आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ऐबो' मधले संतुलन!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानातला कुणी विराट कोहलीचा चाहता असणे किंवा भारतातल्या एखादीने अफ्रिदीची चाहती असणे, हा काय देशद्रोह झाला? गुलाम अलींच्या गजलेला राष्ट्रप्रेमाच्या तलवारीने कापून टाकणार?
एकानेम्हणावे,“‘भारतमाता की जय’ असे आता या तरुण पिढीला म्हणायला शिकवायला हवे.” लगेच दुसऱ्याने म्हणावे, “गळ्यावर सुरी ठेवली तरी, मी ‘भारतमाता की जय’ म्हणणार नाही, कारण आपल्या राज्यघटनेत तसे काही म्हटले नाहीये.” एकाने हा नारा द्यावा तर दुसऱ्याने दुसरा. हे सगळे ‘ऐबो गॅप’चेच परिणाम आहेत.
‘ऐ बोगॅप’ नावाची एक नवीन संकल्पना मी तयार केली आहे. म्हणजे असं बघा की, एखादी गोष्ट किंवा एखादा शब्द आपल्याला ‘ऐकायला’ जास्त मिळतो आणि आवडतोही. ‘बोलायला’ जास्त मिळतो किंवा आवडतो, यातल्या फरकाचा ‘ऐबो' हा निर्देशांक होय. आता उदाहरणार्थ आपल्या आयुष्यात नाटका-सिनेमात, पुस्तकात वगैरे ‘आय लव्ह यू’ हे वाक्य आपण किती तरी वेळा ऐकतो, पण आपण आपल्या आयुष्यात खरेच स्वत: किती वेळा तसे बोलतो? (विचारा बरं स्वत:ला, लग्नानंतर आपण किती वेळा आपल्या नवऱ्याला किंवा बायकोला खरेच ‘आय लव्ह यू’ असे म्हटले आहे? किंवा ते सोडा, आपल्या आईला आपण हे कधी सांगितले आहे?) हे गमतीचे वाटेल तुम्हाला, पण गमतीगमतीत आपल्या जगण्यावर कधी कधी छान उजेड पडतो. आता त्याच्या उलट ‘मी’ हा शब्द आपल्याला ऐकण्यापेक्षा बोलायला कित्ती कित्ती आवडतो नाही? दुसरा कुणी ‘मी मी’ करायला लागला, की एक तर आपल्याला वैताग येतो किंवा आपण त्याची चेष्टा करतो; पण आपल्याला किती हौस असते, तेच करायची? दुसरीकडे हेही खरं की, आपण आपल्या भावना व्यक्तच करत नाही. मराठी माणसे तर या बाबतीत फारच हिमटी म्हणावी लागतील. वर पुन्हा, ‘आम्हाला नाही हो उगाच पुढे पुढे करत बोलून दाखवायला जमत. आमच्या मनात असतं सारं...’ असं ऐकवण्यात आपल्याला अभिमान वाटतो. माझी एक मैत्रीण नेहमी मला टोमणा मारते, ‘तुला ना प्रेमाची सारखी ग्वाही लागते, माझ्या वागण्यात दिसत नसेल प्रेम तर गेलास उडत.’ माझे नेहमीचे अर्ग्युमेंट असते, पण सहज बिनपैशात दोन गोड शब्द बोलून प्रेम व्यक्त केलेस आणि झाला माझा तो क्षण श्रावणासारखा हिरवागार, तर काय बिघडते?
