आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिका वेगवेगळ्या भाषा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या मातृभाषेव्यतिरिक्त वेगळी भाषा शिकण्यासाठी पूर्वी फार मेहनत करावी लागायची. एका प्रदेशातून दुस-या प्रदेशात लग्न करून जाणा-यामुलींची संख्या मोठी असल्याने त्यांच्यावर ही वेळ अधिक येत असे. या भाषेचाही अवघड खेळ अँड्रॉइडने सोपा केला आहे. फक्त एका क्लिकवर भारतातल्याच नाही तर परदेशी भाषाही शिकण्यासाठी उपलब्ध आहेत. अँड्रॉइड प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेल्या भाषाविषयक अॅप्लिकेशन्समध्ये असंख्य लर्निंग अॅप्स उपलब्ध आहेत. ज्यांमध्ये त्या भाषेची लिपी, अक्षरेसुद्धा शिकविली जातात. यासाठी प्ले स्टोअरवर फक्त लँग्वेजेस असे सर्च केल्यास अनेक पर्याय दिसतात. याव्यतिरिक्त इंग्लिश टू मराठी किंवा मराठी टू इंग्लिश यांसारख्या भाषांतराच्या अॅप्लिकेशन्सचासुद्धा पर्याय सापडतो. त्याच्या मदतीने आपल्याला येत असलेल्या भाषेतील शब्द सहज हवे त्या भाषेमध्ये अनुवादित करून घेता येतात. यांपैकी काही महत्त्वाच्या अॅप्लिकेशन्सवर नजर टाकली असता लक्षात येते की, भाषा शिकणे आता अवघड राहिलेले नाही. त्यासाठी विशिष्ट वेळ देण्याचीसुद्धा गरज नाही. हातात असलेल्या फोनवर हवी ती
भाषा शिकता येऊ शकते.
ड्युओलिंगो - या अॅप्लिकेशनमध्ये सगळ्या परदेशी भाषा शिकता येतात. ज्यामध्ये प्रामुख्याने स्पॅनिश, जर्मन, फ्रेंच, पोर्तुगीज, डच, आयरिश, डॅनिश, स्वीडिशसारख्या भाषांचा समावेश आहे. त्यातही टॉप डेव्हलपर्सनी बनविलेले अॅप्लिकेशन असल्याने याच्या गुणवत्तेची पूर्ण खात्री आहे. फक्त लँग्वेज लर्निंग इतकं सर्च केल्यास हाच पहिला पर्याय दिसून येतो.

बॅबल लर्न लँग्वेज - हेसुद्धा टॉप डेव्हलपर्सचेच अॅप्लिकेशन आहे. ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक भाषेचे ट्युटोरियल पाहायला मिळतात. भाषा शिकण्याच्या परीक्षा देता येतात. यानंतर भाषा आपल्याला किती येते याचे प्रमाणसुद्धा हे अॅप्लिकेशन सांगत असते. चला तर, कुठली नवीन भाषा शिकताय स्मार्टफोन वापरून?
saee.kawale@dbcorp.in