आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी गाण गाते!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरशासमोर, स्वयंपाकघरात, एकटी असताना, देवपूजा करताना, सहजच, कधी स्वत:साठी कधी माझ्याच माणसांसाठी मी गात असते. गाण्याची शास्त्रीय बाजू असेल थोडी कमकुवत, पण गाणं गाण्यासारखंच वाटेल इतकं बरं नक्कीच गाते. पण गंपूसमोर गायचं असेल तर त्याच्याच बुद्धिकोशात फिट्ट बसलेलं एखादं किलबिल गीत किंवा मग ढिंच्याक गाणं (हा माझा प्रांत नव्हे तरीही) गायचं. त्याच्यासमोर तुम्ही तुमच्या आवडीचा एखादा अभंग किंवा ‘रैना बीती जाये...’ टाइप गायला घेतलंत तर हा पोरगा धाय मोकलून रडायला लागतो. आता त्याचं हे रडणं गाण्याचा भावार्थ समजून आलेलं असतं की, गायिकेच्या गाण्याला दिलेली दाद असते हाही एक प्रश्नच. स्वतःच्याच घरी आवडीचं गायची सोयसुद्धा नाही राहिली आता. असो, बालहट्ट कोणाला चुकलाय!
घरचे तर घरचे, पण हा तर बाहेरच्यांना पण हट्ट करून मुठीत ठेवायला बघतोय. शेजारच्या मुली “रिंगा रिंगा रोझेस…” म्हणत ठरावीक पद्धतीने फेर धरत खेळत असतात, तिथे हा मधेच जाऊन उड्या मारतो. त्या बिचाऱ्या सारख्या जागा बदलत खेळतात तर हा दर वेळी ‘मुलीत मुलगा लांबोडा’ बनून शिरतो. बरं त्याला त्यांच्यासारखं धड फेर धरायलाही जमेना की त्यांची गती याच्या गतीसोबत मेळ खाईना. नुसताच सावळा गोंधळ. शेवटी त्या मुली याला कृष्ण म्हणून मध्ये उभा करतात आणी चारी बाजूंनी फेर धरून मार म्हणतात उड्या पाहिजे तेवढ्या. असो मुली जन्मतःच समजूतदार असतात, त्यापुढे बालहट्ट तरी काय चीज आहे.
 
- रूपाली शिंदे, नवी मुंबई
rups.patankar@gmail.com
बातम्या आणखी आहेत...