आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१५ मिनिटे स्वत:साठी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या काही वर्षांपूर्वी लोकांना योगा म्हणजे खाली डोके, वर पाय या गोष्टी फक्त माहीत होत्या. पण योगाच्या प्रचारामुळे योगामुळे रोग बरे होतात योग या शब्दाचा अर्थ आहे जोडणे. ईश्वराशी जोडणे किंवा प्राणला आपण वायूशी जोडणे आत्म्याला परमात्म्याशी जोडणे. योगाचे सर्वांत प्राचीन (जुने) पुस्तक म्हणजे हठयोग प्रदीपिका होय. यात योगाचा विस्तृत अर्थ सांगितला आहे. याच पुस्तकात रोगासाठी योगाचा उपयोग कसा होतो. हे लिहीले आहे.
आजकाल फार मोठ्या प्रमाणात हृदयविकाराने मृत्यू होत आहेत. हृदयविकासाचे प्रकार 31 ते 35 वयाच्या दरम्यान जास्त असते. आपल्या आईवडिलांना जर हृदयविकार, उच्चरक्तदाब, संधिवात, मधुमेह असे विकार असतील तर, 50 टक्के खात्री आहे की, ते आपल्यालासुद्धा होतीलच जर आपण योगा, प्राणायाम केला तरच हे आपल्या पुढील पिढीला होणार नाही. वरील रोग होण्याच्या अगोदरच रोज 15 मिनिटे तरी प्राणायाम करा म्हणजे हृदयविकार होणार नाही. अँजिओप्लास्टी, बायपास यापेक्षा रोज 15 मिनिटे मिस्त्रिका केली तर हार्टअ‍ॅटॅक येणार नाही. काही दिवसांपूर्वी सायटिकाने त्रस्त एक व्यक्ती माझ्याकडे आली होता. डॉक्टरांच्या औषधाने दुखणे कमी होत नव्हते. माझ्याकडे आल्यावर सर्व योगा करत बसण्यापेक्षा त्यांना मी फक्त सायटिका उपयोगी असणारी आसने, व प्राणायाम त्यांना करण्यास सांगितला. त्यानंतर 15 दिवसांत त्यांना फरक पडला व शस्त्रक्रिया करण्याचा विचार त्यांनी सोडून दिला. योगामध्ये प्रत्येक रोगासाठी वेगवेगळी योगासने प्राणायाम आहेत. कोणतेही आसन व प्राणायाम कोणत्याही रोगाकरिता केला तर फायदा होत नाही व प्राणायाम त्या त्या रोगांसाठी किती वेळ करावा हेसुद्धा गरजेचे आहे. जसे औषधे 200 एमजी, 500 एमजी अशा स्वरूपात असतात. तसे प्राणायाम व योगासनेसुद्धा तेवढाच वेळ करणे गरजेचे असते. कमी वेळ प्राणायाम केल्यास पाहिजे तेवढा फरक रोगासाठी पडत नाही. जसे 15 मिनिटे अनुलोम-विलोम प्राणायाम केल्यास रक्तप्रवाह बरा होतो. योगामध्ये रोग बरे करण्याची जी क्षमता आहे ती जिम किंवा एरोबिक्स, चालणे-धावणे या व्यायामात नाही. योगामुळे रोग मुळापासून बरे होतात. पाठदुखी, सायटिका, स्लिप डिस्क, मधुमेह, उच्चरक्तदाब, संधिवात कायमचे बरे होऊ शकतात. आजकाल तर टाचदुखी फार वाढली आहे. यासाठी योगामध्ये सर्वांगासन रोज केल्यास फायदा होतो. पित्तासाठी योगामध्ये शरीरशुद्धी नावाची प्रक्रिया केली जाते. योगा रोज केल्यास कॅन्सरसुद्धा बरा होऊ शकतो.
योगामुळे आत्मविश्वास वाढतो. निरोगी आयुष्य तर मिळतेच, पण यासह व्यक्तिमत्त्व विकास व आध्यात्मिक शक्तीसुद्धा मिळते. या योगरूपी कल्पवृक्षाचा फायदा करून घेणे आपल्या हातात आहे. (लेखक योगाचार्य आहेत.)