असो. तर सज्जनहो, एव्हाना तुम्हाला कळलेच असेल, की माझा रोख आहे, तो सध्या बहुचर्चित असलेल्या राष्ट्रप्रेम, देशप्रेम वगैरे ‘प्रसारमाध्यमांनी जीवनमरणाच्या केलेल्या’ गोष्टींबाबत. एकाने म्हणावे, “‘भारतमाता की जय’ असे आता या तरुण पिढीला म्हणायला शिकवायला हवे.” लगेच दुसऱ्याने म्हणावे, “गळ्यावर सुरी ठेवली तरी मी ‘भारतमाता की जय’ म्हणणार नाही, कारण आपल्या राज्यघटनेत तसे काही म्हटले नाहीये.” एकाने हा नारा द्यावा तर दुसऱ्याने दुसरा. हे सगळे ‘ऐबो गॅप’चेच परिणाम आहेत. सिनेमा, नाटके, पुस्तके, टीव्ही चॅनल्स वगैरे माध्यमांतून सतत ‘ऐकवले’ गेलेले शब्द आपण ‘बोललो’ नाही, तर आपल्या निष्ठेची ग्वाही दिल्यामुळे द्रोहाचा गुन्हा आपोआपच सिद्ध होतो का, हा खरा प्रश्न आहे. आता हेच बघा ना. तुमचा नवरा जर असे म्हणाला की, आजपासून रोज संध्याकाळी मी ऑफिसातून घरी आल्यावर एकदा ‘आय लव्ह यू’ म्हणाली नाहीस तर तू माझ्याशी एकनिष्ठ नाहीस, नक्कीच तुझे दुसऱ्या कुणाबरोबर तरी लफडे आहे, असे मी गृहीत धरणार... तर जगणे अवघड होईल नाही का? हे सगळे ‘ऐबो गॅपचे’ प्रकार आहेत.

आमच्या कंपनीत काम करताना एक तत्त्व आमचे एक वरिष्ठ नेहमी ऐकवत असत. ‘इट इज नॉट इनफ टु बी क्लीन, यू शुड बी सीन टु बी क्लीन.’ म्हणजे तुमचे वर्तन शुद्ध असणे पुरेसे नाही, ते शुद्ध असल्याचे दिसले पाहिजे. हे ‘दिसले पाहिजे’ म्हणजे ऐबो, मधला ‘बो’. बोलून दाखवा. ग्वाही द्या. आता गंमत म्हणजे, या ‘ऐबो’च्या दोन्ही बाजू तशा पटणाऱ्या आहेत. दोन्हीतही तथ्य आहे. म्हणजे बघा, आपण आपले प्रेम व्यक्त केले, तर एखादा क्षण सहज सोनेरी होतो. तसे करून आपण सहज मिळणाऱ्या मोठ्या अानंदाला मुकतो, हे खरेच आहे. कल्पना करा, वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला गाढवासारख्या फेऱ्या मारत दोरे गुंडाळता, त्याच्याऐवजी आपण मस्त पहाटे उठून नवऱ्याच्या उशीखाली जमेल तितक्या सुंदर अक्षरात एक चिठ्ठी लिहून ठेवली, ‘अरे सख्या, काय सुरेख झाले रे माझे आयुष्य तुझ्यामुळे. फार फार आवडतोस तू मला.’... तुम्हीच बघा, किती सुरेख साजरा होईल, तोच वटपौर्णिमेचा दिवस! हे ‘बो’ म्हणजे बोलण्यातले सौंदर्य. पण तेच मघाशी म्हटले, तसे नवऱ्याने रोज संध्याकाळी ‘आय लव्ह यू’ म्हणण्याचा आदेश काढला, तर किती जाचक होईल नाही का? दिवसभर नोकरी करून, लोकलचे धक्के खात बायको घरी येते, तेव्हा तिच्या हातात मस्त वाफाळत्या चहाचा कप ठेवणारा नवरा किती प्रेमळ वाटेल बायकोलादेखील. मग त्या वेळी त्या नवऱ्याने ‘ओह डार्लिंग, आय लव्ह यू’ असे औपचारिकपणे म्हणणेच उलट खुळचट आणि मळकट वाटेल. म्हणजे बघा, दोन्हीतही तसे तथ्य आहे.

