आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणपती बाप्‍पा (रुपाली कुलकर्णी)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खरंच का गं आई आता,
राहायला येणार घरी बाप्पा?
खूप लाड करीन त्याचे,
मारीन त्याच्याशी खूप गप्पा।।
“म्हणजे काय करणार बाळा,
सांग तुझा प्लॅन सगळा.”
सकाळ होताच मी त्याला,
हाक मारून उठवणार।
ब्रश-आम्बू-ब्रेकफास्ट- युनिफाॅर्म,
भरभर त्याचे आटोपून देणार।।
तुझ्यासारखे मी पण त्याला,
रोज शाळेत नेऊन सोडणार।
येताना तो व्हॅनने येईल,
मी वाट त्याची बघणार।।
“अरे माझ्या राधा बाळा,
बाप्पाची तर संपलीय शाळा...”
आवडेल ना गं त्याला आई,
भाजी-पोळी, वरण भाता।
की करून देऊ त्याला मी,
नूडल्स आणि पास्ता?
“अरे माझ्या राधा बबडू,
बाप्पाला दे मोदक, लाडू...”
जेवण करून आम्ही दोघे,
थोडा वेळ खेळू छान।
बाप्पाला कंटाळा येताच,
दाखवीन त्याला डोरेमाॅन।।
“अरे माझ्या राधा शोना,
बाप्पाला थोडा आराम दे ना...”
संध्याकाळ होताच आई,
त्याला देईन चाॅकी-दूदू।
पार्किंगमध्ये सायकल खेळू,
आम्ही दोघे खूप दमू।।
रात्री भरवीन दूदू-भाता,
नाइट ड्रेस घालीन त्याला।
माझ्याच कुशीत झोपेल बाप्पा,
मारू आम्ही खूप गप्पा।।
बघा बाप्पा असा सगळा,
प्लॅन आहे आमचा रेडी।
लवकर या तुम्ही आता,
वाट बघते राधा वेडी।।
rupaliwaje@rediffmail.com
बातम्या आणखी आहेत...