आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वमनोत्सव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंचकर्म हे अगदी सर्वपरिचित नाव आहे. पंचकर्मातील पाच कर्मापैकी सर्वात पहिले व महत्त्वाचे कर्म म्हणजे वमन पंचकर्म हे आयुर्वेद शास्त्राचे शास्त्र आहे. शरीरातील अनावश्यक घटक शरीराला त्रास न देता शरीराबाहेर काढणे ही क्रिया पंचक्रर्माद्वारे साध्य केली जाते. शरीर शुद्धी अथवा साध्या भाषेत आपल्या दोष धातू मलाने भरलेल्या या देहाची साफसफाई करणे म्हणजे पंचकर्म करून घेणे होय.

या पाच कर्मापैकी वमन या श्रेष्ठ कर्म करून घेण्याचा काळ म्हणजे वसंत ऋतू की जो आता येऊ घातला. अशा वेळी वमन करवून घेणे येत्या 2 महिन्यांत शक्य असते. म्हणून त्याच्या ऋतूच्या आरंभी त्याचा उत्सव एका अभिनव प्रकारे अहमदनगर शहरामध्ये साजरा करणार आहोत. त्याचे नाव वमनोत्सव! वमनाबद्दल अनेक समज-गैरसमज आहेत. फक्त उलटीचे औषध असते. खूप त्रास होतो. त्रास झाल्यास आजार वाढेल काय, मला जमेल का करायला खूप महाग आहे... वगैरे, वगैरे अनेक गैरसमज आहेत. मग नक्की आयुर्वेद शास्त्रानुसार कशाप्रकारे वमन करावे व त्याचा फायदा कसा होतो. किती सहज वमन होते. या सर्वांबद्दल माहिती या उत्सवामध्ये मिळणार आहे.

वमन हे एक प्रकारचे ऑपरेशन असते. त्याच्या आधी व नंतर अनेक नियम पाळावे लागतात. मात्र, हे जर सर्व मनापासून केले व 10-12 दिवसांचा हा उपक्रम करवून घेतला तर खूप औषधे वारंवार घेणे सारखे आजारी पडणे, उत्साह कमी होणे असे त्रास होत नाहीत. तसेच स्वास्थ्य टिकून राहते. व वर्षभर पुन्हा फारशा तब्येतीच्या तक्रारी असत नाहीत. अर्थात दिनचर्येचे नियम पाळले तरच! अशा प्रकारची वमनाबद्दलची सखोल माहिती व मार्गदर्शन दिव्यस्पर्श अभ्यंग केंद्र येथील संचालक, तज्ज्ञ वैद्य करणार आहेत. सदर वमनोत्सव 24 बेब्रुवारी 2013 रविवार रोजी सायंकाळी 4 ते 8 या वेळात रावसाहेब पटवर्धन स्मारक सभागृह, प्रोफेसर कॉलनी, सावेडी येथे साजरा केला जाणार आहे. प्रथम 4 ते 7 वाजेपर्यंत आयुर्वेदाचा वैद्यकीय व्यवसाय करणारे अनुभवी वैद्य आपल्यास वैयक्तिक मार्गदर्शन व शिबिर अशा स्वरूपात मांडणी करण्यात येणार आहे. शेवटी सायं. 7 ते 8 या अखेरच्या 1 तासात प्रत्यक्ष चर्चासत्र व सामुदायिक मार्गदर्शन तथा श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली जातील.