आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘स्मार्ट’ पर्सनल ट्रेनर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धकाधकीच्या आयुष्यात सगळ्यांनाच जिममध्ये जाता येतं असं नाही. एव्हाना मी कशाबद्दल सांगणार हे कळलंच असेल. रोजचे डाएट, तुमच्या व्यायामाची जबाबदारी घेणारी व्यक्ती असावी, असे प्रत्येकाला वाटत असते. पर्सनल ट्रेनर फक्त सेलिब्रेटीच ठेवू शकतात असं नाही. आपणही स्मार्ट पर्सनल ट्रेनर ठेवू शकतो. स्मार्ट फोनवर स्मार्ट हेल्थ अॅप्लिकेशनच्या माध्यमातून या गोष्टी सोप्या होतील. महिलांचा रोजचा डाएट, त्याचबरोबर कोणता व्यायाम करावा अशा प्रकारच्या सगळ्या सूचना या अॅप्लिकेशन्समध्ये दिलेल्या असतात. यांपैकी काही महत्त्वाचे आणि चांगले पर्याय पाहायला गेल्यास, पुढील पर्याय उपलब्ध आहेत. ज्यांचा विचार केल्यास फक्त एका क्लिकवर आजारांना दूर पळवण्याचे साधे नियम समजून घेता येतील.

३० डेज वर्कआऊट -
वुमन हेल्थ सर्च केल्यास पहिल्या क्रमांकावर हे अॅप्लिकेशन पाहायला मिळते. यामध्ये २० चॅलेंजेसमध्ये फिटनेस साध्य करता येतो. यामुळे दिवसभरातले वर्कआऊट, त्या वेळी घ्यावयाची काळजी या सगळ्या सूचना दिल्या जातात. शरीरात होणारे बदल नोंदवून त्यानुसार वर्कआऊट बदलतासुद्धा येते.
(saee.kawale@dbcorp.in)
बातम्या आणखी आहेत...