आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बच के रहेना रे बाबा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पावसाळ्यात डोकं वर काढणाऱ्या कृमी, किटकांमुळे आजारांची लागण फार लवकर होते. घर आणि अंगण परिसरातील डास, माश्या, लाल-काळ्या मुंग्या, झुरळ, पाल, उंदीर-घुशी, कोळी, वाळवी, ढेकूण या सर्व उपद्रवींची संख्या अचानक वाढते. या कीटक किंवा प्राण्यांमुळे जंतुसंसर्ग होऊन दरवर्षी हजारो लोक मरण पावतात. नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार, अतिसार आणि डोळ्यांच्या संसर्गासारख्या आजारांसाठी घरात घोंगावणाऱ्या माश्या हे महत्त्वाचे कारण आहे.

त्यामुळे वेळच्या वेळी पेस्ट कंट्रोल म्हणजेच या उपद्रवी कीटक/प्राण्यांवर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. पेस्ट कंट्रोलमुळे हे उपद्रवी कीटक १०० टक्के नष्ट होत नाहीत, मात्र त्यांचे प्रमाण कमी होऊ शकते. कोणत्या कीटकांपासून आपल्याला कसा धोका संभवतो, याची माहिती घेऊ या.
उंदीर:
परस्परांसोबत मोठ्या संख्येने राहणाऱ्या उंदरांना माणसांच्या घरात राहायला आवडते. मानवाच्या घरात आणि आरोग्याबाबतीत प्रचंड उच्छाद मांडण्याची क्षमता उंदरांमध्ये असते. घरात उंदीर होऊ नयेत, म्हणून उरलेले अन्न अंगणात उघडे ठेवू नये. उंदरांना ते आकर्षून घेते. दोन भिंतींमध्ये फट असता कामा नये. घरातील भंगार वस्तूंची जागा नेहमी बदलत राहावी.

घरगुती उपाय :
कच्च्या कांद्याचा वास उंदीर सहन करू शकत नाहीत. त्यामुळे उंदरांच्या बिळांजवळ, किंवा संभाव्य ठिकाणी कच्च्या कांद्याची फोड ठेवावी. मात्र हा कांदा दररोज बदलावा.

sandeep@24x7pms.com
(लेखक अनेक वर्षांपासून कीटकनाशक
व्यवसायात कार्यरत आहेत.)

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, कोणता कीटक आहे सर्पावात धोका दायक... कसा संभवतो धोका
बातम्या आणखी आहेत...