आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझा प्रेरक सूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रिकेट सामने खेळताना जेव्हा मी आनंदी असायचो, तेव्हा लतादीदींची प्रसन्न मूडमधली गाणी ऐकायचो. कधी करूण रसातली गाणी एेकायचो. कधी  प्रेरणादायी गाणी ऐकायचो. या सगळ्या गाण्यांचा मला आव्हानात्मक सामने खेळताना खूप आधार मिळायचा...

 

लतादीदींच्या गाण्याबाबत बोलावे, म्हटले तर त्याबाबतीत मी फारच सामान्य माणूस आहे,अशी माझी भावना आहे. त्याचमुळे त्या किती उच्च कोटीच्या गायिका आहेत, हे देखील मी सांगण्याची गरज नाही. मात्र एक गोष्ट मी नक्की सांगू इच्छितो की, त्यांच्या गाण्यांचे माझ्या जीवनात खूपच मोठे योगदान आहे. दीदींनी त्यांच्या नकळत दिलेले हे योगदान माझ्यासाठी अमूल्य आहे. क्रिकेट दौऱ्यावर असताना अनेक कठीण प्रसंगांत त्यांच्या प्रेरक गाण्यांनी माझ्यात खूप बदल घडवला आहे.


दौऱ्यावर ज्या ज्या वेळेला मी जायचो, त्या-त्या वेळी, मी माझ्याबरोबर मी संगीताचा खजिना बरोबर घेऊन जायचो. १९८९ला माझ्याकडे वॉकमन होता, १९९३-९४ मध्ये सीडी फ्लेअर आला, त्यानंतर एम. डी. फ्लेअर आला, आणि आता ‘आय पॉड’ आहे. ज्याच्यावर १० हजारहून अधिक गाणी आहेत. आपली गाणी वाढली. परंतु त्यामधील गायक काही फारसे बदलले नाहीत. त्या माझ्या ‘कलेक्शन’मधील सर्वात प्रिय आणि महान गायिका लता मंगेशकर या आहेत.


क्रिकेट सामने खेळताना जेव्हा मी आनंदी असायचो, तेव्हा लतादीदींची प्रसन्न मूडमधली गाणी ऐकायचो. कधी करूण रसातली गाणी एेकायचो. कधी  प्रेरणादायी गाणी ऐकायचो. या सगळ्या गाण्यांचा मला आव्हानात्मक सामने खेळताना खूप आधार मिळायचा. त्याबद्दल मी दीदींचा सदैव ऋणी राहीन. यापुढेही माझ्याकडे लतादीदींची गाणी असतील. मीच नव्हे, तर माझ्यासारखे कोट्यवधी लोक लतादीदींच्या गाण्याचे चाहते आहेत. या गाण्यांनी त्यांनाही त्यांच्या सुखदु:खाप्रसंगी आधार दिला आहे.
 

- सचिन तेंडुलकर (शब्दांकन : विनायक दळवी)

बातम्या आणखी आहेत...