आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Recruitment In Hindi Translator And Hindi Professor

हिंदी भाषांतरकार व हिंदी प्राध्यापक पात्रता परीक्षा : 2013

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्मचारी निवड आयोगातर्फे हिंदी भाषांतरकार व हिंदी प्राध्यापक पात्रता परीक्षा-2013 साठी पात्रताधारकांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
* आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदार खालीलप्रमाणे पात्रताधारक असायला हवेत.
* हिंदी भाषांतरकार निवड परीक्षा : अर्जदारांनी हिंदी वा इंग्रजी या विषयांसह पदवी पूर्ण केलेली असावी व त्यानंतर हिंदीमधील पदव्युत्तर पदवी घेतलेली असावी.
* हिंदी प्राध्यापक पात्रता परीक्षा : हिंदी व इंग्रजीसह पदवी व हिंदीतील पदव्युत्तर पात्रता पूर्ण केलेली असावी व त्याशिवाय ते बीएड पात्रताधारक असायला हवेत आणि त्यांना शैक्षणिक क्षेत्रातील कामाचा 2 वर्षांचा अनुभव असायला हवा.

* वयोमर्यादा : वय 30 वर्षांहून अधिक नसावे. वयाची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी शिथिलक्षम आहे.
* निवड पद्धती : अर्जदरांपैकी पात्रताधारक उमेदवारांना निवड परीक्षेसाठी बोलावण्यात येईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर 2 जून 2013 रोजी घेणात येईल व त्यामध्ये मुंबई केंद्राचा समावेश असेल. त्यानंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
* अर्जासह पाठवायचे शुल्क : अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून 100 रु.ची निर्धारित टपाल घरांमध्ये उपलब्ध असणारी रिक्रुटमेंट तिकिटे लावणे आवश्यक आहे.
* अर्जाचा नमुना व अधिक माहिती आणि तपशील : अर्जाचा नमुना, अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 23 ते 29 मार्च 2013 च्या अंकात प्रकाशित झालेली कर्मचारी आयोगाची जाहिरात पाहावी.
* अर्ज पाठवण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि रिक्रुटमेंट तिकिटासह असणारे अर्ज रिजनल डायरेक्टर (वेस्टर्न रिजन), स्टाफ सिलेक्शन कमिशन, पहिला, मजला, साऊथ विंग, प्रतिष्ठा भवन, 101, महर्षी कर्वे मार्ग, मुंबई-400020 या पत्त्यावर पाठवण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल 2013.
हिंदीतील पदवी व पदव्युत्तर पात्रताधारक उमेदवारांना भाषांतरकार अथवा हिंदी प्राध्यापक म्हणून काम करायचे असल्यास त्यांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा.