Home | Magazine | Madhurima | recipe-pallawi

रेसिपी

पल्लवी शेट्ये, पुणे | Update - Jun 04, 2011, 12:36 PM IST

गव्हाच्या रव्याची खिचडी...

 • recipe-pallawi

  गव्हाच्या रव्याची खिचडी
  साहित्य .
  गव्हाचा रवा किंवा लापशी रवा एक वाटी, पाव ते अर्धा वाटी (आवडीनुसार आणि सोसेल त्या प्रमाणात) दाण्याचे कुट, जिरे चमचाभर, हिरवी मिरची फोडणीत चवीनुसार, मीठ - साखर चवीनुसार, पाणी, ओले नारळ किंवा सुक्या खोब:याचा कीस दोन चमचे सजावटीसाठी, कोथिंबीर आणि फोडणीसाठी तेल किंवा तूप.
  कृती .
  ही पाककृती तीन प्रकारे करता येते.
  1. गव्हाचा रवा अडीच तास पाण्यात भिजवून ठेवावा. कढईत तेल किंवा तूप गरम करून त्यात जि-याची फोडणी करावी. मिरची घालावी आणि रव्यातले पाणी पिळून तो रवा घालावा. रवा भरभर हलवावा लागतो. नाहीतर तो कढईला चिकटतो. त्यात दाण्याचे कूट, मीठ, साखर घालावे. कोथिंबीर घालावी आणि झाकण ठेवून दोन वाफा काढाव्यात. सजावटीसाठी आणि चवीसाठी वरून खोब-याचा कीस घालावा. खाण्यापूर्वी रवा पुरेपूर शिजला आहे ना, याची खात्री करून घ्यावी. हा रवा शिजायला भरपूर वेळ लागतो. ही खिचडी साबुदाण्याच्या खिचडीसारखी लागते. भरपूर पौष्टिक आहे. गव्हाचा रवा असल्याने पोटभरीची होते. जेवणासाठी एकच पदार्थ करून खायचा असल्यास उत्तम पर्याय आहे. या सोबत आपण दही किंवा ताकही खाऊ शकतो.
  2. अचानक पाहुणे आले किंवा अगदी अचानक ही खिचडी करायची असेल तर छोट्या कुकरमध्ये करावी.

  करडईची चटणी
  साहित्य .
  २ - ४ स्वच्छ धुतलेली हिरवीगार करडईची पाने, अर्धी वाटी कोथिंबिरीची पाने. धुऊन चिरलेल्या कोथिंबिरीच्या जुडीत बरेचदा उत्तम कोवûया काड्याही असतात. त्यातही भरपूर हरितद्रव्य असते आणि कोथिंबिरीचा स्वाद त्याही काड्यांना येतो म्हणून अशा कोवळ्या काड्याही वापरता येतील. चार लसणाच्या पाकळ्या, चवीपुरते मीठ आणि साखरेऐवजी चार भिजवलेल्या मनुका.
  कृती .
  करडईची पाने, कोथिंबिरीच्या काड्या अथवा पाने, लसणाच्या पाकळ्या, मीठ आणि मनुका एकत्र करून मिक्सरमधून बारीक वाटावे. वाटण्यासाठी गरज असल्यास जरुरीपुरते पाणी वापरावे. हिरवीगार चटणी तयार होते. या चटणीतून आपल्याला भरपूर हरितद्रव्य, थंडावा मिळतो. उन्हाळ्यासाठी तो आपल्याला आवश्यक असतो. अशा चटण्यांमुळे जेवणाची लज्जत वाढते आणि तोंडाला चव येते.

  ज्वारीच्या कण्यांचा उपमा
  साहित्य .
  १ वाटी ज्वारीच्या कण्या (या बाजारातही उपलब्ध असतात किंवा गावभागात घरीही कांडल्या जातात) , १ मिरची, फोडणीपुरते तेल किंवा तूप. चिमटीभर जीरे, पाव चमचा हिंग, चवीसाठी मीठ, किंचित साखर, अडीच वाट्या पाणी, चमचाभर दाण्याचे कूट, सजावटीसाठी खोब-याचा कीस आणि कोथिंबीर.
  कृती .
  ही कृती आपण थेट छोट्या कुकरमध्ये करू शकतो. तसे केल्यास ती पटकन होते आणि कमी वेळेत शिजते. गॅस मंद आचेवर ठेवावा. छोट्या कुकरमध्ये फोडणीपुरते तेल किंवा तूप घालावे. त्यात जि-याची फोडणी करावी. फोडणीत हिंग, मिरची घालावी आणि त्यावर धुतलेल्या ज्वारीच्या कण्या परताव्यात दोन मिनिटांनी त्यात पाणी, मीठ, साखर घालावे, उकळी आल्यावर दाण्याचे कूट घालावा आणि कुकरचे झाकण लावावे. दोन शिट्ट्या काढाव्यात. दहा मिनिटांत ही पाककृती तयार होते. वर सजावटीसाठी खोब:याचा कीस आणि कोथिंबीर घाला. खाण्यास पौष्टिक आणि ताकद देणारी आहे. याने कधीही घशाशी येत नाही.

Trending