आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sanjay Parab About Appreciation Of Pranav Dhanavade, Rasik, Divya Marathi

प्रणव, बी अलर्ट!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘अविश्वसनीय’ हा शब्ददेखील अपुरा पडावा, असा एकाच डावात एक हजाराहून अधिक धावा करण्याचा महापराक्रम कल्याणच्या प्रणव धनावडेने आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत केला. सनसनाटी बातमीच्या शोधात असलेल्या मीडियाला काही तासांसाठी-दिवसांसाठी जणू नवं सावजच सापडलं. त्या अर्थाने, प्रणवसाठी हा अत्यंत धोक्याचा क्षण. त्याचीच जाणीव करून देणारं हे खुलं पत्र...

प्रिय प्रणव...
सर्वप्रथम तुझ्या विश्वविक्रमाला सलाम!
आंतरशालेय िक्रकेट स्पर्धेत नाबाद १००९ धावांचा डोंगर रचून तू नवीन विश्वविक्रम रचलास. घरची परिस्थिती बेताची असताना िरक्षाचालक वडिलांनी तुझ्यासाठी घेतलेल्या कष्टाचे शब्दश: चीज झाले. पहिल्या दिवशी नाबाद ६०० धावा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आणखी ४०० धावा करणे, हे सोपे नाही. खरं तर जवळपास अशक्यच. मग समोरचा संघ किती कमकुवत होता, मैदान िकती छोटे होते, हे प्रश्न गौण ठरतात. एका १५ वर्षांच्या मुलाने, तब्बल ३९६ मिनिटे म्हणजे, जवळपास ७ तास मैदानावर पाय रोवून उभे राहणे, ही अशक्यप्राय गोष्ट होती. पण, तू ते निग्रहपूर्वक शक्य करून दाखवलेस. हॅट्स ऑफ टु यू.

अपेक्षेप्रमाणे, तुझा आता कौतुक सोहळा सुरू झाला आहे. रूईया काॅलेजच्या समोरच्या दडकर मैदानात िदलीप वेंगसरकर आिण अिजत वाडेकर यांनी तुझा िक्रकेट िकट देऊन गौरव केला, त्या सोहळ्यात मीदेखील उपस्थित होतो. पण नेतेमंडळी, िवविध पक्ष आणि मंडळांच्या कौतुक सोहळ्याने तू फार थकून गेलेेला िदसलास. काहीसा भांबावलेला आणि भेदरलेलाही. या पुढचे काही दिवस मीडिया तुझा पाठलाग करील. तुझी प्रत्येक अॅक्शन-रिअॅक्शन, तुझं सार्वजनिक असणं-दिसणं-वावरणं कधी कौतुकाने, कधी निष्ठुरपणे टिपत राहील. पण सलग दोन िदवस मैदानावर उभे राहिल्याने, माझ्या हातापायात गोळे आलेत, मला झोपेची गरज असल्याचेही तू त्या भेटीत मला सांिगतलेस. तुझे ते बोल एेकून कौतुक वाटले आणि काळजीही. जे घडलंय ते ग्रेटच आहे. पुढे कितीतरी वर्षं तुझा हा विश्वविक्रम अनेकांच्या आठवणीत राहील. परंतु शालेय िक्रकेट पातळीवर िवक्रम केलेले बहुतांशी खेळाडू १९ वर्षांनंतरच्या खुल्या स्पर्धेत फारसे िटकाव धरू शकलेले नाहीत, हे वास्तव तुला मन आणि मेंदूवर कोरून ठेवावे लागेल. तुला कदाचित ठाऊक असेल, नसेलही. सचिन तेंडुलकर-िवनोद कांबळी ही विश्वविक्रमी जोडगोळी उदयास येण्याआधी १९८६च्या सुमारास मुंबई शालेय िक्रकेटमध्ये संजीव जाधव यांच्या रूपाने एक तारा चमकला होता. संजीवने शालेय िक्रकेट स्पर्धेत खेळताना ४२२ धावा फटकावल्या होत्या. मात्र, त्यानंतर खुल्या स्पर्धेत खेळायला लागल्यानंतर संजीव कसाबसा तीन प्रथम श्रेणी सामने खेळला आिण यातही त्याला मोठी खेळी करता आली नाही. संजीवनंतर आलेल्या सचिन तसेच िवनोद यांनी मात्र कमाल केली. शालेय िक्रकेटसोबतच प्रथम श्रेणी तसेच आंतरराष्ट्रीय िक्रकेटमध्ये त्यांनी विक्रम रचले. सचिन तर िवक्रमादित्य ठरला! पण, सचिनएवढीच, िकंबहुना त्याच्यापेक्षा थोडी जास्त गुणवत्ता िवनोदकडे होती. त्यात िवनोद डावखुरा फलंदाज. दोघे खेळत असताना नजाकतदार फलंदाजी मात्र िवनोदची व्हायची. जाणकार-प्रेक्षकांची वाहवा विनोदच मिळवायचा. दोघांचे प्रशिक्षक एकच, रमाकांत आचरेकर. त्यांच्या मते, िवनोद शालेय िक्रकेटमध्ये सचिनपेक्षा सरस होता. पण, सचिनकडे ध्यास आिण िजद्द होती. िक्रकेट हेच त्याचे जीवन होते. त्याच जोरावर त्याने ‘भारतरत्न’ या सर्वोच्च सन्मानापर्यंत झेप घेतली. पण, िवनोदचे तसे झाले नाही. त्याची कारकिर्द अकाली संपली. प्रसिद्धी, लोकप्रियता, पैसा विनोदला पेलवलं नाही. प्रलोभनं त्याला टाळता आली नाहीत. तरीही नशीब, त्या वेळी आतासारखा अधाशी मीडिया नव्हता आणि आयपीएलसारखी प्रलोभनंही नव्हती. तुझ्या पुढ्यात मात्र पावला-पावलांवर धोके आहेत. म्हणूनच तुला सचिन आिण िवनोदची गोष्ट सांगण्याची या क्षणी खूप गरज आहे. कारण िक्रकेट हेच लक्ष्य असेल, तर सचिन होऊ शकतो, हे आचरेकर सरांचे म्हणणे तू कायम लक्षात ठेवायला हवे. सचिनकडून हा एक गुण तू िशकलास तरी खूप मोठी मजल मारल्यासारखी आहे.

