आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नशिबाचे अर्धे सत्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हे खर आहे की नशीब असते. पण केवळ नशीबच असते हे एक अर्धवट सत्य आहे. नशीब आणि कष्ट बहिणींप्रमाणे असतात, ज्या नेहमी एकमेकांबरोबरच असतात. कधी नशीब मोठी बहीण होऊन जाते तर कधी कष्ट. मोठी उपलब्धी वा यश हे केवळ नशिबाचेच नव्हे तर इच्छांचे आणि दृढ संकल्पाचेच परिणाम असतात. आपणही यशाची शिडी चढू इच्छितो तर या सर्व पूर्वग्रहापासून स्वत:ला वाचवा.

यशस्वी व्यक्ती प्रतिभाशाली असते
सत्य : प्रतिभाशाली असणे हा नैसर्गिक गुण नाही. ही एक अशी कला आहे की ज्याला आपण शिकू शकतो. प्रतिभाशाली लोकांवर केलेल्या एका संशोधनात असे आढळले आहे की, अशा सर्व व्यक्ती ज्यांना आपण प्रतिभाशाली व्यक्तींच्या पक्तींत बसवतो. साधारणत: १० वर्षांपर्यंत केवळ आपल्या एका निर्धारित लक्ष्यावर ध्यान केंद्रित केले आहे. प्रवीणता (कौशल्य) यासाठी काही विशेष कामांवरच आपले लक्ष केंद्रित करा. जीवनाच्या काही लक्ष्यांना आपल्या योजनेत सहभागी करा आणि त्यातच आपले उत्तमोत्तम देण्यासाठी प्रयत्न करा. या सुराला वा मुद्द्याला लक्षात ठेवून प्रतिदिन प्रयत्न करा. एक वेळ येईल जेव्हा आपण पूर्णपणे त्यात प्रवीण (तज्ज्ञ-विजेते) होऊन जाऊ.

जन्मापासूनच प्रेरित असतात यशस्वी व्यक्ती
सत्य : यशस्वी होण्यासाठी आम्हाला प्रत्येक दिवशी प्रेरित होण्याची आवश्यकता असते. प्रेरणा मिळवावी लागते. आज तेच लोक यशस्वी आहेत, जे तेव्हा जागे होते, जेव्हा संपूर्ण जग झोपले होते. ते त्या वेळेस प्रेरणा देणारी जीवनतत्त्वे वाचत होते. आपले दिवस, आठवडे, महिने आणि आपल्या जीवनाचे नियोजन करत होते. स्वत:ला उत्तम नेतृत्वासाठी तयार करत होते. सत्य हेच आहे की, आम्हाला सर्वांना आपले प्रेरणास्थान वा प्रेरणा आणि ध्यासाला (वेडाला) उत्तम पद्धतीने पुनर्जागृत करण्याची आवश्यकता पडते.

यशस्वी लोकांचे मार्ग कठीण होते
सत्य : अशा व्यक्ती की ज्यांनी अधिकाधिक उद्दिष्टे मिळवली आहेत, त्यांनी अनेकदा असमाधानाचाही सामना केला आहे. फेडएक्सचे उदाहारण पाहा. ज्यांना आपल्या व्यवसायाच्या पहिल्या दिवशीच फक्त १५ पार्सलची ऑर्डर मिळाली, पण त्यांनी आपला व्यवसाय बंद करण्याएेवजी त्यांनी पुन्हा त्यास उभे केले आणि नवनवे प्रयोगदेखील केले.
यशस्वी व्यक्ती कष्ट करत नाहीत
सत्य : हा एक भ्रम आहे की, यशस्वी व्यक्ती यासाठी यशस्वी होतात. कारण की ते योग्य वेळी योग्य ठिकाणी असतात. आणि त्यांना त्यामुळे अधिक कष्ट (गाढवमेहनत) करावी लागत नाही. वेळेचा ताळमेळ व सदुपयोग निश्चितपणे यशामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. जॉब्ज वा ब्रिन याची प्रत्यक्ष उदाहरणे आहेत. पण व्यावसायिक जगताशी संबंधित जोडलेल्या महान व्यक्ती आपल्या प्रतिस्पर्ध्यांविषयी सखोल विचार करतात आणि त्यातच गढून जातात. त्यासाठी सतत कार्यरत राहतात. लक्ष्य प्राप्त करण्याच्या मार्गात काही गोष्टी अडचणीच्या वा गुंतागुंतीच्या असतात. जिंकण्यासाठी रक्त-पाणी-घाम एक करतात.

रॉबिन शर्मा, कॉर्पोरेट ट्रेनर.