लिखित ‘दारूमुक्तीची जबाबदारी कुणाची’ हा लेख वाचून मन अस्वस्थ झाले. व्यसनाधीनता हा समाजाला लागलेला शाप आहे. दारूमुक्तीची जबाबदारी फक्त महिलांची नसून ती आपल्या सर्वांची आहे. त्यासाठी समाजाने एकजूट व्हायला हवे. व्यसन माणसाला माणसापासून तोडते, पशुत्वाकडे नेते, हे जाणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनीही व्यसनमुक्त समाजासाठी आपल्या भजन, कीर्तन आणि प्रवचनांमधून जागृती केली होती. हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून दारूमुक्तीची केंद्रे उघडायला हवीत. सरकारनेही दारू पिण्यासाठीचे परवाने देणे रद्द केले पाहिजे.
— बलभीम सोनटक्के सोलापूर