आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल सिक्युरिटी तुमच्या हातात...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोबाइल किंवा कुठलेही इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरताना त्या उपकरणाची सुरक्षा सगळ्यात महत्त्वाची असते. मोबाइलचं आयुष्य वाढवण्यासाठी या सुरक्षा अ‍ॅप्लिकेशन्सचा उपयोग होतो. यामध्ये विश्वासार्ह अ‍ॅप्लिकेशनच डाऊनलोड करावे. अन्यथा मोबाइलमधला डाटा करप्ट होऊ शकतो. मोबाइल सिक्युरिटी अ‍ॅप तुमचा फोन इतर कुणी ओपन करण्याचा प्रयत्न केला तर तशी माहिती देत असते. युजर गाइडचा वापर करून त्यासाठी खास पर्याय वापरता येतात. याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे व्हायरस फोनमध्ये येत नाहीत. त्यापैकी काही महत्त्वाच्या मोबाइल सिक्युरिटी अ‍ॅप्सची माहिती घेतल्यास लक्षात येते की, यांचे काम फक्त व्हायरसपुरते मर्यादित नाही.

फोन चोरीला गेला तरी हे अ‍ॅप्स कामाला येतात. फोनमध्ये नको असलेले कॉल, एसएमएस ब्लॉक करण्यासाठीदेखील हे अ‍ॅप उपयुक्त ठरतात. महत्त्वाची अ‍ॅप्लिकेशन्स लॉक केल्यावर तुमचा डाटा लीक होत नाही. याव्यतिरिक्त काही व्हायरस मोबाइलमधला सगळा डाटा सरळ क्लाऊडवर म्हणजे गुगलसारख्या सर्च इंजिनवर सेव्ह करतात. यामुळे फोटो आणि काँटॅक्ट लीक होण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत फोनची काळजी घेतलेली कधीही बरी. अँटिव्हायरसवर पैसे खर्च करण्याआगोदर याप्रमाणे मोबाइल अ‍ॅप्स फ्री डाऊनलोड केले तर धोका कमी होऊ शकतो.

सीएम सिक्युरिटी - यामध्ये मोबाइलसाठी अँटिव्हायरस आहे. तसेच कॉल ब्लॉकर आहेत. याव्यतिरिक्त रॅम बूस्टर, बॅटरी सेव्हर असे असंख्य पर्याय पाहायला मिळतात. फोनमध्ये असलेल्या अ‍ॅप्लिकेशन्सना लॉक टाकून त्याची प्रायव्हसी वाढवता येते; जेणेकरून मेसेज, कॉल लॉग यांमधील महत्त्वाच्या गोष्टी कुणी पाहू शकत नाही. सीएम सिक्युरिटी हे सिक्युरिटी अ‍ॅप्समधले सगळ्यात जास्त वापरले जाणारे अ‍ॅप्लिकेशन आहे.

अ‍ॅप लॉक - फोटोज, काँटॅक्ट आणि कॉललॉग यांना लॉक करण्यासाठी हे अ‍ॅप्लिकेशन वापरता येते. यातही काही कॉन्फिडेन्शियल डाटा असेल तर तो ‘हाइड’ हा पर्याय वापरून सुरक्षित ठेवता येतो. यामध्ये फोनमध्ये लिहून ठेवलेल्या नोट्स, फोटो सहज हाइड करता येतात. ज्यामुळे डॉक्युमेंट्स चोरीला जाण्याचा, डाटा लीक होण्याचा धोका कमी होतो.

३६० सिक्युरिटी - सीएम सिक्युरिटीप्रमाणे यामध्येसुद्धा अ‍ॅप्लिकेशन्स लॉक करता येतात. बॅटरीचे आयुष्य वाढवण्यासाठी हे अ‍ॅप चांगले आहे. मोबाइलमध्ये एकसारखेच अनेक फोटो असतात, ज्यांमुळे जागा वाया जाते. असे फोटो, डॉक्युमेंट्स एका क्लिकवर स्वच्छ करता येतात. मेमरी बूस्ट करण्यासाठी या अ‍ॅप्लिकेशनचा उपयोग होतो.
सई कावळे, नाशिक
saee.kawale@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...