आता ब्लॅकबेरी घ्या / आता ब्लॅकबेरी घ्या 11 हजारांत

दिव्य मराठी

Apr 28,2012 06:03:10 AM IST

रिसर्च इन मोशन कंपनीने आपला नवा ब्लॅकबेरीचा फोन बाजारात आणला आहे. कंपनीचा दावा आहे की, या ब्लॅकबेरी कर्व 9220च्या बॅटरीची लाइफ इतर कोणत्याही ब्लॅकबेरीपेक्षा जास्त आहे. क्वार्टी कीपॅडच्या या फोनची किंमत 10 हजार 990 रुपये ठरवण्यात आली आहे.

वैशिष्ट्ये : दोन मेगापिक्सल कॅमेरा, पिंक, व्हाइट आणि ब्लॅक रंगात सादर केला आहे. ब्लॅकबेरी ओएस 7.1 वर आधारित या फोनवर बीबीएम बटण आहे, त्यामुळे ब्लॅकबेरीची प्रसिद्ध सेवा मेंसेंजर सर्व्हिसवरही जाता येईल. या फोनला थ्रीजी सेवा सपोर्ट करत नाही. पण वायफाय सुविधा घेता येते.

X
COMMENT