आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Satish Bodhekar Article About Jim, Life Style, Divya Marathi

जिम आणि आजची लाइफस्टाइल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'रात्री जेवताना भुकेपेक्षा थोडे कमीच खावे. महत्त्वाचे रात्रीच्या जेवणात व झोपेत दोन तासाचे अंतर ठेवावशरीर रोग प्रतीकारक बनविने आवश्यक असते. त्याचबरोबर आपल्या आहाराकडे विशेष लक्ष्य देणेही आवश्यक असते.'

खरं तर आजच्या लाइफस्टाइलबद्दल कोणालाही सांगायला नको. शरीर क्षणिक सुखापायी पोखरले गेले तर आपल्याला चालेले का ? याचा आपण विचारच करीत नाही. इतके सर्व सांगायचे प्रयोजन असे की मानव जन्म एकदाच मिळतो, मग मिळालेला मानव जन्म योग्य रीतीने जगून सार्थकी लावण्यास काय हरकत आहे. तुम्हास प्रश्न पडेल की योग्य रीतीने जगणे म्हणजे काय? तर या सर्व प्रशांचे उत्तर आगदी सोपे सहज व आपण करण्यायोग्य आहे.

आपल्या शरीराला जर आपण रोज व्यायामाची सवय लावली व आपले खाणे पिणे योग्य रीतीने केले तर धाडस आहे का, कोणत्याही आजाराचे की जो सहजपणे तुमच्या शरीरात प्रवेश करेल. व्यायामाने शरीरच नाही तर मन सुद्धा मजबूत बनते. पण व्यायाम कसा करावा वा खाणेपिणे कसे सांभाळावे यावर काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत. त्या निश्चितच तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. सर्वप्रथम तर झोपेतून सकाळी उठल्यानंतर दिवसाची सुरुवात कशी करावी? तर सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाण्यात 1/4 लिंबू पिळून ते पाणी प्यावे. नंतर दोन काळ्या मणुका, दोन बदाम (रात्री पाण्यात भिजवलेले) खावे. त्याने तुमच्या शरीरात आवश्यक घटक मिळतात. कोणताही व्यायाम करायला सकाळची वेळ चांगली असते. सकाळी चालणे व जॉगिंग करणे वा घरीच व्यायाम करणे योग्य, पण घरच्या घरी व्यायाम नियमित होत नाही. दोन आठ दिवस केल्यावर व्यायाम करण्याचा कंटाळा येतो म्हणून एखादा जिम जॉइन करावा. जिम सुरू करताना योग्य ती काळजी घ्यावी. जिममध्ये स्वच्छता आहे का नाही? योग्य ट्रेनर आहे का नाही? संपूर्ण इक्विपमेंट रेंज आहे का नाही? जिममधील वातावरण चांगले आहे का नाही? हे सर्व चौकशी करूनच जिम जॉइन करावा. बी.एम.आय. इंडेक्सप्रमाणे आपले वजन जर जास्त असेल तर वजन कमी व्हावे म्हणून जिममध्ये कॉडिओ सेक्शन असतो. यामध्ये कमर्शियल ट्रेडमिल असतात. यावर चालून-पळून आपण योग्य प्रकारे वजन कमी करू शकतो. ट्रेडमिलमुळे हृदय मजबूत होण्यास मदत होते. हृदयाचा झटका वा हृदयाच्या इतर समस्या दूर होतात. जिममध्ये इलेप्टिकल क्रॉसट्रेनर, बाइक्स, स्पीनिंग बाइक्स इ. कार्डिओ इक्विपमेंट असतात. त्यामुळे शरीराला योग्य आकार मिळतो. पाय, गुडघे, खांदे, मनगटे, मांड्या इ. मजबूत होतात. शरीराची प्रतिकार क्षमता खूप वाढते. असे बरेचसे इक्विपमेंट जिममध्ये असतात. त्यामुळे आपण अनेक आजारांना दूर ठेवू शकतो. आजार सुरू झाल्यावर वा वजन वाढल्यावर व्यायाम सुरू करण्यापेक्षा पहिलेच व्यायाम करून रोगांना प्रतिबंध करणे योग्य होय. जिमचे इक्विपमेंट हे अनेक संशोधन करून बनविलेले असतात. त्यामुळे त्यांचा कोणताही साइड इफेक्ट शरीरावर होत नाही. त्यामुळे जिममध्ये व्यायाम करणे हे शरीराच्या दृष्टीने अतिशय योग्य व्यायाम होय. जिममधून आल्यावर स्वच्छ अंघोळ करावी. थोड्या वेळाने नाष्टा करावा. रोज न टाळता नाष्टा करावा.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, नाष्ट्यामध्ये सत्त्वयुक्त पदार्थ असावे.