आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आणि दोन दिवसांत बंद झाले शौचावाटे रक्त पडणे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मला आठवते त्याप्रमाणे ऑगस्ट 2003 ची ही घटना असेल. आम्ही नित्यवर्षाप्रमाणे पैठण येथे महालक्ष्मी सणासाठी गेलो होतो. त्याच्या आधीपासून माझा मुलगा कौस्तुभ हा नेहमी तक्रार करायचा की मला संडासाद्वारे रक्त पडते. मी विचार केला की, पाय वाकडा-तिकडा पडला असेल किंवा उडी मारली असेल त्यामुळे गाठ सरकली असेल व त्यामुळे त्याला एखादेवेळी संडासाद्वारे रक्त पडले असेल म्हणून मी दुर्लक्ष केले, परंतु महालक्ष्मी सणासाठी आम्ही पैठण येथे गेलो असता कोस्तुभला संडास लागली म्हणून तो गेला त्या वेळी त्याला रक्त पडले होते व तो रागारागाने मला म्हणाला की बघा मी तुम्हाला म्हणालो ना की मला रक्त पडते हे बघा मी पाहून चकितच झालो कारण तोपर्यंत मी फक्त ऐकून होतो की त्याला रक्त पडते.


तेव्हा मी तातडीने निर्णय घेऊन औरंगाबादेतील एका मोठ्या रुग्णालयात अ‍ॅडमिट केले. डॉक्टरांनी चेक करून त्याच्या पोटात अ‍ॅपेंडिक्ससारखे असे काहीतरी सांगितले, परंतु मला त्याचे सांगणे नीट समजले नाही त्याचे ऑपरेशन करावे लागेल म्हणून सांगितले. मी हो म्हणालो दोन दिवसांनंतर त्याचे ऑपरेशन झाले. दोन दिवस संडासाद्वारे रक्त पडले नाही. म्हणून मी सुखावलो होतो, परंतु दोन दिवसांनंतर परत त्याला रक्त पडू लागले. मी त्याला परत रुग्णालयात नेले तेव्हा डॉक्टरांनी तपासून पाहिले व काही काळजी करू नका बरे होईल. मी चिंताग्रस्त असताना माझा चुलत भाऊ एल. जे. दहिभाते हा मला भेटला. त्याला मी चिंताग्रस्त दिसल्याने त्याने मला विचारले झाला प्रकार मी त्याला तपशीलवार सांगितला. तो म्हणाला माझे एक ओळखीचे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. त्यांना तू दाखवून बघ मी लगेच होकार दिला कारण परिस्थितीच तशी होती. माझा मुलगा कोस्तुभ आजाराने खूप त्रस्त होता. आम्ही त्या डॉक्टरांकडे गेलो त्यांनी तपासून दोन दिवसांच्या गोळ्या दिल्या. आणि ते म्हणाले जर बरे वाटले तर माझ्याकडे या नाहीतर नको आणि काय आश्चर्य त्याचे शौचावाटे रक्त पडणे बंद झाले व त्याला चांगले वाटू लागले. विशेष म्हणजे तेव्हापासून ते आजपर्यंत त्याला संडासाद्वारे रक्त पडण्याचा त्रास झाला नाही.