Home | Magazine | Divya Education | requirement in media business information

१५ लाख व्यावसायिकांची मागणी आहे मीडिया उद्योगात

दिव्य मराठी | Update - Dec 28, 2015, 03:00 AM IST

शावेळेत जेव्हा अनेक अमेरिकी वृत्तपत्र ऑनलाइन आवृत्त्यामध्ये परिवर्तित झालेले असताना, भारतीय वृत्तपत्र उद्योग मात्र तेजीत आहेत.

 • requirement in media business information
  शावेळेत जेव्हा अनेक अमेरिकी वृत्तपत्र ऑनलाइन आवृत्त्यामध्ये परिवर्तित झालेले असताना, भारतीय वृत्तपत्र उद्योग मात्र तेजीत आहेत. रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्स फॉर इंडिया की सूचीमध्ये ८२,००० हून अधिक वृत्तपत्रांची नांेदणी झालेली आहे. ज्यात साधारणत: ३३,००० हिंदी वृत्तपत्र आहेत. देशात ८,००० हून अधिक नोंदणीकृत प्रकाशनेदेखील आहेत. केपीएमजी इंडियाच्या माहितीनुसार पुढील काही वर्षात प्रादेशिक वृत्तपत्र १२ ते १४ टक्के वर्षाला या प्रमाणात वाढतील. इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा विचार केला तर विविध भाषांतील ४०० हून अधिक वृत्त वाहिन्या आहेत. याशिवाय डिजिटल मीडियाचे आकडेदेखील हे समाधान आनंद देतात की, या उद्योगात कामासाठी अगणित संधी देतात. अर्थात हा आव्हानात्मक व्यवसाय कामाचे अधिक तास, डेडलाइन आणि विशिष्ट कौशल्याची हा व्यवसाय मागणी करतो. जिथे आपल्याला बेहिशेबी मानसिक श्रमासाठी रात्रंदिवस तयार राहावे लागेल.

  पाहिजेत लाखो व्यावसायिक
  रोजगाराची गोष्ट कराल तर सेंटर फॉर मीडिया स्टडी असेसमेंटनुसार भारताला १५,००,००० मीडिया व्यावसायिकांची आवश्यकता आहे. पण ही समस्या प्रत्येकच उद्योगांना जाणवते की टॅलेंटेड वर्कफोर्स (कौशल्यपूर्ण कार्यशक्ती) ची कमतरता. अधिकतर मीडिया हाऊसेस नवी आवृत्ती लाँच करताहेत आणि नव्या बाजारपेठेत प्रवेश करताहेत. त्यांना प्रशिक्षित लोकांची गरज आहे, पण ते या कमतरतेला पूर्ण करू शकत नाहीत. जेव्हा की या क्षेत्रात शिक्षण देणाऱ्या संस्थानांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत वेगाने वाढत आहे. यूजीसीद्वारा मान्यताप्राप्त साधारणत: २०० ते ३०० कॉलेज व विद्यापीठांमध्ये वृत्तविद्या आभ्यासक्रम उपलब्ध केलेला आहे. ४०० ते ५०० अतिरिक्त कॉलेजही जर्नालिझम प्रोग्राम्स शिकताहेत, पण क्वांटीटीचे क्वालिटी दर्जेदार शिक्षणाशी काही देणे घेणे नाही असे दिसते. प्रॅक्टिकलएेवजी थेअरीवर अधिक फोकस हे या अभ्यासक्रमाच्या वाईट दर्जाचे एक मोठे कारण आहे.

  गरज आहे इन डेप्थ नॉलेज, रायटिंग स्किल्स
  एक पदव्युत्तर पदवी वा पदविका आपल्याला पत्रकाराच्या रूपात करिअर सुरू करण्याची संधी देते. खरेतर जर्नालिस्ट काही विशिष्ट गुणांच्या आधारावरच घेतले जातात वा भरती केले जातात. सूचना आधारित या उद्योगाचा भाग बनण्यासाठी ज्ञानाची माहिती वाढवण्याची गुंतवणूक केली पाहिजे. महत्त्वपूर्ण मुद्द्यांची तपशीलवार (इन डेप्थ् नॉलेज) माहिती आणि लिखाणाचे कौशल्य हे गरजेचे आहे. एका चांगल्या पत्रकाराला वाचण्याची आवड असणे फार गरजेचे आसते. आता मीडिया संस्थान एडिटिंग, कॅमेरा, स्क्रिप्टिंग येण्यासारखे कौशल्य असलेल्या उमेदवारांची दर्जेदार अपेक्षा करताहेत. अशातच देशात उत्तम मीडिया स्कूल्सची मर्यादित संख्या असल्या कारणाने मग भावी उमेदवार हे सर्व नौकरीच्या दरम्यानच शिकतात.

  व्यावसायिक आव्हाने
  हे इथे समजून घेणे गरजेचे आहे की, जर्नालिझमशी जोडलेले ग्लॅमरच या व्यवसायाची एकमात्र वास्तविकता नाही, तर खूपसा संघर्ष आणि आव्हानेदेखील मीडियाच्या नोकरीशी जोडलेले असतात. अशात मग फक्त ग्लॅमर निकषांच्या आधारावर या व्यवसायाशी जोडले जाणे ठीक नाही. यासह काही अपवादांशिवाय, इथे उत्तमोत्तम हुशारीला टॅलेंटला आयआयटी - आयआयएम सारखे सॅलरी पॅकेज मिळणे कठीणच आहे. याशिवाय टाइट डेडलाइन्समध्ये मोठ्या स्टोरीजचा दबाव या व्यवसायातील पहिले मोठे आव्हान आहे. खरेतर तसे पाहता हा एक वेगळाच पण उत्साहजनक व्यवसाय आहे, जिथे आपण प्रत्येक दिवशी नव्या अनुभवाला सामोरे जात असतो. पण याचबरोबर तुम्हाला प्रत्येक दिवशी स्वत:ला सिद्ध करावे लागते.

