आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॅलेंटाइन कुणीही असावं

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जवळजवळ चार महिने उलटले. पुण्यात येऊन शहराने आधी नवीन म्हणून जरा छळले, पण नंतर आपलंसं केलंच. पण शहरातली माणसं म्हणजे फुल पुणेरी! कमी बोलणारी आणि सूचनांच्या पाट्यांकडे चित्त वळवणारी. एकटं राहायचं नाही तर खूप मैत्रिणी बनवायच्या या विचारानेच पुण्यात पाऊल ठेवलेलं. पुण्यातील माझी चौकट म्हणजे क्लासेस ते खोली. 

नवनवीन लोकांना भेटता यावं म्हणून क्लासमध्ये एका ठिकाणी बसले नाही. खूप ओळखी झाल्या. संपर्क वाढावा म्हणून कोणाला छोटीशी मदत करायची वगैरे फंडे वापरले. याचे फायदेही झाले, पण क्षणिक! ती व्यक्ती खूप खुलून धन्यवाद म्हणायची आणि त्या दिवशी ती सोबत बसणार हे नक्की! गंमत म्हणजे दुसऱ्या दिवशी ती व्यक्ती तुमच्याकडे बघणारसुद्धा नाही. आधी वाटलं की एक-दोन असे असावेत, पण पाच-सहा प्रयत्न फोल गेल्यावर हा फंडा कामाचाच नाही म्हणून ध्यानात आलं. मग गुपचूप शेवटच्या बाकावर बसायला लागले. हळूहळू चार-पाच मैत्रिणी झाल्या. अडलं तर विचारता येईल, काही लागलं तर मदत करतील अशा. फोन नंबरची देवाणघेवाण झाली. खूप मस्ती केली. क्लासमध्ये सोबत अभ्यासही केला. 
 
त्यांना भेटून वाटलं की, मैत्रिणी भेटल्या. तीन महिन्यांनी पहिल्या ग्रुपचे क्लास संपले आणि दुसऱ्या ग्रुपचे क्लासेस सुरू झाले. परंतु क्लासरूम बदललेली. ज्या चारपाच मुलींबरोबर तीन महिने मी घालवलेले त्या वेगळ्याच क्लासमध्ये. नेमका व्हॅलेंटाइन डे जवळ आलेला. मग मी मैत्री, प्रेम अशा गोष्टींचा विचार करू लागले. माणसाच्या आयुष्यात असं निखळ प्रेमाचं नातं बऱ्याच जणांबरोबर असतं. कोणाचं आईशी असतं तर कोणाचं वडिलांशी, कोणाचं मोठ्या भावाशी-बहिणीशी वा लहानग्यांशी असतं. कोणाचं मित्रावर वा मैत्रिणीवर असतं तर कोणाचं प्रियकरावर वा प्रेयसीवर. मी मात्र हा आई-वडिलांवरच प्रेम व्यक्त करण्याचा सण मानावा म्हटलं! 
 
 
बातम्या आणखी आहेत...