आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rohini Pisolakar's Artical On Senior Citizens Mental Health

जपा ज्येष्ठांचे मानसिक आरोग्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक मानसिक आरोग्य दिवस हा 10 ऑक्टोबर रोजी साजरा करतात. भारतामध्ये 7.6 टक्के लोकसंख्या ज्येष्ठांची आहे. 2015 पर्यंत ती 18.8 ते 18.84 होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठांचे तीन वर्ग पडतात. 60 ते 70 लहान वृद्ध, 70 ते 80 मध्यम वृद्ध 85 हा वर्ग ज्येष्ठांचा ज्येष्ठ म्हणजे अतिवृद्ध वर्ग होय.


ज्येष्ठांचे मानसिक आरोग्य बिघडण्याचे घटक -
व्यक्तिगत घटक - 1. खिन्नता 2. डिप्रेशन 3. दु:खमय जीवन 4. शारीरिक कठीण व्याधी 5. ताणतणाव 6. जीवनातील अशांती 7. स्वत:ची नकारात्मक वागणूक 8. अबोल, एकाकी स्वभाव 9. काही शारीरिक हालचाल किंवा व्यायाम 10. इतरांशी न जुळवून घेणं 11. स्वत:च स्वत:ला कमी मानणंं 12. इतरांबद्दल नकारात्मक भावना 13. स्वत:च्या अवाजवी अपेक्षा 14. स्वत:च्या मानसिक आरोग्याबद्दल चिंता, काळजी 15. मानसिक रोगाच्या गोळ्यांचा अतिवापर 16. तंबाखू, दारू, बिडीचा अतिवापर 17. स्वत:चे शारीरिक आजार.


सामाजिक व कौटुंबिक घटक - 1. कुटुंबातील नकारात्मक वागणूक 2. कुटुंबानं आधार देणं नाकारणं 3. मित्र मंडळ नसणं 4. सामाजिक सुरक्षा न वाटणं 5. घटस्फोट व कुटुंबातील मृत्यू 6. आर्थिक असुरक्षा, गरिबी, दारिद्र्यता वगैरे 7. सेवानिवृती, रिकामा वेळ खायला उठणं 8. कार्यालयातील कर्मचा-यांकडून मिळणारी अपमानास्पद वागणूक 9. वैद्यकीय असुविधा राहणे.


ज्येष्ठांचे मानसिक आरोग्य राखण्यासाठी करण्याचे उपाय - 1. शारीरिक आरोग्य सांभाळणे, त्यांना व्यायामाचे महत्त्व पटवून देणे 2. आहार, संतुलित व योग्य प्रमाणात घेण्याचे मार्गदर्शन वर्ग सुरू करणे 3. व्यसनमुक्ती व बाजारातील अन्नाच्या दुष्परिणामाविषयी माहिती पत्रके, पुस्तके, लेख असे साहित्य उपलब्ध करून देणे किंवा वाचता येत नसेल तर तोंडी माहिती सांगणे. 4. नियमित पाणी पिण्याबद्दल सूचना अथवा मार्गदर्शन करणे 5. वैद्यकीय तपासणी सुविधा व दवाखाना उपलब्ध असावा. ज्येष्ठांमध्ये पाण्याचा अंश कमी होण्याची जास्त शक्यता असते. ज्येष्ठांच्या रक्तातील पोटॅशियमची पातळी नियमित तपासावी. ती जर कमी असेल तर थकवा, गळावट वाटते. डिप्रेशन किंवा उदासीनता जाणवते. तेव्हा ज्येष्ठांना लिंबूपाणी, आवळा पाणी, पन्हे, नारळ पाणी इत्यादी जलोपचाराची माहिती व्यक्तिगत स्तरावर द्यावी. 7. ज्येष्ठांचे समुपदेशन वर्ग त्यांच्या मोहल्यात किंवा मंडळात भरवावेत. 8. ज्येष्ठांनी औषध डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावेत. मनाने ती कधीच घेऊ नयेत 9. मानसिक आजारावरील औषधे तज्ज्ञ डॉक्टरांकडून घ्यावीत. 10 मन:शांतीसाठी ध्यान धारणा वर्ग सुरू करावेत. श्वसन, प्राणायाम, योगासने, अ‍ॅरोमा थेरपी, शांत संगीत ऐकणे, ओसोन स्टीम मसाज, छंद सांभाळणे, प्रवासाला ग्रुपमध्ये जाणे, एकत्रपणे उत्सव, सण, स्नेह संमेलनाचे आयोजन करणे, प्रत्येक घटनेचा, प्रसंगाचा आनंद घेणे, सकारात्मक विचारसरणीसाठी पुस्तके वाचणे, लेख वाचणे.11. कुटुंबातील सदस्याचा ज्येष्ठांबद्दलचा दुराग्रह कमी होण्याच्या दृष्टीने त्यांचे समुपदेशन करणे. 12. शासकीय स्तरावर त्यांना आरोग्य सांभाळण्यासाठी आरोग्य केंद्र, तक्रार निवारण केंद्र सुरक्षितताविषयक सुविधा देणं. 13. 1999 मध्ये रार्वोय स्तरावर ज्येष्ठांसाठी एक प्रकल्प तयार करण्यात आला. त्यात ज्येष्ठांसाठी आर्थिक सुविधा, आरोग्य केंद्र, सहारा देणे (वृद्धाश्रम), त्यांना अर्थाजन करण्यासाठी सोपे मार्ग उपलब्ध करणे. सामाजिक मान राखणे, ज्येष्ठांची मालमत्ता सांभाळणे, काळजी घेणे. 14. एनजीओ खूप प्रमाणावर स्थापन व्हाव्यात. शिवाय वृत्तात्रे, वाहिन्या, साप्ताहिक, मासिक इत्यादी माध्यमातून समाजाने ज्येष्ठांसाठी कल्याणकारी योजना आखाव्यात व त्यांची अंमलबजावणी करावी. 15. ज्येष्ठांना मानसिक आरोग्याविषयी माहिती पुन्हा पुन्हा द्यावी, समजून सांगावी. त्यांना आजाराबद्दल जागरूकता आणावी. 16 मानसिक रोग उपचारासाठी केंद्र शासन, राज्यशासन किंवा खासगी संस्था यांनी पैसा उपलब्ध करून आर्थिक साह्य करावे. एकंदरीत सर्वच स्तरावर ज्येष्ठांच्या मानसिक रोगावर रोक लावण्यासाठी प्रतिबंधक उपचाराची जास्त गरज आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.


1999 मध्ये रार्वोय स्तरावर ज्येष्ठांसाठी एक प्रकल्प तयार करण्यात आला. त्यात ज्येष्ठांसाठी आर्थिक सुविधा, आरोग्य केंद्र, सहारा देणे (वृद्धाश्रम), त्यांना अर्थाजन करण्यासाठी सोपे मार्ग उपलब्ध करणे. सामाजिक मान राखणे, ज्येष्ठांची मालमत्ता सांभाळणे, काळजी घेणे. 14. एनजीओ खूप प्रमाणावर स्थापन व्हाव्यात. शिवाय वृत्तात्रे, वाहिन्या, साप्ताहिक, मासिक इत्यादी माध्यमातून समाजाने ज्येष्ठांसाठी कल्याणकारी योजना आखाव्यात व त्यांची अंमलबजावणी करावी.