  कसे असते कामाचे स्वरूप
  न्यूजरूमचा संपादकीय विभाग मुख्यत: दोन मुख्य भागात विभागला जातो. इनपुट व आऊटपुट. इनपुटमध्ये विविध बीटस (क्षेत्र) असतात व त्यावर काम करणारे वार्ताहर(रिपोर्टर्स) आणि रायटर्स सहभागी असतात. आऊटपुट टीम इनपुट्सला प्रेझेंटेबल बनवतात. न्यूजपेपरमध्ये याला डेस्क म्हणतात. जिथे एडिटर्सची टीम इनपुटमधून न्यूज स्टोरी निवडते आणि याची प्लेसिंग व प्रेझेंटेशनवर काम करते. रिपोर्टिंगमध्ये प्रारंभी ट्रेनी जर्नालिस्टपासून ते सीनियर रिपोर्टर, स्पेशल कॉरस्पांडंट आणि ब्यूरो चीफपर्यंत आपल्याला चढत बढती घेत पोहोचता येते, तर डेस्कवर ज्युनियर सबएडिटर, चीफ सब एडिटर, न्यूज एडिटर, रेसिडेंट एडिटर असतात. न्यूज चॅनलमध्ये आऊटपुट टीम मेंबर्सला प्रोड्युसर म्हटले जाते. खरेतर बेसिक स्किल्स (प्राथमिक कौशल्ये) समानच असतात. पण रिपोर्टिंग व डेस्क कामात काही अंतर असते. यासह फोटो जर्नालिस्ट-कॅमेरामन, ग्राफिक डिझायनर आणि कार्टूनिस्टदेखील या मीडिया इंडस्ट्रीचे महत्त्वपूर्ण प्रोफाइल्स आहेत.

  इलेक्ट्रॉनिक मीडियात हवेत वेगळी कौशल्ये
  प्रिंट, टीव्ही आणि ऑनलाइन माध्यमांमधून काम साधारणत: तुलनेने एकसारखेच असते. पण गेल्या काळाप्रमाणे आवश्यक कौशल्ये आणि कामाच्या पद्धतीत बदल आले आहेत. प्रिंटहूनही वेगळ्या असलेल्या टीव्ही रिपोर्टरला केवळ न्यूज जमा करणे एवढेच असते. पॅकेजिंग आणि प्रेझेंटेशनच्या प्रक्रियेतही काम करावे लागते. हेच कारण आहे की, टीव्ही रिपोर्टरजवळ व्हिज्युअल सेन्स आणि काही शब्दांतच आपले म्हणणे सांगण्याची खुबी (कौशल्य) असले पाहिजे, तर दुसऱ्या बाजूने आऊटपुट प्रोड्यूसर्स ते क्रिएटिव्ह आणि इमॅजिनेटिव्ह असण्याची अपेक्षा केली जाते. टीव्हीचे २४ गुणिले ७ नेचर मीडिया पर्सनकडून असुविधाजनक वेळेतही कामाची मागणी करत असते. रेडिओसंबंधी बोलाल तर ऑल इंडिया रेडियोची न्यूज रूम जवळजवळ टीव्ही चॅनलप्रमाणे काम करते. बस फक्त तंत्रज्ञान आणि उत्पादन डिलेव्हरीत अंतर आहे. जॉब प्रोफाइल्सही सारखेच असतात. टेक्नो सॅव्ही जर्नालिस्टसाठी इंटरनेटमुळे नव्या युगाची सुरुवात केली आहे.

  मास कम्युनिकेशनमध्ये वाढत आहेत प्लेटफॉर्म
  प्रारंभीच्या काळात जर्नालिझम हे केवळ वृत्तपत्रातील रिपोर्टिंगपर्यंतच समजले जात होते वा मर्यादित होते. पण आता हे क्षेत्र इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनच्या अनेक माध्यमांना यात सहभागी करते. जस जसे हे क्षेत्र वाढते आहे त्याचे व्यासपीठही वाढते आहे. सोशल मीडियापासून ते न्यूज ऑन मोबाइल फोन, अॅप विकसित झाले आहेत. अशातच हे क्षेत्र आता मास कम्युनिकेशनमध्ये परिवर्तीत झाले आहे. पत्रकारिता हा जनसंपर्काचा वा त्यावर आधारित व्यवसाय आहे. जेथे बातम्यांशी संबंधित प्रत्येक सूचना एकत्रित केली जाते. हे माध्यम वृत्तपत्र, नियतकालिकातही परिवर्तीत केले जाते. हे माध्यम वृत्तपत्र, नियतकालिके, बुक्स, रेडिआे, टेलिव्हिजन, वेबकास्ट, ब्लॉग, पॉडकास्ट, सोशल मीडिया आणि ई-मेलदेखील होऊ शकते.

Trending