आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन वर्षांचे नैराश्य पंधरा दिवसांत पळाले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मी संतोष माधव पाटील मु.पो.ता. अमळनेर जि. जळगाव, मी एम.एस्सी. जीवशास्त्राचा पदवीधारक आहे, मी 2010 मध्ये पूर्ण 100% डिप्रेशनमध्ये गेलो होतो. मी फार उदास झालो होतो जीवन संपून टाकायचे असे वाटत होते. जेवण करण्याची इच्छा होत नसायची, आठ आठ दिवस आंघोळ करत नव्हतो. नातेवाईक मित्रमंडळीत मिसळत नव्हतो, कुठेही समारंभात जात नसायचो. जीवनात इंटरेस्टच राहिला नव्हता. रात्र-रात्र झोप लागत नव्हती सारखे विचार चालू असायचे आत्महत्या करावी असे विचार यायचे, पण मला माझ्या फॅमिली डॉक्टरने धुळे येथील मनोविकारतज्ज्ञ डॉक्टर यांच्याकडे पाठवले व त्यांचे उपचार 2010 मध्ये सुरू झाले, 2010 यावर्षीपासून ज्या गोळ्या सुरू झाल्या तेव्हापासून ऑगस्ट 2013 पर्यंत गोळ्या सुरूच होत्या. मला जेवढ्या गोळ्या घ्यायचो तेव्हढेच बरे वाटायचे व पुन्हा डॉक्टर कडे जावे लागत होते. दर महिन्याला मला 1500 रुपये खर्च फक्त औषधीवर होत होता आणि डॉक्टर तेच औषध कंपनी बदलून देत असायचे.
इतका खर्च मला परवडणारा नव्हता. मी फार परेशान होतो. पण दिव्य मराठीचे मी खूप आभारी आहे कारण त्यांच्यामुळे मला योग्य मार्ग मिळाला, 0६. 0८. 2013 या दिवशीच्या दिव्य मराठीमध्ये गौडा मॅडमचा लेख वाचला मला होमिओपॅथीचा मार्ग मिळाला त्यांचा लेख वाचून मला आशा वाटली की, त्यांच्या मुलाला ज्या डॉक्टरने बरे केले ते मला पण बरे करतील मी बरा होऊ शकतो, असे वाटले पण मनात पुन्हा शंका येऊ लागल्या की, आपण इतक्या दिवसापासून स्पेशालिस्ट डॉक्टरच्या गोळ्या खातो त्यांच्याकडून काही फायदा होत नाही पण होमिओपॅथीने होईल का ? पण मग मी विचार करू लागलो मग मी पण होमिओपॅथिक उपचार सुरू केले डॉक्टरने माझी पूर्ण विचारपूस करून माहिती घेतली आणि मला साबुदाण्यासारख्या गोळ्या दिल्या. मी त्या गोळ्या घेऊन घरी गेलो आणि सांगितलेली पथ्ये पाळली आणि नियमित गोळ्या घेतल्या व जादूच झाली माझ्या 15 दिवसातच मी ज्या गोळ्या 2010 पासून घेत होतो त्या बंदच झाल्या व मला फ्रेश वाटायला लागले व शांत झोपही यायला लागली, मी काम करू लागलो जीवनात इंटरेस्ट वाटू लागला, रोजची रोज अंघोळ करणे नातेवाइकात मित्रमंडळीत जाऊ लागलो. मला जीवनात आनंद वाटु लागला. नैराश्य दूर पळाले. मी दिव्य मराठीचा खूप खूप आभारी आहे त्यांनी माझे जीवनच बदलून टाकले, असे कार्यक्रम त्यांनी पुढे ही राबवावेत असे मला वाटते कारण जेव्हा माणूस अडचणीत असतो तेव्हा मार्ग शोधणे फार कठीण होत जाते. जर आपल्याला असे एकमेकाचे अनुभव वाचायला
मिळाले तर त्याचा नक्कीच फायदा होतो जो मला झाला. नाहीतर मी असाच आयुष्यभर गोळ्यावर जगत राहिलो असतो.