एक हजाराची मनसबदारी खेळी एखाद्याच्या हातून होते. असा पराक्रम पुन:पुन्हा होणे नाही. पण, असाच खेळ करत भविष्यात आणखी शतके तुझ्या नावावर लागायला हवीत, तरच तुला िटकून राहता येईल. तरच मीडिया तुझा उदो उदो करील. स्पॉन्सर्स हात जोडून उभे राहतील. अन्यथा तुझा संजीव जाधव व्हायला वेळ लागणार नाही. या क्षणी हेही तुला आवर्जून सांगायला हवं की, सचिन व िवनाेदनंतर सर्फराझ खान, पृथ्वी शाॅ, तसेच अरमान जाफर (वािसम जाफरचा पुतण्या) या खेळाडूंनी शालेय िक्रकेटमध्ये ३००, ४०० धावा फटकावत छोट्या वयात मोठी गुणवत्ता दाखवून िदली आहे. सध्या हे खेळाडू प्रथम श्रेणी िक्रकेटमध्ये िटकाव धरून आहेत. सर्फराझ व अरमानची १९ वर्षांखालील भारतीय संघात िनवडही झाली आहे. पण, हे खेळाडू भविष्यात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खुल्या स्पर्धेत कशी कामगिरी करतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तुझेही आता तसेच असेल. क्रिकेट प्रशासकांनी तुझ्यावर रोखलेला एक कॅमेरा कायम तुझा पिच्छा करत राहील. तुझी खरी परीक्षा यापुढे सुरू होईल.

तुला हेही सांगायला हवे की, िवराट कोहली, सुरेश रैना, महमद कैफ, िपयुष चावला, रूद्रप्रताप िसंग, इरफान पठाण या साऱ्या खेळाडूंनी युवा िवश्वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी करत, भारतीय संघात स्थान िमळवले. यापैकी िवराट कोहली हा एकच खेळाडू आज कसोटी, वनडे, ट‌्वेन्टी-२० िक्रकेट अशा सर्व प्रकारच्या िक्रकेटमध्ये िटकाव धरून आहे आिण याचे एकमेव कारण म्हणजे, तो इतरांप्रमाणेच गुणवान आहेच; पण मानसिक व तांित्रकदृष्ट्या इतरांपेक्षा कमालीचा उजवा आहे. विराटभोवती असलेल्या ग्लॅमरआडची ही गोष्टही तू लक्षात ठेवलेली बरी! िवराटप्रमाणेच मुंबईकर अिजंक्य रहाणेचे उदाहरण तू डोळ्यासमोर ठेवू शकतोस. अितशय शांत डोक्याने मोठी खेळी करणारा गुणवान िक्रकेटपटू म्हणून अिजंक्यची आज आेळख आहे. माणूस म्हणूनही तो मोठा आहे. दुष्काळग्रस्तांसाठी लाखांची मदत करणारा तो पहिला िक्रकेटपटू. अशी सामािजक बांधलकी जपणेसुद्धा माणूस म्हणून खूप मोठी गोष्ट ठरते. पैसेवाले खूप आहेत, पण दुसऱ्यासाठी हात पुढे करणारे थोडे असतात, हे अिजंक्यने दाखवून िदले आहे.

