आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इलिझाराेव्ह; शस्त्रक्रियेनंतर लगेच रुग्ण उभा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अस्थिरुग्ण म्हटल्यानंतर माेठ्या जखमा, प्लास्टर घेऊन, महिनाेंमहिने अंथरुणात खिळणारा, अापल्या दैनंदिन गरजांसाठी दुसऱ्यांवर अवलंबून असणारा, उपचारांबद्दल नेहमी साशंक असणारा व पदरात हाॅस्पिटलची माेठी बिले घेऊन अार्थिक विवंचनेत असणारा रुग्ण नजरेसमाेर येताे. पण कितीही माेठा अपघात हाेऊन शस्त्रक्रियेनंतर अापण लगेचच चालू-फिरू शकलाे तर...! ही एक कल्पना नसून रायन इलिझाराेव्ह पद्धतीने वास्तवात अाणलेले एक सत्य अाहे.

साेलापूर जिल्ह्याच्या करमाळ्यातील संजय देशमुख (नाव बदललेले) यांचा रस्ते अपघातात उजव्या पायाचे हाड माेडून माेठी जखम हाेऊन हाडे शरीराच्या बाहेर अाली हाेती व त्याची परिस्थिती अत्यवस्थ हाेती. अशा परिस्थितीत रात्री ते माझ्याकडे दाखल झाले. सर्वप्रथम त्यांच्या अत्यवस्थ परिस्थितीवर मात करून त्यांची प्रकृती नियंत्रणात केली गेली. त्यांच्या उजव्या पायाच्या गुडघ्याखालील हाडाचे तुकडे हाेऊन, माेठी जखम हाेऊन हाडे बाहेर अाली हाेती. त्यावर मी तातडीने जगप्रसिद्ध रशियन इलिझाराेव्ह या पद्धतीने शस्त्रक्रिया केली. अाश्चर्य म्हणजे शस्त्रक्रियेनंतर फक्त अडीच तासांत रुग्ण अापल्या पायावर उभा राहिला. एवढेच नाही तर हळूहळू चालायलाही लागला. जगभरात साधारणत: शस्त्रक्रियेनंतर २४ तासांनी रुग्णांना उठून बसवण्याचा, चालण्याचा सल्ला दिला जाताे. तसेच फ्रॅक्चर शस्त्रक्रियेनंतरसुद्धा २४ तासांनंतर फक्त १० ते २० टक्के भार देऊन चालविले जाते व संपूर्ण भार देऊन चालण्यात साधारणत: दाेन-अडीच महिने तरी जातात.

रुग्णांना लवकर चालविल्यामुळे शरीरात अाॅक्सिजन व रक्तपुरवठा वाढून जखमा-फ्रॅक्चर्स लवकर भरतात. श्वसनक्रिया, पचनक्रिया व मुत्राशयाची क्रिया चांगल्याप्रकारे काम करते. बद्धकाेष्ठता, लघवीच्या समस्या, फुप्फुसाच्या समस्या, कातडीवर जखमा हाेणे या समस्या टाळता येतात. उशिरा चालल्यामुळे राेगप्रतिकारशक्ती कमी हाेऊन जंतूसंसर्ग हाेणे, शारीरिक कमजाेरी, रक्ताच्या गुठळ्या हाेणे अशा अनेक समस्या उद‌्भवतात. लवकर चालते केल्यामुळे सर्व नित्याची कामे करण्यात रुग्ण स्वावलंबी हाेताे व त्याचा अात्मविश्वास वाढून मानसिकदृष्ट्या अत्यंत सबल हाेताे. अाज ही काळाची गरज झाली अाहे.

अशी अाहे रशियन इलिझाराेव्ह पद्धती
रशियन इलिझाराेव्ह हे जगातील सर्व अस्थिराेगांवरील अतिप्रगत तंत्रज्ञान अाहे. यात विनाचिरफाड, शरीराच्या बाहेरूनच बारीक तार व रिंगांची फ्रेम बसवून हाडांतील फ्रॅक्चर्स किंवा व्यंगांचा उपचार केला जाताे. ही फ्रेम अत्यंत भक्कम असल्याने शरीराचे संपूर्ण वजन घेऊन रुग्ण चालू शकतात. शरीरातील डाेक्यापासून ते पायाच्या बाेटांपर्यंत कुठल्याही हाडांवर, कुठल्याहंी बिकट परिस्थितीत, कुठल्याही वयात, गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत इलाज करता येताे. सर्व फ्रॅक्चर्स न जुळलेली, वाकडी जुळलेली हाडे, हाडाला लागलेली किड, पाेलिअाे, लहान मुलांचे अस्थिविकार, गुडघेदुखी (गुडघा न बदलता), हाडाची उंची वाढविणे, कंबरेची व मणक्यांची फ्रॅक्चरर्स अशा ८० टक्के असाध्य समजल्या जाणाऱ्या अस्थिराेगांवर अत्यंत प्रभावीपणे व खात्रीपूर्वक इलाज इलिझाराेव्ह पद्धतीने शक्य झाले अाहे. अत्यंत वाजवी खर्च, खात्रीपूर्वक इलाज, सर्व अस्थिराेगांवर उपचार, लगेचच चालता-फिरता येणे, विनाचिरफाड-व्रणरहित शस्त्रक्रिया व कमी वेळात इलाज ही इलिझाराेव्हची वैशिष्ट्ये व फायदे अाहेत.
डाॅ. संदीप अाडके, साेलापूर
बातम्या आणखी आहेत...