आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Satish Waghmare Article About L K Advani, Divya Marathi

'हर हर...घर घर...'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हजारो वर्षांनी जेव्हा भारताचा इतिहास लिहिला जाईल,तेव्हा भारत म्हणजे फक्त गुजरात आणि पुराणपुरुष म्हणून ऑफकोर्स नरिंदर मोदी यांची नोंद होईल. पुढे तत्कालीन राष्ट्रगीताचा शोध घेता, ‘भो नरेंद्र मोदी भूप धन्य धन्य असे सर्वथा भूवरी...’ हे गाणे सापडेल की काय, अशी चमत्कारिक भीती अजब-गजब मोदी प्रचारतंत्र बघून सहज मनाला चाटून जातेय. असो. ‘नव इतिहासाचार्य’, फेकचंद मोदीसुद्धा लग्नच ठरत नसलेल्या पोरीच्या बापासारखे कुठल्याही कॉम्प्रमाइजला तयार होऊन, काहीच्या काही वक्तव्ये करत आहेत. ‘हर हर मोदी’च्या घोषाला द्वारकेच्या शंकराचार्यांनी विरोध जाहीर केला आणि मग मोदीदेखील ‘ना चोल्बे ना चोल्बे’ म्हणू लागले. हर हर मोदी म्हटल्यामुळे धार्मिक कम राजकीय भावना दुखावल्या आहेत. संघ वगळूनसुद्धा भाजप व मोदीला न मानणारे हिंदू आहेत, ते दुखावून विपरीत परिणाम होऊ शकतो, हे आता संघाच्या लक्षात आले.

खरे तर ‘हर हर’चा एक अर्थ दु:खहरण कर, हा होता; आणि दुसरा अर्थ, ज्याचं नाव घेतलं त्याला ‘तू हर तू हर’ असा होतो. या दुसर्‍या अर्थाच्या गृहीत धरण्याने ‘हर हर मोदी’ला विरोध करणारे शंकराचार्य पुरोगामी जिवाला फार काही पटत नाहीत. त्यांनी मोदीविरोधी फतवा काढला आणि लगेच तो मान्य केला? काय हे? एक शंकराचार्य भाजपला आत्मपरीक्षण करायला भाग पाडतो आणि पक्ष ऐकतो. बाकीचे तसेच बाजूला. संघ आणि भाजपात लोकशाहीला किंमत नसल्याचे, हे अजून एक ठळक उदाहरण. यातून हिंदू धर्मप्रेमी लोकांची ‘दिले’ (पक्षी : काळजं) अत्यंत हळवी असून तीस जपणे आययम्पी आहे, हे लक्षात आल्याने, आणून दिल्याने पुढील हर हर घोष मंदावला.
हे ‘हर हर मोदी’ कट्टर हिंदुत्ववादी ओबीसी नेते आहेत, पण ते ओबीसींचे आहेत का? तर नाही! 1990च्या दशकात मंडल आयोगाचे आंदोलन चिघळले असताना ओबीसींना उघड विरोध करणारा केजरीवाल बोवा आपण पाहिलाय? तर त्याच वेळी आंदोलनाला समर्थन न देता चीरवृद्ध (हे चीरतरुणच्या धर्तीवर. मागील 20 वर्षांपासून हे असेच दिसतात!) अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली राममंदिरासाठी विटा गोळा करण्यात मोदी धन्यता मानत होते. असे हे गुजरातचे लाल नरिंदर मोदी! दलित, आदिवासी, ओबीसी, शोषित, वंचित समाजाचे कधी होणे शक्य आहे काय? गुजरातचा खरा चेहरा तिथल्या ग्रामीण भागात स्पष्ट दिसतो; तो बघण्याची दृष्टी महाराष्ट्रातल्या राज ठाकरे आणि गुजराती प्रगतीचे गोडवे गाणार्‍या इथल्या सेना-भाजपा राजकीय नेतृत्व टोळीकडे नाही.

भारतीय राजकारणाला आणि समाजकारणाला नियंत्रित करू पाहणारी एक कुटिल यंत्रणा म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. भारतातील अर्थकारण, समाजकारण, परराष्ट्र धोरण, शिक्षण यासंबंधीची धोरणे ठरवण्यात संघसेवकांचा प्रमुख सहभाग असतो, हे उघड आहे. यामुळे संघाच्या ब्राह्मण राष्ट्रवादाला अनुकूल अशा पक्षाचेच राज्य केंद्रात सत्तास्थानी असावे, अशी रणनीती रा. स्व. संघामार्फत आतापर्यंत आखली गेली आहे. मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, दलित, आदिवासी आणि इतर समाजातले विवेकवादी लोक अद्याप काँग्रेसकडेच आशा लावून बसले आहेत. ‘नौटंकी’ केजरीवाल बाबूची हवा फार काही गारवा देऊ शकत नाही, हे बाबूने अल्पकाळ मुखमंत्री बनून विविध शो, आरडाओरडा, आदळआपट करून दाखवले आहेच. संघ परिवारातील संघटनांबरोबर हिंदू राष्ट्रवादाचा ‘राकीस’ कायम उभा असल्यामुळे काँग्रेसच आपली तारणहार आहे, असा विश्वास दलित-मुस्लिमांना अद्याप वाटतो आहे. काँग्रेस मात्र या बदल्यात या समाजघटकांना अद्याप भरीव काही देऊ शकलेली नाही, हे कडवे वास्तव आहे. काँग्रेसनेदेखील प्रचंड आत्मपरीक्षण करण्याची आज गरज आहे.