उत्तर प्रदेश, िबहार, पंजाब, हरयाणा येथील खेळाडू वय चोरून छोट्या वयाच्या स्पर्धेत खेळतात. भ्रष्ट मार्गाने खे‌ळवले जातात. तेथे त्यांचा पराक्रम हा वासरात लंगडी गाय शहाणी, असा होतो. पण, खुल्या स्पर्धेत खेळताना ते कुठल्या कुठे फेकले जातात. प्रणव, ही गोष्ट सांगण्याचे कारण म्हणजे, तू ज्या आर्य गुरुकुल संघािवरोधात हजार धावांचा िवक्रम केलास, त्या शाळेतील मुले १४ वर्षांआतील वयोगटातील होती. म्हणजे तुझ्या के. सी. गांधी शाळेतील मुलांपेक्षा दोन वर्षांनी छोटी. हा काही तुझा िकंवा तुझ्या शाळेचा दोष नव्हता. कारण दहावीमुळे प्रतिस्पर्धी शाळेतील १६ वर्षांच्या आतील मुले खेळायला आली नाहीत, हे तू लक्षात ठेवायला हवेेच. यापुढे अशी संधी िमळणार नाही, याची खूणगाठ तू मनाशी पक्की बांधायला हवीस.
दहावीनंतर मुंबईतील काॅलेजमध्ये प्रवेश घेऊन येथेच िक्रकेटचे धडे िगरवणार, असे तू म्हणालास. ही अितशय चांगली गोष्ट आहे. येथेच तुझी खरी कसोटी लागेल. कारण एकापेक्षा एक सरस खेळाडूंशी दोन हात करण्याची संधी तुला िमळेल. तुझ्यासारखीच माजी कसोटीपटू सध्याचे आघाडीचे प्रशिक्षक लालचंद राजपूत आणि चंद्रकांत पंिडत यांची घरची अितशय गरीब परिस्थिती होती. पायात िस्लपर घालून हे दोघे जण रूईया काॅलेजला यायचे. त्या वेळी त्यांना मंगेश भालेकरच्या रूपाने उत्तम मार्गदर्शक िमळाला. मंगेशने दोघांनाही नामवंत प्रशिक्षकांकडून उत्तम प्रशिक्षण िमळवून तर िदलेच, िशवाय आिर्थक मदतही केली. राजपूत तर आज भारतीय "अ' संघाचा प्रशिक्षक आहे. टाटा कंपनीत मोठ्या हुद्द्यावरही आहे. पंिडत मुंबई िक्रकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची यशस्वी धुरा सांभाळत आहे. हे सांगण्याचे कारण हे की, मुंबईत आल्यानंतर १६ वर्षांखालील मुलांच्या स्पर्धेत खेळता आले पािहजे, आिण चांगले काॅलेज तसेच उत्तम प्रशिक्षकही मिळायला पाहिजे. ते जर मिळाले तर अर्धी लढाई जिंकली, असे म्हणता येईल.

प्रणव, आणखी काही िदवस तुझे वारेमाप कौतुक होत राहील, तुझ्यावर बक्षिसांंचा वर्षाव केला जाईल. नेतेमंडळी तुझ्याबरोबर फोटो काढून घेतील. ते चमकतील; तुला, तुझ्या घरच्यांनाही चमकवतील. पण यामधून लवकरात लवकर बाहेर पडून तू आधी दहावीचे वर्ष यशस्वीपणे पार कर आिण नव्या िक्षतिजांना कवेत घेण्यासाठी मुंबईत ये... नवे आव्हान तुला खुणावते आहे... सोनेरी भविष्यकाळ तुझी वाट पाहतोय...
तुझाच हितचिंतक

(sanjay.parab5@gmail.com)