आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभपर्व ऑन फोन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिककरांना कुंभमेळ्याचा इतिहास आतापर्यंत पाठ झालेला आहे. सातत्याने होणारे कार्यक्रम म्हणा किंवा प्रशासकीय बातम्या म्हणा, या सगळ्यामुळे कुंभमेळ्याविषयी सतत माहिती मिळत राहते. पण बाकीच्यांसाठीही या कुंभमेळ्याचे नक्की स्वरूप काय असणार, रस्ते कोणते बंद असणार, राखीपौर्णिमेच्या दिवशी येणाऱ्या पर्वणीमुळे काय होणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आता मोबाइलवर उपलब्ध होणार आहेत. प्लेस्टोअर हे माहितीचे भांडार होत चालले आहे. याचाच प्रत्यय कुंभमेळा 2015 हा कीवर्ड प्लेस्टोअरवर सर्च केल्यावर येतो.

नाशिक कुंभमेळा 2015 -
नाशिकच्या कुंभमेळ्याच्या महत्त्वाच्या तारखा, उपलब्ध असणारी हॉटेल्स, मोफत आरोग्यसेवा देणारी रुग्णालये या अॅप्लिकेशनमध्ये पाहायला मिळतात. शिवाय प्रवासाची सर्व साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. अतिदक्षतेच्या काळात या अॅप्सवर इतर तपशीलही पुरवले जाणार आहेत. याव्यतिरिक्त बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी नाशिकमध्ये प्रवेश करण्याचे कोणते मार्ग उपलब्ध आहेत, या काळात संपर्काची साधने कोणती हेदेखील सांगण्यात आले आहे.

महाकुंभ नाशिक 2015 -
या अॅप्लिकेशनमध्ये परिवहन व्यवस्थापन, इमर्जन्सी नंबर सर्व्हिसेस, नाशिकची प्रेक्षणीय स्थळे, महाकुंभाची माहिती, महाकुंभाच्या बातम्यांच्या सगळ्या अपडेट पाहायला मिळतात, याव्यतिरिक्त इतिहासाच्या अभ्यासासाठीदेखील या अॅप्लिकेशनचा उपयोग होणार आहे.

उज्जैन सिंहस्थ 2016 -
यात सिंहस्थाचा इतिहास, उज्जैन मेळ्याचा प्रामुख्याने इतिहास दिलेला आहे. त्याशिवाय मेळाव्याचे वेळापत्रक देण्यात आले आहे. उज्जैनमधील रस्त्याचे मॅप यामध्ये सहज उपलब्ध होतात. ग्रहांची स्थिती, ज्यामुळे कुंभमेळा घडून येतो, ही कारणेसुद्धा चित्रांसह देण्यात आलेली आहेत. महत्त्वाच्या प्रत्येक आखाड्याची माहिती देण्यात आलेली असते. मुख्य म्हणजे पेशवाईच्या खुणा या कुंभमेळ्यात दिसतात, त्याचीसुद्धा माहिती दिलेली आहे.
(saee.kawale@dbcorp.in)