सामाजिक आणि आर्थिक विषमतेच्या वरवंट्याखाली असलेल्या खूप मोठ्या समाजघटकाची परिस्थिती निरक्षरता, बेरोजगारी, उपासमार, जातीय व धार्मिक अत्याचार यांनी वेढलेली आहे. यावर उपाययोजना करून या समाजघटकांचे जगणे सुसह्य व्हावे, यासाठी काँग्रेसने प्रभावशाली उपाय योजलेले नाहीत. हिंदुत्ववाद्यांचे, दहशतवाद्यांचे भय दाखवून आम्हीच केवळ तुमचा उद्धार करू शकतो, अशा दाव्याला काँग्रेस प्रभावीपणे उतरलेली नाही. भाजप आणि काँग्रेस एकमेकांचे विरोधी पक्ष असले, तरी त्यांची रणनीती ही संघाला पोषक ठरणारी दिसते. नाहीतर गुजरातमधली खरी परिस्थिती तिथल्या काँग्रेसने प्रभावीपणे समोर आणली असती. ही बाब भारतातील मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन आणि दलित आदिवासींच्या लक्षात येत नाही, असा समज काँग्रेसने करून घेण्याची आवश्यकता नाही.

सध्या भाजपात गोंधळाचे वातावरण भलतेच जोरदार आहे, ही चांगली गोष्ट आहे. भाजपातल्या ज्येष्ठ नेत्यांच्या राजकारणाला आखरी ‘घर घर’ लागल्याचे स्पष्ट दिसते आहे. ‘म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान’ म्हणून हौसेने उभे राहिलेल्या चीरवृद्ध अडवाणींना ‘जाय तिकडं उभा राहा’ म्हणून बाजूला सारले आहे. मोदींना तशा अर्थाने कृतघ्न म्हणता येणार नाही. कारण मोदींनी जशी अडवाणींना वेळोवेळी मदत केली, तसे अडवाणींनीही मोदींच्या सर्व राजकीय चुकांवर पांघरूण घालण्याचे काम कालपर्यंत इमानेइतबारे केलेले आहेच. या मिलीभगतला दीर्घकालीन राजकारणात फार अर्थ नव्हताच. चीरवृद्ध जसे पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा बाळगून होते, तसा चहावालाही होता. त्यामुळे सत्ता जवळ दिसताच चहावाल्या मोदींनीच अडवाणींपुढे आव्हान उभे केले.

नरिंदर मोदींच्या या खेळीने भाजपामधली ‘डनगरी ग्यांग’ जायबंदी झाली, चीरवृद्ध पंतप्रधानपदाचे फक्त थ्री-डी ख्वाब बघत दिवस घालवू लागले, आणि म्हातार्‍या ग्यांग्चे पुढारी झाले. आता दुबळे राजकारण करणारी म्हातारी ग्यांग फार प्रभावशाली नाही, पण पारड्यात डावे-उजवे करू शकत असल्याने, त्यांना थोडे चुचकारले जातेय. समजा (फक्त समजा) दोन महिन्यांनी मोदीशेठ पंतप्रधान झालेच, तर चीरवृद्ध अडवाणी, सुषमा स्वराज, जसवंतसिंह व अन्य ज्येष्ठ नेत्यांना मोदींशी जुळवून घेताना नाकी नऊ येणार, हे स्पष्ट आहे.

‘ओल्ड म्याण’ यांनी भोपाळमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. यात मोदींचे समर्थक आपला पराभव करू शकतात, ही भीती स्पष्ट होती. या भीतीपोटीच त्यांनी भोपाळ हा सुरक्षित मतदारसंघ निवडला होता. गांधीनगरमध्ये पराभव पत्करावा लागला, तर पक्षातील स्थान दुबळे होऊन आपण आपोआप पंतप्रधानपदाच्या स्पर्धेतून बाहेर फेकले जाऊ, असे त्यांना वाटणे स्वाभाविक आहे. आणि म्हातारपणात ही नामुष्की म्हणजे ‘तोबा तोबा’ अशी बड्या बुजुर्गांची मानसिक स्थिती गोंधळलेपणाची आहे. आणि म्हणून सध्या संघ-भाजपात वादळ उठले आहे. याचा फायदा घेत काँग्रेसने सुव्यवस्थित रणनीती आखून संविधानविरोधी प्रचंड जातीय भाजपला शह द्यायला हवा.