आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल वापरताना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या रोजच्या आयुष्याशी जोडली गेलेली वस्तू म्हणजे मोबाइल. पण मोबाइल फक्त कॉल घेण्यासाठी आणि कॉल करण्यासाठी वापरतात, हा गैरसमज आहे. आपल्याला आपल्या हातात असलेली ही अत्यंत उपयुक्त बहुगुणी वस्तू संपूर्णतः वापरता यायला हवी. यासाठीच तुम्हाला काही महत्त्वाच्या अॅप्सची तोंडओळख करून देणारे हे सदर...

मोबाइलमध्ये असलेले अगदी महत्त्वाचे अॅप्लिकेशन म्हणजे गुगल प्लेस्टोअर. हे सगळ्या अँड्रॉइड उपकरणांमध्ये पाहायला मिळते. याला मदर अॅप्लिकेशन म्हणण्यास हरकत नाही. गुगल या सर्च इंजिनशी जोडलेल्या प्लेस्टोअरमध्ये सगळ्या विषयांशी निगडित अॅप्स पाहायला मिळतात. गुगल प्लेस्टोअरने नव्याने आणलेल्या गोष्टी नवीन अपडेटमध्ये पाहायला मिळतात. ज्यामध्ये प्ले न्यूजस्टँड, प्ले बुक्स, प्ले म्युझिक, प्ले गेम्स या अॅप्सचा समावेश होतो. यांच्या माध्यमातून तुम्हाला गुगल सर्व्हरवर उपलब्ध असलेली पुस्तके वाचता येतात. गेम्स खेळता येतात. तसेच गाणी शोधता येतात. कॅटेगरी या पर्यायाची निवड केल्यास यामध्ये एज्युकेशन, सायन्स असे विषय पाहायला मिळतात, ज्यात आरोग्य सुविधांपासून अगदी निवडणुकीपर्यंतचे सगळ्या अपडेट असतात.

या प्लेस्टोअरमधून हवा असलेला विषय सर्च केला की त्या विषयाशी निगडित सगळ्या अॅप्सची माहिती तुम्हाला मिळते. हे अॅप डाउनलोड केल्यावर वेळोवेळी प्ले स्टोअरमधून डाउनलोड केलेल्या अॅपची अपडेट इन्फर्मेशन दिली जाते. यात शाळेच्या अभ्यासापासून उच्च शिक्षणासाठी निवडल्या जाणाऱ्या विषयांचा समावेश होतो. तुमच्या फोनमध्ये इतर कोणतेही अॅप नसले तरी अँड्रॉइड फोनमध्ये सुरुवातीपासून असणारे हे अॅप अद्ययावत ठेवा. तुमच्या फोनसाठी वरदान ठरणारे प्लेस्टोअर सगळ्यांच्या कामी येणारे आहे.
saee.kawale@dbcorp.in