तुम्हीच विचार करा, रोज वेळेत कामावर जाणारा, रस्त्यावर रहदारीचे सगळे नियम अतिशय काटेकोरपणे पाळणारा, ऑफिसात अत्यंत उत्साहाने आणि पराकोटीच्या कार्यक्षमतेने काम करणारा, सगळे कर वेळेत भरणारा आणि जमेल तितकी आजूबाजूच्या समाजाला मदत करणारा, पण राष्ट्रगीताला आवर्जून उभा राहणारा माणूस देशप्रेमी म्हणायचा की, आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार करणारा, आपण व्हीआयपी असल्यामुळे सामान्य नागरिकांची गैरसोय करणारा, पैसे आणि दारू वाटून मते मिळवणारा, पण वेळोवेळी देशप्रेमाच्या घोषणा तारस्वरात देऊन ग्वाही देणारा नेता देशप्रेमी मानायचा? प्रश्न फिरून फिरून तिथेच येतो. एवढे चांगले वागणाऱ्या माणसाने नियम म्हणून दर वेळी राष्ट्रगीताचा मान राखला तर कुठे बिघडते, असेही म्हणता येते, आणि जगण्यावागण्यात इतके सुरेख राष्ट्रप्रेम दाखवणाऱ्यावर त्याची अशी औपचारिक ग्वाही देण्याची सक्ती तरी का करावी? असेही म्हणता येते. या दोन्हीतही तथ्य आहे. जगण्याचे पेच असेच असतात.

आणि खरा पेच तर याच्या पुढेच आहे. रणजी करंडक विजेत्या संघाशी, त्यानंतर उर्वरित भारताच्या संघाशी लढत होते त्याला इराणी करंडक म्हणतात. ज्या वर्षी महाराष्ट्राला रणजी करंडक मिळेल, त्या वर्षी इराणी करंडकाचा सामना ‘महाराष्ट्र विरुद्ध भारत’ असा होतो. तेव्हा पुणेकराने कुणाला पाठिंबा द्यावा? महाराष्ट्राला का भारताला? हे प्रतीकात्मक अर्थाने घ्या. कारण पुणे हा महाराष्ट्राचा, महाराष्ट्र भारताचा आणि भारत हा अखिल विश्वाचा भाग आहे. या सर्व तुकड्यात माणसेच असतात. आपण अभिमान नेमका कशाचा बाळगावा, हा खरा प्रश्न आहे. ‘भव्य हिमालय तुमचा अमुचा, केवळ माझा सह्यकडा, गौरिशंकर उभ्या जगाचा, मनात पुजिन रायगडा’ हे काय आहे नेमके? याच्या उलट ‘बाजी’, ‘अगं बाई अरेच्चा’ किंवा ‘लय भारी’ वगैरे, मला बंडल वाटणारे सिनेमे पाहता "स्पॉटलाइट', "डॅनिश गर्ल', "रेव्हेनंट' वगैरे ‘परदेशी’ सिनेमांसाठी जीव टाकणे, म्हणजे देशद्रोह झाला का? पाकिस्तानातला कुणी विराट कोहलीचा चाहता असणे किंवा भारतातल्या एखादीने अफ्रिदीची चाहती असणे, हा काय देशद्रोह झाला? गुलाम अलींच्या गजलेला राष्ट्रप्रेमाच्या तलवारीने कापून टाकणार? यापुढे जाऊन जातीबाहेरच्या प्रेमाला ‘सन्माननीय मृत्युदंड’ देणार?
नितळ प्रेमाला राजकीय, भौगोलिक, जातीय, भाषिक अशा कप्प्यात कसे टाकता येईल? इथल्या तद्दन स्क्रीन आणि स्टार अ‍ॅवॉर्ड‌्सपेक्षा भल्या पहाटे उठून ऑस्कर सोहळा बघणे एखाद्याला अधिक महत्त्वाचे वाटले, तर तो कमी राष्ट्रप्रेमी का? तुम्ही म्हणाल, हे संभाविता, नुसते पेच नको टाकूस, मार्ग सांग. तर सांगतो.

sanjaybhaskarj@gmail.com