आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅरियाट्रिक सर्जरीने दिली संजीवनी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

किशोरवयातही माझं वजन 100 किलोच्या आसपास होतं, पण कधी एका जागी बसून राहण्याची सवय नसल्यामुळे अतिरिक्त वजनाचं ओझं कधी जाणवलं नाही. अभियांत्रिकी शाखेत पदवीधर होईपर्यंत वजनाचा काटा 115 किलोपर्यंत पुढे गेला होता. साधारणपणे 200७ मध्ये व्यवसायवाढीच्या उत्साहात माझे काही निर्णय चुकले ताण कमी करण्यासाठी विरंगुळा म्हणून, खाण्याचे प्रमाण वाढले वजनकाटा पुढे सरकला. 1९3 किलोंपर्यंत वाढले होते. यामुळे घोरण्याचे प्रमाण खूप वाढले. इतके की इतरांना भीती वाटावी. शिवाय दिवसभर थकवा वाटणे, सतत झोप येणे हेही सुरू झाले. बसल्याजागी इतकी प्रचंड झोप यायची की या त्रासामुळे ड्राइव्हिंग करणेही सोडून दिले होते. पुढे जाऊन उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू झाला आणि भरीस भर म्हणून सेल्युलिटीसची समस्याही उद्भवली. या समस्येमुळे माझ्या दोन्ही पायांवर लालसर रंगाचे फोड आणि पुरळ उठले.

हळूहळू हे पुरळ आणि फोड इतके वाढत गेले की त्यातून सतत पाणी येत असे. उपचार करणा-या त्वचारोग तज्ज्ञांनी सांगितले की हे सर्व त्याच्या स्थूल प्रकृतीचे परिणाम आहेत. वजन कमी करण्यासाठी आता केवळ व्यायाम आणि नियंत्रित आहार पुरेसा नाही, ही गोष्ट लक्षात आली होती. त्यामुळे सिद्धेश यांनी सप्टेंबर 2011 मध्ये, त्यांची बहीण भूलतज्ज्ञ डॉ. धुरू यांच्या सल्ल्याने, मार्गदर्शनाकरिता डॉ.रमण गोएल यांची भेट घेतली. डॉ. गोयल हे भारतातील ज्येष्ठ आणि प्रख्यात बॅरियाट्रिक सर्जन आहेत. त्यांनी सिद्धेशला सांगितले की ज्यांचा बीएमआय 3७ पेक्षा अधिक असतो, अशा अतिस्थूल व्यक्तींना वजन कमी करायचे असेल तर बॅरियाट्रिक सर्जर्री हा एकमेव उपाय आहे. मात्र, शस्त्रक्रिया करण्याची सिद्धेशची मानसिक तयारी होत नव्हती.

सहा महिने मी जेवण कमी करून किंवा टाळून वजन घटवण्याचा प्रयत्न केला. अर्थात त्याचा फायदा तर झालाच नाही, उलट दुष्परिणामच वाढले. एकीकडे त्यांचा सेल्युलिटीसचा आजार वाढत होता, ज्यामुळे पायांमध्ये खूप वेदना होत असत तर दुसरीकडे यकृताचा आकारही वाढलेला होता. त्यातच 2012 मध्ये होळीच्या दरम्यान सिद्धेशना अचानक शीतज्वर (इन्फ्ल्युएंझा) झाल्याप्रमाणे त्रास होऊ लागला. ताप, थंडी, घाम येणे ही सगळी लक्षणे यामध्ये दिसत होती, पण याचे कारण मात्र वेगळे होते. आधीपासूनच असलेला स्टाफ इन्फेक्शन हा संसर्ग आता पेशींच्या ग्रंथी आणि रक्तप्रवाहामध्येही पसरलेला होता आणि त्यामुळे सिद्धेशची प्रकृती अशी अचानक बिघडली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पत्नीने बॅरियाट्रिक सर्जर्रीचा निर्णय घेतला. महिनाभर मला उच्च पोषणमूल्ये प्रथिने असलेला आहार देण्यात येत होता. ९ एप्रिल, 2012 रोजी हिंदुजा रुग्णालयामध्ये स्लीव्ह गॅस्ट्रोक्टोमी ही शस्त्रक्रिया केली.


बॅरियाट्रिक सर्जर्रीचा हा एक प्रकार आहे. जवळपास ही शस्त्रक्रिया साडेचार तास सुरू होती. या शस्त्रक्रियेत रुग्णाच्या उदराच्या डाव्या बाजूस काप देऊन तिथे केळ्याच्या (बाही) आकाराचा एक अवयव तयार करण्यात येतो. डॉक्टरांच्या मते, यापुढेही माझे वजन वाढू शकेल, पण आता त्याचे प्रमाण पूर्वीसारखे असणार नाही. कारण या शस्त्रक्रियेमध्ये उदरास नळीसारखा आकार दिल्याने ते एका विशिष्ट मर्यादेपलीकडे वाढू शकत नाही. शस्त्रक्रियेनंतर मला केवळ लिंबू पाणी, नारळाचे पाणी, सूप एवढाच आहार दिला जात होता. याचे उत्तम परिणाम दिसून आले. 15 दिवसांत त्यांचे वजन ८ ते ९ किलोंनी कमी झाले होते आणि महिनाभरात 21 किलो वजन घटले होते. इतकेच नाही, तर पुढे दर महिना ८-९ किलो या गतीने, माझे वजन कमी होऊन वजन काटा ९८ किलोंपर्यंत येऊन पोहोचलेला आणि वजन ८८ किलो आहे.
योग्य व मोजकाच आहार, रोजचा न चुकता 45 मिनिटांचा केलेला व्यायाम आणि जोडीला औषधे आहेच. इतकेच नव्हे तर आज ते एखाद्या सर्वसामान्य निरोगी व्यक्तीसारखे आयुष्य जगत आहेत. वजन कमी झाल्यामुळे शरीराचा जडपणा कमी झाला, झोप योग्य प्रमाणात मिळते, स्लीप ऐप्निया आणि त्याचा त्रासही संपलेला आहे. विशेष म्हणजे या सगळ्यांमुळे आत्मविश्वास वाढला.एक सकारात्मक दृष्टिकोन घेऊन मी आयुष्याची वाटचाल पुनश्च सुरू केली आहे.